• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • शारीरीक हालचालींअभावी वाढतोय कॅन्सरचा धोका; इतके तास व्यायाम करेल कर्करोगापासून बचाव

शारीरीक हालचालींअभावी वाढतोय कॅन्सरचा धोका; इतके तास व्यायाम करेल कर्करोगापासून बचाव

Cancer risk due to physical inactivity : धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अनियमित आहार आणि कमी शारीरिक हालचाली लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या अनेक आजारांना आमंत्रण देतात. अनेकांचे बैठे काम तसेच शारीरीक हालचाली होतच नसल्यानं विविध आजार डोकं वर काढत आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : आजच्या जीवनशैलीमध्ये अनियमित आहार आणि कमी शारीरिक हालचाली लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या अनेक आजारांना आमंत्रण देतात. अनेकांचे बैठे काम तसेच शारीरीक हालचाली होतच नसल्यानं विविध आजार डोकं वर काढत आहेत. अलिकडच्या धावपळीच्या युगात अनेक जण कामात खूपच व्यग्र राहतात आणि त्यांना दिवसभरात व्यायामासाठी थोडाही वेळ काढणं जमत नाही. पण खरंत व्यायाम करणे ही आता रोजची सवय बनवण्याची गरज आहे. त्यामुळे विविध प्रकारचे कर्करोग (Cancer) होण्यापासून आपली आधीच (Cancer risk due to physical inactivity) सुटका होऊ शकते. अलिकडं अनेकांनी चालणं सोडून दिलं आहे, जिने चढणे कमी झाले आहेत, अन्नामध्ये फळे-हिरव्या भाज्या कटाक्षाने खाण्याकडे अनेकांचे दुर्लक्ष होतं. धावपळीच्या जीवनात ताण कमी करण्यासाठी काही लोकांना ड्रग्जचे व्यसनही लागलं आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, या सर्व गोष्टी आपल्याला काही गंभीर आजारांकडे घेऊन जात आहेत. दैनिक जागरणमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, अमेरिकेत करण्यात आलेल्या एका नवीन संशोधनात असे आढळून आले आहे की, जर अमेरिकन लोक दर आठवड्याला किमान 5 तास मध्यम ते तीव्र पातळीवरील शारीरिक हालचाली (moderate to intense level) करत असतील तर सरासरी 46 हजारांहून अधिक लोकांना कर्करोगाच्या प्रकरणांपासून दरवर्षी वाचवता येऊ शकते. हे वाचा - …अन् मध्यरात्री बैलासह शेतमजूर कोसळला विहिरीत; लख्ख काळोखातील हृदय हेलावणारी घटना हे संशोधन जर्नल ऑफ मेडिसिन अँड सायन्स इन स्पोर्ट्स अँड एक्सरसाइजमध्ये प्रकाशित झाले आहे. या संशोधनाच्या आकडेवारीनुसार, 2013 ते 2016 दरम्यान 30 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये शारीरिक हालचालींचा अभाव असल्याचे दिसून आले. परंतु हे प्रमाण पुरुषांच्या  (14,277 प्रकरणे) तुलनेत महिलांमध्ये (32,089 प्रकरणे) जास्त होते. संशोधनातील निष्कर्ष - केंटकी, वेस्ट व्हर्जिनिया, लुइसियाना, टेनेसी आणि मिसिसिपी सारख्या अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये स्त्रियांना शारीरिक हालचाली आणि कर्करोगाच्या घटनांमध्ये जास्त समानता असल्याचे दिसून आले. उटा, मोंटाना, वायोमिंग, वॉशिंग्टन आणि विंकान्सीन या पर्वतीय राज्यांमध्ये हे प्रमाण स्त्रियांमध्ये कमी असल्याचे दिसून आले. हे वाचा - डोळ्यांखाली सूज आल्यानं तुमचा चेहरा थकल्यासारखा दिसतोय; हे घरगुती 5 उपाय येतील कामी अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, हे पहिले संशोधन आहे ज्यात कॅन्सरला शारीरिक हालचालींच्या अभावाशी जोडले गेले आहे. ते म्हणतात की अशा कॅन्सरमध्ये ब्रेस्ट, एंडोमेट्रियल कॅन्सर, कोलन कॅन्सर, पोटाचा कॅन्सर, किडनी कॅन्सर इ. होतात. सर्वाधिक पोटाच्या कर्करोगाची टक्केवारी 16.9 आहे. सर्वात कमी 3.9 मध्ये मूत्राशयाच्या कर्करोगाचा समावेश आहे.
  Published by:News18 Desk
  First published: