नव्या नोकरीचा पगार निश्चित करताना करू नका 'या' चुका

नव्या नोकरीचा पगार निश्चित करताना करू नका 'या' चुका

हातात आलेली संधी जाता कामा नये, असं जर तुम्हाला वाटत असेल तर लक्षात ठेवा 'या' गोष्टी

  • Share this:

मुंबई, 21 जून : मुलाखतीनंतर जर तुमची एखाद्या नोकरीसाठी निवड झाली असेल तर 'तुमच्या काय अपेक्षा आहेत?' हा प्रश्न हमखास विचारला जातो. नव्या नोकरीचा पगार निश्चित करताना अनेक वाटाघाटी तुम्हाला कराव्या लागतात. अशावेळेस तुम्ही विचारपूर्वक बोलणं अपेक्षित असतं. हातात आलेली ही संधी जाता कामा नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर पगार निश्चित करताना काही गोष्टींचा उल्लेख करणं तुम्हाला टाळावं लागेल.

पगार ठरवताना व्यक्तीगत अडचणींचा उल्लेख करणं तुम्हाला महागात पडू शकतं. त्या सांगितल्याने तुम्हाला पगार वाढून मिळेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते साफ चुकीचं आहे. तुमच्या घरातील अडचणी हा तुमचा व्यक्तिगत प्रश्न असतो. अशा अडचणी मांडण्याऐवजी तुमच्या पात्रता सिद्ध करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. येणाऱ्या सगळ्या अडचणी सोडविण्याची धमक तुमच्यात आहे हे तुमच्या वागण्या बोलण्यातून तुम्ही दाखवून द्या.

लोकांना स्वभाव ओळखण्यासाठी फायद्याच्या ठरतील तुम्हाला 'या' 5 टिप्स

नोकरी करताना आपल्याला भरपूर पगार मिळावा अशी इच्छा सगळ्यांचीच असते. पण पगारवाढ का आवश्यक आहे? हे वारंवार बोलून दाखवणं टाळावं. तुमची गरज आहे हे दाखविण्यापेक्षा, अपेक्षित पगारासाठी तुम्ही कसे योग्य आहात हे पटवून देणं जास्त महत्त्वाचं ठरतं. तसंच पगार ठरवताना दुसऱ्या कंपनीकडून जास्त ऑफर आहे या गोष्टीचा उल्लेख तुम्ही अजिबात करू नका.

शिफ्टमध्ये काम करताना लक्षात घ्या 'हे' आरोग्याविषयीचे धोके

यापूर्वीच्या कंपनीमध्ये मानसारखी पगारवाढ मिळाली नाही, म्हणून अपेक्षित पगार मिळावा असं म्हणणं देखील चुकीचंच आहे. तसंच 'त्या' कंपनीत काम कर्मचाऱ्यांना जास्त पगार मिळतोय म्हणून तुम्हालाही जास्त पगार मिळायला हवा, ही भुमिकासुद्धा चुकीचीच ठरते. या वाटाघाटी करताना तुम्ही मिळवलेलं यश, तुमचा अनुभव, जबाबदाऱ्या पार पाडण्याची तयारी, त्यासाठी तुमची असलेली पात्रता आणि काम अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी तुमच्या नवीन कल्पना यांबद्दल जर तुम्ही चर्चा केली तर निश्चितच तुमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: career
First Published: Jun 21, 2019 06:06 PM IST

ताज्या बातम्या