कॅन्सरपासून होईल सुटका, नव्या संशोधनामुळे रुग्णांना मिळणार दिलासा

कॅन्सरपासून होईल सुटका, नव्या संशोधनामुळे रुग्णांना मिळणार दिलासा

कॅन्सर रुग्णाला भविष्यात कॅन्सरमुक्त होणं सोपं होणार आहे. माणसाच्या शरीरातील रोगप्रतिकार शक्तीच्या माध्यमातूनच हे शक्य होणार आहे. नवं संशोधन हेच सांगतं.

  • Share this:

मुंबई, 23 जानेवारी: कॅन्सरग्रस्त रुग्णाला भविष्यात कॅन्सरमुक्त होणं सोपं होणार आहे. एका संशोधनातून ही महत्त्वाची बाब समोर आली आहे. नेचर इम्यूनोलॉजी (Nature Immunology) नावाच्या शोधनिबंधात अशी माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत तो प्रयोग प्रत्यक्ष माणसांवर करण्यात आलेला नसला तरी संशोधकांना विश्वास आहे की त्यांचा रिसर्च हा प्रत्यक्ष माणसांवर देखील परिणामकारक ठरू शकेल. कॅन्सर सारखा आजार बरा होणार म्हटलं कि निश्चितच जगभरातील लाखो लोकांना आशेचा किरण दिसू लागतो. त्यामुळे आता एक नवीन शोध लाखो लोकांच्या आयुष्यात एक नवीन आशा घेवून आला आहे.

BBC वर प्रकाशित झालेल्या एका बातमीनुसार माणसाच्या शरीरातील रोगप्रतिकार शक्तीच एक महत्त्वाची गोष्ट आहे. जी कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरवर मात करण्यासाठी सक्षम आहे. ही गोष्ट ब्रिटनच्या कार्डिफ युनिव्हर्सिटीत करण्यात आलेल्या संशोधनात समोर आली आहे. या टीमने जे संशोधन केलं आहे त्यानुसार प्रोस्टेट, ब्रेस्ट, लंग आणि इतरही प्रकारच्या कर्करोगावर मात करण्यासाठी त्यांचं हे संशोधन यशस्वी ठरलं आहे.

हे संशोधन नेमकं काय आहे

संशोधनानुसार शरीराची रोगप्रतिकारशक्ती कोणत्याही प्रकारच्या संसर्गाला स्वत:च संपवू शकते इतकी सक्षम असते. सोबतच कर्करोगाच्या पेशींवरही ती तितकीच प्रभावी ठरू शकते. संशोधकांच्या हाती जी गोष्ट लागली आहे त्यानुसार माणसाच्या रक्तात असलेली टी-सेल संपूर्ण शरीराचं निरीक्षण करत असते आणि शरीरातील कोणत्याही प्रकारच्या ट्यूमरशी लढू शकते. संशोधकांच्या टीमने जी माहिती दिली त्यानुसार हे संशोधन सर्व प्रकारच्या कर्करोगावर परिणाम करणारं आहे. सुरुवातीला याबबात शंका व्यक्त केली जात होती मात्र आता एकटी टी-सेल कर्करोगाशी प्रभावीपणे सामना करू शकते असं काही उदाहरणांवरून समोर येत आहे.

टी-सेल्स जेव्हा रक्तातील कर्करोगाच्या पेशीं शोधून त्यांना संपवते तेव्हा आणखी एक अत्यंत महत्वाचं वैशिष्टय म्हणजे कर्करोगाच्या पेशी नष्ट करत असताना या टी-सेल्स रक्तातील सामान्य पेशींना अजिबात हानी पोहचवत नाहीत. हे जादुई काम या पेशी कसं करतात यावर अद्याप संशोधन होणं बाकी आहे.

कसं काम करतात टी-सेल

कॅन्सरग्रस्त रूग्णाच्या शरीरातून चाचणीसाठी रक्त काढून घेतलं जातं. त्यानंतर त्याला जेनेटिकली मोडीफाय केलं जातं. ज्या माध्यमातून कर्करोगाच्या पेशी नष्ट होतात. काही तज्ज्ञ मात्र या प्रक्रियेशी सहमत नाहीत. स्वित्झर्लंड युनिवर्सिटी ऑफ बेसेलच्या मते नवीन संशोधनात कर्करोगावर मात करणं मोठ्या प्रमाणात शक्य आहे. मात्र, हा उपाय सर्व प्रकारच्या कर्करोगांवर उपायकारक ठरू शकेल असं सांगणं कठीण आहे. तर तिथेच काही तज्ज्ञाचं म्हणणं असं आहे की सध्या अशी अनेक मूलभूत संशोधनं झाली आहेत ज्याच्या आधारावर औषधं बनवणं तितकं सोप काम नाही.

First published: January 23, 2020, 7:42 PM IST

ताज्या बातम्या