Home /News /lifestyle /

पुण्याच्या डॉक्टरचा चमत्कार! Ayurvedic treatment ने ठणठणीत झाला Cancer Patient

पुण्याच्या डॉक्टरचा चमत्कार! Ayurvedic treatment ने ठणठणीत झाला Cancer Patient

निदान झाल्यानंतर 100 पैकी 40 रुग्णांचा महागडे आणि मोठे उपचार करूनही पाच वर्षांच्या आतच मृत्यू होतो अशा कॅन्सरवर पुण्याच्या डॉक्टरने आयुर्वेदिक पद्धतीने यशस्वी उपचार केले आहेत.

पुणे, 09 मे : आयुर्वेद (Ayurveda) ही प्राचीन आणि प्रभावी भारतीय उपचार पद्धती असली, तरी तिचा वापर अद्यापही मर्यादित स्वरूपात केला जातो. अलीकडे आयुर्वेदाबद्दलची जागृती वाढली असली, तरी गंभीर आजारांवर आयुर्वेदिक उपचार घेणाऱ्यांचं प्रमाण अगदीच कमी आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातलं एक उदाहरण अत्यंत दिलासादायक आहे. पुण्यातल्या 51 वर्षांच्या एका महिलेचा कॅन्सर (Ayurvedic treatment on Cancer) केवळ आयुर्वेदिक उपचाराने पूर्णतः बरा झाला आहे. डिफ्यूज लार्ज बी-सेल लिम्फोमा (DLBCL) हा कॅन्सरचा अत्यंत वेगाने वाढणारा जीवघेणा प्रकार आहे. त्याला Non-Hodgkin's Lymphoma (NHL) असंही म्हटलं जातं. NHL-DLBCL हा कॅन्सर झालेल्या 100 पैकी 40 व्यक्ती निदान झाल्यानंतर मोठे उपचार केले तरी पाच वर्षांच्या आतच मरण पावतात. 51 वर्षांच्या महिलेला  जून 2018 मध्ये हा कॅन्सर असल्याचं निदान झालं. पण तिला कॅन्सरवर कोणत्याही पारंपरिक पद्धतीचे घ्यायचे नव्हते म्हणून तिने आयुर्वेदिक उपचार घ्यायचं ठरवलं. पुण्यातील डॉ. योगेश बेंडाळे यांच्या रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये तिच्यावर (Rasayu Cancer Clinic) आयुर्वेदिक रसायन चिकित्सेने उपचार केले (Ayurveda Rasayana Therapy). आयुर्वेदाच्या आठ शाखांपैकी रसायन चिकित्सा ही एक महत्त्वाची शाखा आहे. तारुण्य टिकवणं आणि गंभीर आजारांवर उपचार करण्याची मोठी क्षमता या शाखेत आहे. डॉ. बेंडाळे हे अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑन्कॉलॉजी, युरोपीयन सोसायडी ऑफ मेडिकल ऑन्कॉलॉजी, मल्टिनॅशनल असोसिएशन ऑफ सपोर्टिव्ह केअर इन कॅन्सर आदी आंतरराष्ट्रीय संस्थांचे सदस्य आहेत. तसंच, 'सेंट्रल कौन्सिल ऑफ रिसर्च इन आयुर्वेदा अँड सिद्ध'चेही ते सदस्य आहेत. त्यांच्या क्लिनिकमध्ये वर्षाला सुमारे 3500 कॅन्सर पेशंट्सवर उपचार केले जातात. आयुर्वेदिक उपचारांचा डेटा शास्त्रीय पद्धतीने मेन्टेन केल्यास हे उपचार जगातल्या कोणत्याही छाननी पद्धतीतून पार होऊ शकतात, असा विश्वास डॉ. बेंडाळे यांनी व्यक्त केला. हे वाचा - Shocking! Deodorant मुळे मुलीचा मृत्यू; वास घेताच गेला जीव 'इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार डॉ. बेंडाळे यांनी सांगितलं, 'आमच्या टीमने सुरुवातीला ट्यूमरचा (Tumour) आकार कमी करण्याचा प्रयत्न केला. दोन वर्षांच्या रसायन थेरपीच्या काळात रक्ताच्या चाचण्या करून सुरक्षिततेची खात्री केली जात होती. त्यात हिमॅटॉलॉजिकल आणि बायोकेमिकल निकष तपासले जात होते. उपचार किती प्रभावी ठरत आहेत हे Positron Emission Tomography (PET) या चाचणीवरून तपासलं जात होतं. ही चाचणी वेळोवेळी केली जात होती. या उपचारांदरम्यान रुग्णाच्या आयुष्याचा दर्जा अर्थात Quality of Life देखील तपासली जात होती. त्यासाठी जागतिक पातळीवरची प्रश्नावली वापरली जात होती. निदान झाल्यानंतर दीड वर्षाने जेव्हा तपासणी करण्यात आली, तेव्हा (म्हणजेच जानेवारी 2020मध्ये) PET स्कॅनमध्ये लिम्फोमाचं अस्तित्व आढळलं नाही. तसंच रुग्णाचं क्वालिटी ऑफ लाइफदेखील खूप चांगलं होतं.' 'ती महिला कॅन्सरमुक्त झाली. तिच्यावर उपचारांचा कोणताही विपरीत परिणाम झाला नाही. यावरून आयुर्वेदिक थेरपीची सुरक्षितता (Safety of Ayurvedic Therapy) स्पष्ट होते,' असं डॉ. बेंडाळे यांनी सांगितलं. 'दोन दशकांपेक्षा जास्त काळ संशोधन करून ट्रीटमेंटचा प्रोटोकॉल विकसित करण्यात आला. जागतिक पातळीवर मान्यता मिळालेल्या आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक सूचनांच्या आधारे प्रत्येक कॅन्सर पेशंटचं डॉक्युमेटेंशन करण्यात आलं आहे. तसंच आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यावर व्यापक चर्चाही करण्यात आली आहे,' असंही डॉ. बेंडाळे यांनी स्पष्ट केलं. हे वाचा - Alert! Coronavirus नंतर आता Monkeypox virus चं संकट! या लक्षणांकडे दुर्लक्ष पडेल महागात रसायन थेरपी ही आजारकेंद्री किंवा औषधकेंद्री नसून रुग्णकेंद्री आहे. आयुर्वेदात ज्याला धातू म्हटलं जातं, त्या प्रत्येक धातूचं काम योग्य रीतीने चालवण्यास सुरुवात करणं या उद्देशाने रसायन थेरपी केली जाते, असंही डॉ. बेंडाळे यांनी सांगितलं. कॅन्सरच्या रुग्णांमध्ये इम्युन रिस्पॉन्स अर्थात रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. ती सुरळीत होण्याच्या दृष्टीने रसायनांची फॉर्म्युलेशन्स निवडण्यात आली, असंही ते म्हणाले. 'कॅन्सर पेशंटची प्रत्येक बारीकसारीक माहिती नोंदवता येईल, तसंच उपचारांची सुरक्षितता आणि प्रभाव यांचीही नोंद जागतिक पातळीवर निश्चित करण्यात आलेल्या निकषांच्या आधारे करता येईल अशा प्रकारचं सॉफ्टवेअर आम्ही विकसित केलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारे त्या माहितीचं विश्लेषण केलं जातं. कोविड-19च्या काळात टेलिमेडिसिनच्या साह्याने आम्ही दूरवरच्या कॅन्सर पेशंट्सपर्यंत पोहोचलो,' असं डॉ. बेंडाळे यांनी सांगितलं. 'मूळ ग्रंथांवर आधारित असलेलं आयुर्वेदाचं दर्जेदार शिक्षण आणि जागतिक निकषांच्या आधारे पेशंट्सचा काटेकोरपणे नोंद केलेला डेटा यांच्या साह्यानेच आयुर्वेद स्वीकारला जाऊ शकतो. त्यामुळे अन्य डॉक्टर्सना प्रेरणा आणि माहिती मिळू शकते. या महिला रुग्णाची केस पीअर रिव्ह्यूड पब्लिकेशनसाठी पाठवण्याचं कारणही तेच होतं, जेणेकरून आयुर्वेदाबाबत वैज्ञानिक समुदायामध्ये जागृती होऊ शकेल,' असं डॉ. बेंडाळे यांनी सांगितलं. रुग्णावरच्या उपचारांबद्दलचा अहवाल क्लिनिकल केस रिपोर्ट्स या आंतरराष्ट्रीय पीअर रिव्ह्यूड जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.
First published:

Tags: Cancer, Lifestyle, Pune

पुढील बातम्या