मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /केवळ 6 सेकंदात शोधता येतो समुद्राच्या तळाशी लपलेला मासा, त्यासाठी 'ही' युक्ती वापरा!

केवळ 6 सेकंदात शोधता येतो समुद्राच्या तळाशी लपलेला मासा, त्यासाठी 'ही' युक्ती वापरा!

समुद्राच्या तळाशी दगडांमध्ये लपलेला मासा शोधण्यासाठी केवळ 6 सेकंदांचा वेळ

समुद्राच्या तळाशी दगडांमध्ये लपलेला मासा शोधण्यासाठी केवळ 6 सेकंदांचा वेळ

ऑप्टिकल इल्युजनच्या फोटोंमुळे बुद्धीला चालना मिळते, एकाग्रता वाढते. हे खरं असलं तरी ही कोडी सोडवणं प्रत्येकाला जमत नाही.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 1 एप्रिल- दृष्टिभ्रमाचा उपयोग अनेक बुद्धिमत्ता चाचण्यांमध्ये केला जातो. काही दृष्टिभ्रम तुमचं व्यक्तिमत्त्वं तपासतात, तर काही तुमचा दृष्टिकोन तपासतात. डोळे पाहतात ते खरं नसून वास्तव काही वेगळं आहे, हे मेंदू कशा पद्धतीनं स्वीकारतो, समजून घेतो यावरच हा सगळा खेळ असतो. सोशल मीडियावर या दृष्टिभ्रम चाचण्या खूप लोकप्रिय आहेत. यांचा वापर करून आपली बुद्धिमत्ता तपासण्याची अनेकांना इच्छा होते. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यात समुद्राच्या तळाशी असलेल्या काही दगडांमध्ये एक मासा लपलाय. त्याला 6 सेकंदांच्या आत शोधण्याचं आव्हान आहे.

    ऑप्टिकल इल्युजनच्या फोटोंमुळे बुद्धीला चालना मिळते, एकाग्रता वाढते. हे खरं असलं तरी ही कोडी सोडवणं प्रत्येकाला जमत नाही. सांगितलेल्या वेळेत ही कोडी सोडवणाऱ्यांची बुद्धिमत्ता खरोखरच अफाट असते. सध्या व्हायरल होणाऱ्या फोटोमध्येही युजर्सना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. कारण यात माशाला शोधण्यासाठी केवळ 6 सेकंदांचा अवधी आहे.

    वाचा-दैनंदिन राशी भविष्य: प्रवासात जपून रहा, आजचा दिवस चांगला

    एकाच रंगाच्या, एकसारख्या दिसणाऱ्या सागरी तळातील दगडांमध्ये एक मासा लपला आहे. तो मासाही दगडांच्याच रंगाचा असल्यानं त्याला शोधणं आणखी अवघड बनलंय. मात्र यालाच हिंट समजून तुम्ही माशाचा शोध घेऊ शकता. खरंतर तो मासा दगडांच्या खाली लपलेला नसून तो समोरच आहे. आकार आणि रंग दगडांसारखा असल्यानं त्याला शोधणं अवघड आहे. तरीही प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. नाहीच सापडला तर सोबत दिलेल्या फोटोमध्ये तो मासा तुम्हाला पाहता येईल.

    वाचा-एप्रिलच्या 1 तारखेलाच का बनवलं जातं मूर्ख? खूप रंजक आहे एप्रिल फूलचा किस्सा

    दृष्टिभ्रमाची छायाचित्र बुद्धीचा कस पाहणारी असतात. यात डोळ्यांना दिसतं तेवढंच सत्य नसून बुद्धिनुसार तर्क लावायचा असतो. अनेकांना ही कोडी उलगडत नाहीत. जे खरोखर बुद्धिमान असतात, त्यांनाच ते शक्य होतं.

    मानसशास्त्रातही दृष्टिभ्रमाचा उपयोग केला जातो. मानवी स्वभावाचे कंगोरे शोधण्यासाठी ही चित्रं मदत करतात. काही चित्रं व्यक्तीमत्त्वाचा शोध घेण्यासाठी तयार केलेली असतात, तर काही चित्र बुद्धीचा कस पाहणारी असतात. प्रत्येक चित्राकडे पाहण्याचे अनेक दृष्टीकोन असतात. त्यानुसार त्या त्या व्यक्तीचं स्वभाववैशिष्ट्य कळू शकतं. त्यामुळेच मानसोपचार तज्ज्ञांकडून दृष्टिभ्रमाच्या चित्रांचा वापर उपचारपद्धती म्हणून केला जातो. दृष्टीभ्रमाची चित्र पाहून त्यातील कोडी सोडवून लोक स्वतःच्या बुद्धिमत्तेची परीक्षा करू शकतात. अर्थात ही काही ठोस परीक्षा नसते. मात्र यात मनोरंजनही होत असल्यामुळे अनेक जण दृष्टिभ्रमाची रहस्य सोडवतात.

    First published:
    top videos

      Tags: Lifestyle