उत्तम व्यवस्थापक व्हायचं असेल तर 'हे' गुण तुमच्या अंगी असायलाच हवेत

उत्तम व्यवस्थापक व्हायचं असेल तर 'हे' गुण तुमच्या अंगी असायलाच हवेत

'हे' पाच गुण जर तुम्ही आत्मसात केले, तर सगळ्यात उत्तम व्यवस्थापक म्हणून काम करू शकाल

  • Share this:

मुंबई, 18 जून : व्यवस्थापक म्हणजेच मॅनेजरच्या गुणवत्तेवरच कंपनी चालते. मॅनेजर नसेल तर कर्मचाऱ्यांच्या कामांना कोणतीही दिशा राहात नाही. एखाद्या कंपनीमध्ये जर तुम्हाला उत्तम व्यवस्थापक म्हणून काम करायचं असेल तुमच्या अंगी कोणकोणते गुण असायला हवेत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1 - उत्कृष्ट मॅनेजर हा त्याच्याबरोबर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची काळजी घेतो. त्यांची गुणवत्ता वाढावा यासाठी तो त्याचा वेळ आणि उर्जा खर्च करतो. त्याचे 50 टक्के काम हे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं आणि उरलेले 50 टक्के काम हे कामाची प्रक्रिया सोपी आणि सुलभ करणं हे असतं. तो केवळ कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं देत नाही तर त्यांचे प्रशिक्षण व्यवस्थित होत आहे की नाही याकडेही लक्ष देतो.

नोकरीसाठी पहिल्यांदाच इंटरव्ह्यूला जाताय? मग 'या' 5 टिप्स एकदा वाचा

2 - एक उत्तम व्यवस्थापक कर्मचाऱ्यांच्या लहानसहान गोष्टींमध्ये लुडबुड करत नाही. तो त्यांना कामासाठी सक्षम करतो. कामाचा आनंद त्यांना वाटेल अशी रचना करतो. त्यांना प्रोत्साहन देतो. यामुळे त्यांची कामगिरी उंचावते. कर्मचाऱ्यांना सक्षम करणारा मॅनेजर हा नोहमी प्रभावी ठरतो.

3 - टीम वर्कमुळे यश मिळत असतं. जिंकणाऱ्या टीममधील प्रत्येक सदस्याला यशाचा आनंद वाटतो. तसा तो वाटावा याची दक्षता चांगला मॅनेजर घेत असतो. टीमच्या यशाबरोबरच कर्मचाऱ्यांच वैयक्तिक भले पाहणाऱ्या मॅनेजरने सांगितलेली कोणतिही गोष्ट कर्मचारी ऐकतात.

4 - कर्मचाऱ्यांची उत्पादकता हा मुद्दा तो गांभीर्याने घेतो. त्यांचे काम परिणामकारक व्हवे यासाठी आवश्यक साधने तो त्यांना उपलब्ध करून देतो. त्यांच्या कामाचं स्वरुप गुंतागुंतीचं राहणार नाही याची खबरदारी तो घेतो. यातून तो अपेक्षित रिझल्ट साधतो.

शिफ्टमध्ये काम करताना लक्षात घ्या 'हे' आरोग्याविषयीचे धोके

5 - कोणत्याही मोठ्या कि्वा छोट्या कंपनीत संवाद हा गृहीत धरला जातो. प्रत्यक्षात अनेक पातळ्यांवर संवादाचा अभाव असतो. अधिकारी आणि कर्मचारी हे दोन्ही घटक यासाठी जबाबदार असतात. एक चांगला मॅनेजर कर्मचाऱ्यांशी उत्तम संवाद साधून, त्यांच्या अडचणी समजून घेतो. हा गुण ज्याने आत्मसात केला तो सगळ्यांत उत्तम व्यवस्थापक म्हणून काम करू शकतो.

First published: June 18, 2019, 7:37 PM IST
Tags: career

ताज्या बातम्या