S M L

कॅन्सरवर मिळालं प्रभावी औषध, 48 तासाच्या आत दिसू लागतील परिणाम

कॅन्सरसारखा जटील रोग बरा होऊ शकतो. 48 तासाच्या आता कॅन्सरवर उपाय होऊ शकतो.

Updated On: Feb 11, 2019 03:43 PM IST

कॅन्सरवर मिळालं प्रभावी औषध, 48 तासाच्या आत दिसू लागतील परिणाम

मुंबई, 11 फेब्रुवारी : मेडिकल सायन्सनं नुकताच एक चमत्कार केलाय. कुणी विचारही करू शकणार नाही, असा शोध लागलाय. तोही अमेरिकेत.

या शोधानुसार कॅन्सरसारखा जटील रोग बरा होऊ शकतो. 48 तासाच्या आता कॅन्सरवर उपाय होऊ शकतो. अलिकडे आपण पाहिलं अनेक बाॅलिवूड सेलिब्रिटीज कॅन्सरसारख्या आजारानं त्रस्त आहेत.

यावरचा इलाज महाग असतो. केमोथेरेपीसारख्या उपचारानं रुग्णाला प्रचंड त्रास होतो. पण आता अमेरिकेनंच लावलेल्या या शोधानं नक्कीच दिलासा मिळेल. सीनियर प्रोफेसर डॉ. हर्डिन बी जॉन्‍स म्हणाले, यावरचं संशोधन गेली 25 वर्ष सुरू होतं. द्राक्षाच्या बीमधून मिळणाऱ्या रसानं कॅन्सर बरा होऊ शकतो. या रसाचा परिणाम इतका वेगवान असतो की 48 तासातच प्रभाव जाणवायला लागतो.

भोपाळमधले संशोधक डाॅ. नाजिम अली म्हणाले, सध्या द्राक्षांची जी चर्चा आहे ती खरी आहे. द्राक्षात कॅलरी, फायबर आणि व्हिटॅमिन सी असतं. यात  ग्‍लुकोज, मॅग्‍नीशियम आणि साइट्रिक अॅसिड ही पोषक द्रव्य असतात. यामुळे किडनी, कावीळ आणि कॅन्सरसारखे रोग दूर राहतात.

संशोधकांच्या मते द्राक्षाच्या बीपासून मिळणाऱ्या रसानं ब्लडकॅन्सरपासून अनेक कॅन्सर बरे होऊ शकतात. यात जेएनके प्रोटिन असतं. ते कुठल्याही साइड इफेक्टशिवाय 76 टक्के कॅन्सर पेशी नष्ट करू शकतं. म्हणून 48 तासाच्या आत रुग्णाची प्रकृती सुधारायला लागते.

Loading...

राकेश रोशन, इरफान खान, सोनाली कुलकर्णी अशा अनेक सेलिब्रिटींनी कॅन्सरशी लढा दिला. याचवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोनालीने मला हाय ग्रेड कॅन्सर झाला असल्याचं सांगितलं होतं. त्यावर योग्य ते उपचार घेण्यासाठी सोनाली न्यूयॉर्कमध्ये गेली होती. आता ती बरी होऊन परत आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 11, 2019 03:43 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close