मुलींसाठी सर्वात जास्त संधी असलेली 'ही' आहेत 5 क्षेत्र

मुलींसाठी सर्वात जास्त संधी असलेली 'ही' आहेत 5 क्षेत्र

भरघोस कमाई करण्यासाठी जाणून घ्या कोणती आहेत 'ही' क्षेत्र?

  • Share this:

मुंबई, 13 जून : दहावी आणी बारावीचा निकाल लागला असून, इतर निकालसुद्धा आता लागला सुरूवात झाली आहे. निकालांच्या या मालिकेत आपण करिअर नेमकं कोणत्या क्षेत्रात करायचं हा प्रश्न अनेकांपुढे उभा ठाकला असेल. अशी अनेक क्षेत्रं आहेत, ज्यात मुली उत्तमरित्या करिअर करून भरघोस कमाई करू शकतात. आज आम्ही तुम्हा अशाच काही क्षेत्रांची माहिती सांगणार आहोत ज्यात तुम्हाला उत्तम करिअर येईल.

1 - एअर होस्टेस हे क्षेत्रसुद्धा महिलांना खुणावत असतं. वेगवेगळ्या एव्हिएशन संस्थांमध्ये याचं प्रशिक्षण दिलं जातं. प्रशिक्षणानंतर या संस्था विभिन्न एअरलाइन्समध्ये कामाची संधी उपलब्ध करुन देतात. ट्रेनिंगच्या काळात तुमचे वागणे, बोलणे आणि भाषा याकडे विशेष लक्ष दिलं जातं.

करिअर घडवायचं असेल तर आधी करा 'ही' महत्त्वाची गोष्ट

2 - पुरुषांप्रमाणेच महिलांनासुद्धा कपडे आणि फॅशनची समज असते. जर तुम्हाला स्टिचिंग आणि फॅशनची आवड असेल तर फॅशन डिझाइनिंग या क्षेत्रात तुम्हाला उत्तम करिअर करता येईल.

3 - पाककला हे अनेक स्त्रिांचं आवडीचं क्षेत्र असतं. होम सायन्समधून जर तुम्ही पदवी घेतली तर तुम्हाला कोणत्याही प्रतिष्ठित हॉटेलमध्ये ट्रेनिंग लेव्हलला शेफचं काम सहज मिळू शकतं. पुढे शेफचे काम करून तुम्ही भरपूर पैसा कमवू शकता.

उत्तम टीम मेंबर व्हायचं असेल तर 'हे' 7 गुण तुमच्यात असायलाच हवेत

4 - शिक्षण क्षेत्रात कायम मागणी असते. त्यामुळे पुरुषांप्रमाणेच महिलासुद्धा शिक्षण क्षेत्रात सहज करिअर करू शकतात. या क्षेत्रात सुरक्षितता असून, त्यासाठी एखाद्या विषयात तज्ज्ञ आणि बीएड असणं आवश्यक असतं.

5 - मीडिया क्षेत्रातही करिअरच्या भरपूर संधी आहेत. अनेक महाविद्यालयांमध्ये  आणि संस्थांमध्ये पत्रकारिता आणि अँकरिंगचे कोर्सेस उपलब्ध आहेत. जे केल्यानंतर मीडिया क्षेत्रात कामाच्या अनेक संधी उपलब्ध होतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 13, 2019 05:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading