मानलं राव याला! पठ्ठ्यानं फक्त दोरीनंच सुरू केली गाडी; कधीच पाहिला नसेल असा जुगाड

मानलं राव याला! पठ्ठ्यानं फक्त दोरीनंच सुरू केली गाडी; कधीच पाहिला नसेल असा जुगाड

गाडीला रश्शी बांधून एखादा घोडा पळवावा तशी त्यानं गाडी पळवली. व्हिडीओ पाहून आनंद महिंद्राही इम्प्रेस झालेत. तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.

  • Share this:

मुंबई, 04 फेब्रुवारी : रस्त्यात मध्येच गाडीत (Car) बिघाड झाला, गाडी बंद झाली की किती मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो हे त्या ड्रायव्हरलाच माहिती. जवळपास कुठे गॅरेज नसेल तर मग डोक्याला आणखी ताप. पण काही लोकांकडे यावर काही ना काही जुगाड असतो. अशाच बंद कारसाठी केलेल्या जुगाडाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral video)  होत आहे.

आनंद महिंद्रा यांनी कारच्या जुगाडाचा व्हिडीओ आपल्या ट्विटवर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. भारतीय लोक तर असा जुगाड करण्यात मागे नाहीच. पण आता विदेशातील लोकांनीही जुगाड करून पाहिला आणि त्यांचा हा प्रयत्न यशश्वी ठरला. तो कसा ते तुम्हीच पाहा.

व्हिडीओत पाहू शकता, एक कार रस्त्यात बंद पडली आहे. तशी या कारची अवस्था फारशी चांगली नाही. पण तशीच कार चालवण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार बंद झाल्यानंतर दोन लोक कारबाहेर येतात आणि कारमध्ये नेमका काय बिघाड आहे ते पाहतात. त्यानंतर इंजिनमध्ये ते लोक फक्त दोरी टाकतात आणि खेचतात.

हे वाचा - आपोआप चालू लागली पार्किंगमधील बाईक; Horror film मधील नाही, रिअल Shocking video

व्वा! क्या बात है. कमालच झाली नाही का? फक्त रश्शीवर ही कार सुरू झाली. रश्शी खेचली की कार सुरू. कदाचित या कारच्या एक्सिलेटरमध्ये बिघाड झाला आहेत. एक्सिलेटर काम करत नाही आहे. त्यामुळे इंजिनला रश्शी बांधून या लोकांनी त्याचा एक्सिलेटरसारखा वापर केला.

ड्रायव्हर आपल्या सीटवर बसला आणि इतर दोघं गाडीच्या मागे जाऊन उभे राहिले. त्यांनी इंजिनला बांधलेल्या रश्शीचं एक टोक आपल्या हातात धरलं आणि ते खेचलं. घोड्याची दोरी हातात धरावी आणि त्याला पळवावं अगदी तसंच त्यांनी कारला बांधलेली दोरी हातात धरली आणि कार सुस्साट पळवली.

First published: February 4, 2021, 11:18 PM IST

ताज्या बातम्या