Home /News /lifestyle /

Virus करणार Cancer चा खात्मा; पहिल्यांदाच मानवी शरीरात सोडला Cancer Killing Vaxinia

Virus करणार Cancer चा खात्मा; पहिल्यांदाच मानवी शरीरात सोडला Cancer Killing Vaxinia

प्राण्यांवरील यशस्वी चाचणीनंतर कॅन्सर नष्ट करणाऱ्या व्हायरसची मानवी चाचणी सुरू झाली आहे.

वॉशिंग्टन, 25 मे : व्हायरस म्हटलं तरी अनेकांच्या काळजात धस्सं होतं. कारण सध्या सर्वत्र कोरोनाव्हायरसची दहशत आहे. त्यात मंकीपॉक्स व्हायरसचंही संकट आहे. त्यामुळे व्हायरस म्हटलं की धडकीच भरते. पण असाच एक व्हायरस आता जीव वाचवण्यात मदत करणार आहे. हा व्हायरस कोणत्या जीवाचा नव्हे तर जीवघेण्या कॅन्सरचा खात्मा करणार आहे. प्राण्यांवरील यशस्वी चाचणीनंतर आता मानवावरही याची चाचणी सुरू करण्यात आली आहे. व्हॅक्सिनिया (Vaxinia) हा कॅन्सर किलिंग व्हायरस (Cancer Killing Virus) म्हणजे कर्करोगाचा खात्मा करणारा विषाणू पहिल्यांदाचा मानवी शरीरात सोडण्यात आला आहे. कॅन्सरवर अनेक प्रकारचे उपचार करता येत असले, तरी सहसा तो असाध्य आजारच असतो. अगदीच पहिल्या टप्प्यात त्याचं निदान झालं, तरच कॅन्सरच्या रुग्णाला जीवदान मिळतं. अन्यथा उपचारांचा खूप प्रभावी उपयोग होत नाही. कॅन्सरवरचे नवनवे प्रभावी उपचार शोधून काढण्यासाठी वैद्यकीय शास्त्रज्ञ अहोरात्र संशोधन करत असतात. अशाच संशोधनातून कॅन्सर नष्ट करणारा व्हायरस व्हॅक्सिनिया सापडला.  हा कॅन्सर किलिंग व्हायरस  रुग्णाच्या शरीरातली आतडी, स्तन, गर्भाशय, स्वादुपिंड आदी अवयवांमध्ये तयार झालेल्या कॅन्सरच्या ट्यूमर्सचा (Cancerous Tumours) आकार कमी करण्यात यशस्वी ठरला असल्याचं प्राण्यांवर, तसंच प्री-क्लिनिकल लॅबोरेटरीत केलेल्या प्रयोगात आढळलं आहे. आता माणसांवरही याची चाचणी सुरू झाली आहे. हे वाचा - दोनपेक्षा जास्त वेळा वापराल तर कारवाईच; तळलेलं Oil पुन्हा वापरल्याने नेमकं असं होतं तरी काय? अमेरिकेतल्या कॅन्सर संशोधन आणि उपचारांबद्दलच्या मोठ्या संस्थांपैकी एक असलेल्या (City of Hope) एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपल्या प्रयोगाची माहिती दिली आहे. सिटी ऑफ होप संस्थेतल्या मेडिकल ऑन्कॉलॉजी आणि थेराप्युटिक्स रिसर्च विभागातले प्रमुख संशोधक दानेंग ली यांनी सांगितलं, 'ऑन्कॉलायटिक व्हायरस शरीरातल्या प्रतिकारशक्तीला प्रोत्साहन देऊन कॅन्सरला प्रतिसाद देण्याची आणि मारण्याची क्षमता देऊ शकतात, असं अगोदरच्या संशोधनात आढळलं होतं. तसंच हा व्हायरस अन्य इम्युनोथेरपीजना अधिक प्रतिसाद देण्यासाठीही प्रतिकारशक्तीला प्रोत्साहन देतात. आता इम्युनोथेरपीची ताकद अधिक आजमावण्याची गरज आणि काळ आहे. CF33-hNIS (Vaxinia) या कॅन्सर-किलिंग व्हायरसमध्ये रुग्णांचा कॅन्सरविरुद्धचा लढा अधिक प्रभावी होण्याची क्षमता दिसून येत आहे.' ज्या कॅन्सर पेशंट्सना सध्याच्या रूढ उपचारपद्धतींमधल्या किमान दोन टप्प्यांतले उपचार दिले गेले आहेत, अशा मेटास्टॅटिक (Metastatic) किंवा अ‍ॅडव्हान्स्ड सॉलिड ट्यूमर्स (Advanced Solid Tumours) असलेल्या पेशंट्सना या व्हायरसचा Low Dose दिला जाणार आहे. हा डोस एक तर थेट ट्यूमरमध्ये इंजेक्शनद्वारे दिला जाणार आहे किंवा इंट्राव्हेनस इंजेक्शनद्वारे दिला जाणार आहे. ही चाचणी सुमारे दोन वर्षं चालणार आहे. त्यादरम्यान अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातल्या सुमारे 100 पेशंट्सवर उपचार केले जाणार आहेत. हे वाचा - Shocking! अंत्यसंस्कारावेळी अचानक रडू लागलं 'मृत बाळ'; आईच्या गर्भातच झाला होता मृत्यू मेटास्टॅटिक आणि शेवटच्या टप्प्यातल्या ट्यूमर्सवर उपचारांसाठी महत्त्वाचा टप्पा या संशोधनामुळे गाठला गेला असल्याचं मत Imugene चे एमडी आणि सीईओ Leslie Chong यांनी व्यक्त केलं.
First published:

Tags: Cancer, Health, Lifestyle

पुढील बातम्या