साहसी वृत्तीच्या तरुणांना करिअर करण्यासाठी खुणावतंय 'हे' क्षेत्र

साहसपूर्ण आयुष्य जगू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी 'या' क्षेत्रात आहे करिअर करण्याची भरपूर संधी

News18 Lokmat | Updated On: Jun 13, 2019 07:00 PM IST

साहसी वृत्तीच्या तरुणांना करिअर करण्यासाठी खुणावतंय 'हे' क्षेत्र

मुंबई, 13 जून : सागरी मार्गाने होणाऱ्या मालवाहतुकीचं माध्यम म्हणजे मर्चंट नेव्ही. जहाजावर विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी इथे भरपूर मनुष्यबळाची गरज भासत असते. साहसपूर्ण आयुष्य जगण्याची इच्छा असलेल्या तरुण-तरुणींसाठी या क्षेत्रात करिअर करण्याची सर्वात जास्त संधी उपलब्ध आहे.

दोन देशांमधला बहुतांश व्यापार हा सागरी मार्गानेच होत असतो. मर्चंट नेव्ही हे सागरी मार्गाने होणाऱ्या व्यापारी मालवाहतुकीशी संबंधित करिअर आहे. या मालवाहतुकीचं प्रमुख माध्यम म्हणजे जहाज. जहाजावर विविध प्रकारची कामे करणाऱ्या माणसांची गरज असते. आव्हानांनी भरलेलं साहसपूर्ण आयुष्य, त्याचबरोबर आकर्षक आणि भरपूर पगार आणि उच्च राहणीमान देणारं असं हे क्षेत्र आहे.


करिअर घडवायचं असेल तर आधी करा 'ही' महत्त्वाची गोष्ट

नौकानयन विभागात पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यावर थर्ड ऑफिसर म्हणून नोकरी मिळते. पगार साधारण सव्वा ते दीड लाख प्रति महिना इतका असतो. परदेशी शिपिंग कंपन्यांमध्ये निवड झाल्यावर हाच पगार दोन ते अडीच लाखांपर्यंत वाढतो. मरिन इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यावर शिपिंग कंपनीत ज्युनियर इंजिनीअर म्हणून नोकरी मिळते. दरमहा पगार सव्वा ते दीड लाख इतका असतो.

Loading...

मर्चंट नेव्हीतल्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी 12 वी विज्ञान शाखेतून फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथमॅटिक्स या तिन विषयांत सरासरी 60 टक्के गुण मिळवणं आवश्यक असतं. भारत सरकारने मर्चंट नेव्हीतल्या अभ्यासक्रमाचं संचालन करण्यासाठी इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटीची स्थापना केली आहे.

उत्तम टीम मेंबर व्हायचं असेल तर 'हे' 7 गुण तुमच्यात असायलाच हवेत

'भारतातील व्यापारी जहाजांचा कारभार हा मुंबई, कोचीन, कांडला, मद्रास, न्हावाशेवा, मार्मागोवा, पारादीप, तुतिकोरीन, विशाखापट्टणम या बंदरांतून चालतो. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ग्रेट इस्टर्न शिपिंग, इंडियन स्टीमशिप कंपनी, कामोदर बल्क कॅरिअर्स, साऊथ इंडियन शिपिंग कॉर्पोरेशन, चौगुले स्टीमशिप लिमिटेड, डेंपो स्टीमशिप लिमिटेड, रतूआवन शिपिंग भारती या प्रमुख कंपन्या मर्चंट नेव्हीमध्ये असून, त्यात भरपूर संधी उपलब्ध आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: career
First Published: Jun 13, 2019 07:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...