खेळता-खेळता करा करिअर; क्रीडाविश्वात उपलब्ध आहेत 'या' सुवर्णसंधी

खेळता-खेळता करा करिअर; क्रीडाविश्वात उपलब्ध आहेत 'या' सुवर्णसंधी

स्पोर्ट्स रिपोर्टरपासून ते मानसोपचातज्ज्ञापर्यंत अशा आहेत क्रीडा क्षेत्रातल्या नामी संधी

  • Share this:

मुंबई, 20 जून - क्रीडाविश्वात करिअर करण्यासाठी तुम्ही खेळायलाच हवं असं आवश्यक नाही. क्रीडा प्रशिक्षकापासून ते सामने आयोजित करण्यापर्यंत अशा विविध बाबी आहेत, ज्यात तुम्ही करिअर करण्यसोबतच भरपूर प्रमाणात अर्थाजन करू शकता.

1 - प्रशिक्षक - आजकाल लहानपणीत मुलांची आवड लक्षात घेऊन त्यांना खेळाचं प्रशिक्षण दिलं जातं. मुलांवर बालवयातच खेळाचे उत्तम संस्कार झाले तर ते त्या खेळात निपूण बनतात. यात महत्त्वाचा वाटा असतो तो म्हणजे त्याच्या स्पोर्ट्स टिचरचा. ते फकत मुलांना खेळासंदर्भातच मार्गदर्शन करत नाहीत, तर त्यांच्या मनात त्या खेळाबाबत आवड निर्माण करण्यासह प्रोत्साहन सुद्धा दिलं जातं.

उत्तम व्यवस्थापक व्हायचं असेल तर 'हे' गुण तुमच्या अंगी असायलाच हवेत

2 - स्पोर्ट्स रिपोर्टर - मीडियामध्येसुद्धा अनेक मार्ग खुले झाले आहेत. ज्यांना क्रीडाविश्वात जास्त रस आहे, आणि ज्यांना मराठी, हिंदी आणि इंग्लिश उत्तम ज्ञान असून लेखनही चांगलं आहे त्यांच्यासाठी मीडियामध्ये अनक संधी उपलब्ध आहेत. क्रीडाविश्वातल्या अपडेट्सची माहिती दररोज देणाऱ्यांना मीडियामध्ये स्पोर्ट्स रिपोर्टर म्हणून सुवर्ण संधी उपलब्ध आहे. खेळता येत नसलं तरी, क्रीडा विश्वाचं उत्तम ज्ञान असणाऱ्यांना या क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध आहे.

3 - समालोचक - या क्षेत्रात करिअर करण्यासाठी कॉमेंटेटर म्हणजेच समालोचक हा पर्यायसुद्धा उपलब्ध आहे. यात करिअर करताना तुमची वैयक्तिक पातळीवरसुद्ध एक वेगळी ओळख निर्माण होते. सुनिल गावस्कर, रवि शास्त्री, हर्षा भोगले अशी काही उदाहरणं आहेत ज्यांनी एक उत्तम खेळाडू म्हणून आणि त्यानंतर एक उत्तम कॉमेंटेटर म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

4 - फिटनेस एक्सपर्ट - कोणताही खेळाडू हा शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि सुदृढ असणं गरजेचं असतं. त्यासाठी ते हेल्थ क्लब किंवा पर्सनल ट्रेनरचा पर्याय निवडतात. हीच संधी असते फिटनेस एक्सपर्ट किंवा ट्रेनर म्हणू करिअर घडविण्याची. यासाठी विविध कोर्सेस घेतले जातात. ज्यामध्ये खेळाडूंसाठीचं फिटनेस प्रशिक्षण दिलं जातं.

विचारांची पातळी वाढवा; कारण त्यावरच अवलंबून असतो तुमचा आत्मविश्वास

5 - स्पोर्ट्स मार्केटिंग - आजकाल बऱ्याच मॅचेस इटंरनॅशनल चॅम्पियनशिप किंवा लीग्स होत असतात. या सगळ्याचं मार्केटिंग आणि बाजारपेठेशी असलेलं नातं यासाठी मार्केटिंग क्षेत्रात उत्तम ज्ञान असलेल्यांची गरज असते.

6 - स्पोर्ट्स मॅनेजमेंट - तुम्हाला खेळण्यासोबतच मनोरंजन विश्वात रस असेल तर स्पोर्ट्स मॅनेजमेंट हा उत्तम पर्याय आहे. सद्या असे बरेच इव्हेंट्स आयोजित केले जातात, ज्यात रिपोर्टिंग मॅनेजरची भूमिका महत्त्वाची ठरते. स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये जाहिरात, ऑडिअन्स, सुरक्षा व्यवस्था असे अनेक पर्याय तुम्हाला निवडता येतात.

7 - मानसोपचारतज्ञ - खेळाडू जसा शारीरिदृष्ट्या निरोगी असणं गरजेचं असंत, तसंच तो मानसिदृष्ट्याही निरोगी असायला हवा. खेळ म्हटलं की यश अपयश हे आलंच. मात्र, मानसिकदृष्ट्या न खचता आपला खेळ कसा चांगला होईल, आणि खेळताना बुद्धीचा वापर करताना कशापद्धतीने समतोल साधायला हवा. यासठी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो. तेव्हा स्पोर्ट्स मानसोपचारतज्ज्ञ हा एक उत्तम पर्यायसुद्धा या क्षेत्रात उपलब्ध आहे.

First published: June 20, 2019, 6:08 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading