या Viral Photo मधून बिबट्या शोधून दाखवाच!

बिबट्याचा फोटो व्हायरल होण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही हिमाचल प्रदेशमधली स्पिती येथील बर्फातील बिबट्याचा फोटो व्हायरल झाला होता.

News18 Lokmat | Updated On: Oct 1, 2019 09:10 AM IST

या Viral Photo मधून बिबट्या शोधून दाखवाच!

सोशल मीडियावर बिबट्याचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या फोटोतील बिबट्या शोधण्यासाठी सोशल मीडियावर हजारो लोक आपली बुद्धीमत्ता लावत आहेत. शुक्रवारी बेला लैक नावाच्या एका ट्विटर अकाउंटवरून एक फोटो शेअर केला. या फोटोला कॅप्शन देताना लिहिले की, या फोटोमध्ये असलेला बिबट्या शोधून दाखवा. यानंतर युझरने लिहिले की, मला हा फोटो दुसऱ्या कोणी तरी पाठवला होता. सुरुवातीला मला यात बिबट्या नसेल असंच वाटलं होतं. पण नीट या फोटोकडे पाहील्यानंतर मला बिबट्या दिसला.

Loading...

या फोटोमध्ये बिबट्याला शोधणं तसं फार कठीण आहे. तुम्हाला या फोटोत कुठे दिसत असेल तर पाहा.. पण जर तुम्हाला यात बिबट्या दिसला नाही तर वाईट वाटून घेऊ नका.. कारण तुम्ही काही एकटेच नाहीत, ज्यांना फोटोत बिबट्या दिसला नाही. आतापर्यंत या फोटोला सात हजारांहून अधिक लाइक मिळाले असून अनेकांनी कमेन्टही केल्या आहेत.

बेला लॅक नावाच्या महिलेने फोटो शेअर करत म्हटलं की, जोपर्यंत मला बिबट्या दिसला नाही तोवर मला हा फोटो फेक असल्याचं वाटलं. तुम्हाला तरी बिबट्या दिसला का? यावर एका युझरने लिहिले की, मला बिबट्या शोधून काढायला फक्त पाच मिनिटं लागली. अजून एका युझरने लिहिले की, त्याला बिबट्या शोधून काढायला फक्त काही सेकंद लागले.

बिबट्याचा फोटो व्हायरल होण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही हिमाचल प्रदेशमधली स्पिती येथील बर्फातील बिबट्याचा फोटो व्हायरल झाला होता.

दररोज आंघोळ केल्यास तुमची ही ताकद होते कमी

पुरुषांच्या या 5 गोष्टींवर जीव ओततात मुली, तुम्हीही घ्या जाणून!

कुटुंबातील 11 लोकांनी एकमेकांशीच केलं 23 वेळा लग्न, नंतर घेतला घटस्फोट!

VIDEO: भिडेंना डॉक्टरांना दाखवण्याची गरज- जितेंद्र आव्हाड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Oct 1, 2019 09:10 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...