कार्डियक अरेस्ट येतो कसा.. जाणून घ्या याची लक्षणं आणि कारणं

कार्डियक अरेस्ट येतो कसा.. जाणून घ्या याची लक्षणं आणि कारणं

स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर कार्डियक अरेस्ट ही एक अशी स्थिती आहे ज्यात हृदय काम करणं पूर्णपणे बंद करतं. हे कोणत्याही पूर्वसुचनेशिवाय अचानक येतं.

  • Share this:

अनेकदा असं म्हटलं जातं की हृदयविकाराचा झटका हा अयोग्य जीवनशैली, अनियमित खान-पान, नियमित व्यायाम न करणे यांसारख्या गोष्टींमुळे येतो. पण फिटनेसबद्दल सजग असणाऱ्यांनाही कार्डियक अरेस्ट येऊ शकतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे. स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर कार्डियक अरेस्ट ही एक अशी स्थिती आहे ज्यात हृदय काम करणं पूर्णपणे बंद करतं. हे कोणत्याही पूर्वसुचनेशिवाय अचानक येतं. यानंतर रक्तप्रवाह थांबतो आणि श्वास कोंडल्यामुळे व्यक्तीचा मृत्यू होता.

अनेकांना हृदयविकाचारा झटका आणि कार्डियक अरेस्ट हे एकच वाटतात. पण या दोन्हीमध्ये बरच अंतर आहे. कार्डियक अरेस्टमध्ये हृदयात होणाऱ्या बदलांचा त्याच्या पंप करण्याच्या क्षमतेवर गंभीर परिणाम पडतो. यामुळे शरीरातील अनेक भागांमध्ये रक्त पुरवठा होत नाही आणि जेव्हा मेंदूला रक्त आणि ऑक्सिजन पुरवठा मिळणं बंद होतं तेव्हा माणूस बेशुद्ध होतो. याच स्थितीतला कार्डियक अरेस्ट असं म्हणतात. व्यक्ती बेशुद्ध झाल्यानंतर काही काळातच त्याचा मृत्यू होतो.

कार्डियक अरेस्टची लक्षणं-

- दीर्घ श्वास घेणं शक्य होत नाही

- हृदयात असहनीय वेदना होतात

- थकवा जाणवतो

- एवढंच नाही तर हृदयाचे ठोके वाढतात

- चक्कर येते

- शुद्ध हरपते

कोणत्या कारणांमुळे कार्डियक अरेस्टचा धोका वाढतो-

- धूम्रपान

- कोलेस्ट्रॉल

- उच्च रक्तदाब आणि हायपर टेन्शन

- मधुमेह

- नियमित स्वरुपात योग आणि व्यायाम न करणं

यापासून वाचण्याचे उपाय-

- बाहेरील जंक फूड किंवा फास्ट फूड खाणं टाळावं

- नियमित स्वरुपात चेकअप करावं

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

ऑफिसमध्ये वरिष्ठांच्या जाचाला वैतागलाय... सुटकेचे हे आहेत स्मार्ट पर्याय

सेल्फीमुळे कळतील तुमची गुपितं, सांभाळून काढा PHOTO!

झोपण्यापूर्वी न विसरता प्या हळदीचं दूध, नाहीतर...

दिवसाची सुरुवात या विचारांनी करा, कधीच येणार नाही नैराश्य!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2019 12:44 PM IST

ताज्या बातम्या