आज मी काय घालू, असा प्रश्न दररोज आपल्याला ऑफिसला जाताना पडतोच. ऑफिसला जाताना आपली नुसती तारांबळ उडते. घड्याळाचे काटे पुढे सरकत असतात आणि आपली धावपळ सुरू होते. मात्र तुमचा वेळ वाचवणार आहे, तो कॅप्सुल वॉर्डरोब (Capsule Wardrobe). ज्यामध्ये तुमच्या गरजेच्या वस्तू राहतील, ज्या तुम्हाला वेळेत सापडतील आणि ऑफिसला जाताना तुमची धावपळही होणार नाही. या कॅप्सुल वॉर्डरोबमध्ये काय काय असायला हवं पाहुयात.
पॅन्ट सूट
पॅन्ट सूट प्रोफेशनल वाटतं. शक्यतो ब्लू किंवा ब्लॅक पॅन्ट सूटची निवड करा. 3 प्रकारचे पॅन्ट सूट तुम्ही ठेवू शकता, एक सिम्पल, छोट्या आकाराचे पोल्का डॉट्स आणि चेक किंवा लायनिंगवाले पॅन्ट सूट.
पांढरा शर्ट
वॉर्डरोबमध्ये एक तरी पांढरा शर्ट असायलाच हवा. पांढरा रंग आवडत नसेल, तर न्यूट्रल रंगाचे शर्ट ठेवा. हे शर्ट शक्यतो लिनेन किंवा कॉटनचे असल्यास उत्तम.
पेन्सिल स्कर्ट
पेन्सिल स्कर्ट तुम्हाला प्रोफेशनलसह थोडं कूल लूकही देतं. त्यामुळे ब्लॅक कलरचा पेन्सिल स्कर्ट असावा
ट्रेन्च कोट
ट्रेन्च कोटमुळे तुम्ही पर्सनालिटी उठून दिसेल, तुम्ही प्रोफेशनल दिसाल. असा ट्रेन्च कोट घ्या, जो कोणताही शर्ट किंवा पॅन्टसोबत मॅच होईल.
पॅन्ट्स आणि जिन्स
ऑफिस म्हटलं की शक्यतो पॅन्टस आणि शर्टसचा विचार केला जातो. त्यामध्येही विविधता ठेवा. याशिवाय स्ट्रेट कट जिन्स, स्लिम फिट जिन्स, हाय वेस्ट जिन्स, लो वेस्ट जिन्स अशा जिन्सचाही तुम्ही समावेश करू शकता.
बॅग
बॅग ही गरज आणि तुमच्या उंचीनुसार असावी. ऑफिसच्या बॅगेत आवश्यक तितक्याच वस्तू ठेवाव्यात.
शूज
ऑफिससाठी पम्ब शूज, बेलीज किंवा लॉन्ग बूट्स तुम्ही वापरू शकता. ड्रेसनुसार तुम्ही हे शूज कॅरी करा. महत्त्वाचं म्हणजे शूज स्वच्छ आणि चमकदार असायला हवेत.
सॉक्स आणि लिंगरीज
सॉक्स आणि लिंगरीज नियमित लागणाऱ्या वस्तू, त्यामुळे वॉर्डरॉबमध्ये या असायलाच हव्यात. यासाठी वॉर्डरॉबचा एक कॉर्नर या वस्तूंसाठी राखीव ठेवा.
अन्य बातम्या
असं लावाल काजळ तर तुमच्याच डोळ्यांवर राहिल सर्वांची नजर
असा मेकअप कराल, तर खऱ्या वयापेक्षा 10 वर्षांनी लहान दिसाल मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.