मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

हृदयविकार आणि कोलेस्टेरॉलवाढीसाठी प्लास्टिक आहे जबाबदार!

हृदयविकार आणि कोलेस्टेरॉलवाढीसाठी प्लास्टिक आहे जबाबदार!

heart attack

heart attack

प्लास्टिकमुळे हृदयाचे विकार (Heart disease) आणि कोलेस्टेरॉल (Cholesterol) वाढू शकतं, असं एका अभ्यासात समोर आलं आहे.

नवी दिल्ली, 3 डिसेंबर: प्लास्टिक (Plastic) हा आपल्या जीवनशैलीचा एक महत्त्वाचा घटक झाला आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात असंख्य कारणांसाठी प्लास्टिक वापरलं जातं. प्लास्टिक पर्यावरणासाठी घातक आहे, हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. मात्र याच प्लास्टिकमुळे हृदयाचे विकार (Heart disease) आणि कोलेस्टेरॉल (Cholesterol) वाढू शकतं, असं एका अभ्यासात समोर आलं आहे. अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया-रिव्हरसाइड विद्यापीठातल्या (University of California-Riverside) स्कूल ऑफ मेडिसिनच्या (School of Medicine) शास्त्रज्ञांनी हा नवीन दावा केला आहे. या अभ्यासानुसार, प्लास्टिक अधिक टिकाऊ बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनांमुळे फ्थॅलेट प्लाझ्मा (phthalate plasma) कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. एन्व्हायर्न्मेंटल हेल्थ पर्स्पेक्टिव्ह्ज (Environmental Health Perspectives) नावाच्या जर्नलमध्ये याबाबतचा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.

कोलेस्टेरॉल हा मानवी पेशींच्या बाहेरच्या बाजूस एका विशेष घटकानं बनलेला थर असतो. त्याला वैद्यकीय भाषेत कोलेस्टेरॉल किंवा लिपिड म्हणतात. कोलेस्टेरॉलचे चांगला आणि वाईट असे दोन प्रकार आहेत. चांगलं कोलेस्टेरॉल प्रथिनं, कार्बोहायड्रेट्सइतकंच महत्त्वाचं असतं, तर वाईट कोलेस्टेरॉल मानवी शरीरासाठी धोकादायक असतं. कमी घनता असलेलं लिपोप्रोटीन (Lipoprotein) हेदेखील एक वाईट कोलेस्टेरॉल आहे. जेव्हा लिपोप्रोटीनमध्ये प्रथिनांच्या जागी चरबीचं प्रमाण वाढू लागतं, तेव्हा शरीरातल्या वाईट कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढू लागतं. असं झाल्यास हृदयविकाराच्या धोक्यामध्ये लक्षणीय प्रमाणात वाढ होते.

तज्ज्ञ काय म्हणतात?

यूसीआर स्कूल ऑफ मेडिसिनमधले (UCR School of Medicine) प्रोफेसर चांगचेंग झोऊ (Changcheng Zhou) यांनी प्लास्टिकच्या वापरावर केलेल्या संशोधनाबाबत माहिती दिली आहे.

'डीसीएचपी (DCHP) म्हणजेच डायसायक्लोहेक्सिल फ्थॅलेट (Dicyclohexyl Phthalate) हे शरीरातल्या प्रिग्नॅन एक्स रिसेप्टरशी (pregnane X receptor) अतिशय घट्टपणे जुळत असल्याचं संशोधनात समोर आलं आहे, अशी माहिती प्रोफेसर झोऊ यांनी दिली. डीसीएचपी पोटात गेल्यानंतर तो पीएक्सआरचा घटक बनून जातं आणि कोलेस्टेरॉलचं शोषण आणि वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमुख प्रथिनांना उत्प्रेरित करतं.

डीसीएचपी पीएक्सआर सिग्नलिंगद्वारे आतड्यामध्ये उच्च पातळीत कोलेस्टेरॉल तयार करतं. फ्थॅलेट प्लास्टिसायझर (phthalate plasticizer) म्हणून डीसीएचपी मोठ्या प्रमाणात वापरलं जातं, असंदेखील झोऊ म्हणाले.

पर्यावरण संरक्षण एजन्सीने (Environmental Protection Agency) काही दिवसांपूर्वीच डीसीएचपीशी संबंधित धोक्यांचं मूल्यांकन प्रस्तावित केलं आहे; मात्र मानवी आरोग्यावर त्याचे थेट परिणाम काय आहेत याबद्दल अद्याप जास्त माहिती उपलब्ध नाही.

'उंदरांचा अभ्यास करून प्रथमच डीसीएचपी, कोलेस्टेरॉल आणि हृदयरोग यांच्यातल्या संबंधांवर प्रकाश टाकला गेला आहे. उच्च पातळीचं कोलेस्टेरॉल (High Cholesterol) किंवा डिस्लिपिडेमिया (Dyslipidemia) आणि हृदयविकारावर होणारा प्लास्टिकचा परिणाम या संशोधनातून लक्षात येतो, असं प्रोफेसर चांगचेंग झोऊ म्हणाले.

First published:

Tags: Health, Health Tips, Heart Attack, Tips for heart attack