मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /सतत येणाऱ्या थकव्याकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, 'या' कॅन्सरचे असू शकते लक्षण

सतत येणाऱ्या थकव्याकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, 'या' कॅन्सरचे असू शकते लक्षण

कर्करोगाची महत्त्वाची लक्षणे

कर्करोगाची महत्त्वाची लक्षणे

कर्करोगाचा प्राथमिक अवस्थेत शोध लागला नाही, तर रुग्णाचा जीव वाचवणे कठीण जाते. त्यामुळे कोणतीही लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जाणे आणि वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 26 जानेवारी : कर्करोग हा प्राणघातक आजार आहे. हे तुम्हाला माहीत आहे. कर्करोगाचा प्राथमिक अवस्थेत शोध लागला नाही, तर रुग्णाचा जीव वाचवणे कठीण जाते. त्यामुळे कोणतीही लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जाणे आणि वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. भारतासह अनेक देशांमध्ये महिलांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर.

गेल्या काही वर्षांत या रुग्णानाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सध्या वाटणाऱ्या पण सतत होणाऱ्या कोणत्याची त्रासाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. सर्व्हायकल कॅन्सरची लक्षणं कोणती आहेत जाणून घेऊया. झी न्यूजने याबाबत अधिक माहिती दिली आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्राथमिक अवस्थेत निदान होत नाही. लक्षणे विकसित होण्यास काही वर्षे लागू शकतात. मात्र जेव्हा काही लक्षणे प्रथम दिसतात, तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.

Cancer Symptom : नखंही देतात कॅन्सरचे संकेत! हे बदल दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची महत्त्वाची लक्षणे

- सेक्स करताना तीव्र वेदना

- महिलांच्या गुप्तांगातून दुर्गंधी

- संभोगानंतर गुप्तांगातून रक्त येणे

- अनियमित मासिक पाळी, अचानक रक्तस्त्राव

- शौचाच्या वेळी रक्तस्त्राव

- अति थकवा

- वजन कमी होणे

- भूक न लागणे

- पोटदुखी

- अतिसार

वरीलपैकी कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. काही स्त्रीरोगविषयक चाचण्या पूर्व-कर्करोग शोधू शकतात. लवकर तपासणी केल्यास गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची वाढ थांबू शकते. मानवी पॅपिलोमाव्हायरस आण्विक चाचण्या अधिक प्रभावी असू शकतात. एंडोसर्व्हिकल उपचार ही एक उपचार पद्धती आहे. यामध्ये पेशींच्या नमुन्यांची बायोप्सी समाविष्ट आहे. त्यामुळे हा जीवघेणा आजार कालांतराने समजू शकतो.

गर्भाशय योनी आणि गर्भाशयाला जोडतो. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) मुळे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतो. हा आजार सहसा लैंगिक संक्रमित रोगामुळे होतो. मात्र हा गंभीर आजार प्राथमिक अवस्थेत आढळून आल्यास महिलेचा जीव वाचू शकतो. थोडी जागरूकता आणि खबरदारी घेतल्यास गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळता येतो.

त्याचप्रमाणे आण्विक चाचण्या आणि पॅप स्मीअर चाचण्यांमुळे कर्करोग लवकर ओळखता येतो. वेळेवर निदान झाल्यास अनेक महिलांचे प्राण वाचू शकतात. महिलांना आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची सवय असते. पण या सवयीचा परिणाम वाईट होऊ शकतो. त्यामुळे कर्करोगाच्या लक्षणांबद्दल तुम्हाला काही शंका असल्यास, ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या.

मासिक पाळीपूर्वी ब्रेस्ट पेन होणे सामान्य, पण ही लक्षणं दिसल्यास त्वरित घ्या डॉक्टरांचा सल्ला

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:

Tags: Cancer, Health, Health Tips, Lifestyle