मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /कॅन्सर झाल्यास पुरुषांमध्ये दिसतात ही लक्षणं, या छोट्या त्रासांकडेही करू नका दुर्लक्ष

कॅन्सर झाल्यास पुरुषांमध्ये दिसतात ही लक्षणं, या छोट्या त्रासांकडेही करू नका दुर्लक्ष

आज आम्ही तुम्हाला पुरुषांमध्ये दिसणाऱ्या कॅन्सरच्या लक्षणांबद्दल माहिती देणार आहोत. वेगवेगळ्या कॅन्सरची पुरुषांमध्ये कोणती लक्षणं दिसतात याबद्दल जाणून घेऊया. आजतकच्या बातमीमध्ये याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

आज आम्ही तुम्हाला पुरुषांमध्ये दिसणाऱ्या कॅन्सरच्या लक्षणांबद्दल माहिती देणार आहोत. वेगवेगळ्या कॅन्सरची पुरुषांमध्ये कोणती लक्षणं दिसतात याबद्दल जाणून घेऊया. आजतकच्या बातमीमध्ये याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

आज आम्ही तुम्हाला पुरुषांमध्ये दिसणाऱ्या कॅन्सरच्या लक्षणांबद्दल माहिती देणार आहोत. वेगवेगळ्या कॅन्सरची पुरुषांमध्ये कोणती लक्षणं दिसतात याबद्दल जाणून घेऊया. आजतकच्या बातमीमध्ये याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 8 फेब्रुवारी : सध्याच्या बदलत्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे हल्ली अनेक आजारांचा धोका वाढतो आहे. सध्याच्या काळात कॅन्सर ही खूप मोठी समस्या बनली आहे. आज आम्ही तुम्हाला पुरुषांमध्ये दिसणाऱ्या कॅन्सरच्या लक्षणांबद्दल माहिती देणार आहोत. वेगवेगळ्या कॅन्सरची पुरुषांमध्ये कोणती लक्षणं दिसतात याबद्दल जाणून घेऊया. आजतकच्या बातमीमध्ये याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

गिळण्यात अडचण येणे : वजन अचानक कमी होणे, गिळण्यास त्रास होणे किंवा उलट्या होत असल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. कॅन्सरमुळे काही लोकांना वेळोवेळी गिळताना त्रास होतो. अशावेळी घशाचा किंवा पोटाचा कर्करोची तपासणी होऊ शकते.

लघवीला त्रास होणे : काही पुरुषांमध्ये वयासोबत लघवीशी संबंधित समस्या वाढतात. काहीवेळा रात्री उठून पुन्हा पुन्हा बाथरूमला जावे लागते. तर काहीवेळा लघवीवर नियंत्रण ठेवणेही अशक्य होते. यासोबतच लघवीमध्ये जळजळ जाणवणे, त्यातून रक्तही येऊ लागते. ही लक्षणे प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीमुळे जाणवतात. हे प्रोस्टेट कॅन्सरचे लक्षण असू शकते. त्यामुळे असा त्रास जाणवल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

त्वचेत बदल दिसणे : त्वचेवर तीळ किंवा चामखीळ असल्यास त्यांच्या आकारात किंवा रंगात बदल होऊ शकतो. तसेच त्वचेवर अचानक काही डाग दिसू शकतात. मात्र से काहीही दिसल्यास कोणताही निष्काळजीपणा न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण हे त्वचेच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.

टेस्टिकल्समध्ये बदल होणे : आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अंडकोषात गुठळ्या, जडपणा किंवा कोणताही बदल दिसल्यास उशीर करू नका. योग्य वेळी आढळल्यास त्यावर उपचारही होऊ शकतात. त्यामुळे त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

तोंडात बदल दिसणे : धूम्रपान करणाऱ्या किंवा तंबाखू खाणाऱ्या लोकांना तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. यामुळे तुमच्या तोंडावर आणि ओठांवर पांढरे, लाल, तपकिरी किंवा पिवळे डाग दिसू शकतात. तसेच तोंडात फोडदेखील दिसू शकतो, जो अल्सरसारखा दिसतो.

वजन कमी होणे : अचानकपणे वेगाने तुमचे वजन कमी होत असेल. तर ते तणाव किंवा थायरॉईडमुळे असू शकते. मात्र तुम्हाला हे त्रास नसतील तर हे लक्षण स्वादुपिंड, पोट किंवा फुफ्फुसाच्या कर्करोगाचे असू शकते. त्यामुळे तुम्हाला शंका आल्यास आणि त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

छातीत बदल होणे : छातीत त्रास आणि बदल म्हंटल की हा त्रास स्त्रियांचा होऊ शकते असे सामान्यपणे मानले जाते. मात्र पुरुषांना छातीत कोणत्याही प्रकारची गाठ जाणवल्यास तेही पुरुषांमधील स्तनाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. सामान्यपणे याकडे दुर्लक्ष होऊ शकते. मात्र असे करू नये.

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle