मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /प्रेग्नेन्सीत दारूचा एखादा पेग घेतला, तर चालतो का?

प्रेग्नेन्सीत दारूचा एखादा पेग घेतला, तर चालतो का?

अनेक ठिकाणी गर्भारपणातही महिला दारूचं व्यसन करीत असल्याचं पाहायलं मिळतं. काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं?

अनेक ठिकाणी गर्भारपणातही महिला दारूचं व्यसन करीत असल्याचं पाहायलं मिळतं. काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं?

अनेक ठिकाणी गर्भारपणातही महिला दारूचं व्यसन करीत असल्याचं पाहायलं मिळतं. काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं?

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    नवी दिल्ली, 26 डिसेंबर : अलीकडे पुरुषांप्रमाणेच अनेक स्त्रियाही मद्यपान आणि धूम्रपान करतात. पुरुष किंवा स्त्री कोणासाठीही, दारू आणि सिगारेट हे शरीरासाठी घातक असतात, हे आपल्याला माहितीच आहे. याशिवाय, स्त्रीच्या गर्भात असलेल्या बाळावरदेखील याचे मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होत असल्याचं समोर आलं आहे. ऑस्ट्रियातल्या व्हिएन्ना विद्यापीठात याबाबत एक महत्त्वाचं संशोधन करण्यात आलं आहे. या संशोधनामधून असं समोर आलं, की गर्भधारणेदरम्यान अल्कोहोलचं थोडंसं सेवनदेखील बाळाच्या मेंदूच्या संरचनेत बदल घडवून आणू शकतं. म्हणजेच दारूमुळे बाळाच्या मेंदूच्या विकासावर परिणाम होऊ शकतो.

    व्हिएन्ना युनिव्हर्सिटीतल्या बायोमेडिकल इमेजिंग विभागातल्या रेडिओलॉजी विषयाचे असोसिएट प्रोफेसर आणि या संशोधनाचे लेखक डॉ. ग्रेगोर कॅसप्रियन म्हणाले, "आमच्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे, की गरोदरपणात आईने कमी-अधिक प्रमाणात मद्यपान केल्यानं बाळाच्या मेंदूची रचना बदलू शकते. या संशोधनासाठी आम्ही फीटल एमआरआयची मदत घेतली होती. ही एक अतिशय खास आणि सुरक्षित निदान पद्धत आहे. फीटल एमआरआयच्या माध्यमातून आपल्याला बाळाच्या जन्मापूर्वीच त्याच्या मेंदूच्या परिपक्वतेचा अचूक अंदाज लावण्यास मदत होते."

    या संशोधनात ग्रेगोर आणि त्यांच्या टीमच्या लक्षात आलं, की अल्कोहोलच्या संपर्कात असलेल्या गर्भांचा एकूण परिपक्वता स्कोअर (एफटीएमएस) लक्षणीयरीत्या कमी होता. एफटीएमएस ही मेंदूच्या परिपक्वतेची गणना करणारी एक प्रणाली आहे. ती कमी असली म्हणजे मुलाच्या मेंदूची एकंदरीत वाढ कमी असते. यासोबतच, असंही लक्षात आलं की, आईने मद्यपान केल्यास बाळांच्या मेंदूतला सुपीरियर टेम्पोरल सल्कस (एसटीएस) नावाचा भागही योग्य प्रकारे विकसित होत नाही. एसटीएस हा भाग माणसामध्ये सामाजिक जाणिवा, पाहण्याची-ऐकण्याची-समजण्याची, एकाग्रतेची क्षमता निर्माण करतो.

    Stretch Marks : डिलिव्हरीनंतरचे स्ट्रेच मार्क्स घालवणं होईल सोपं, करा हे घरगुती उपाय

    डॉ. ग्रेगोर कॅसप्रियन यांनी सांगितलं, की गर्भधारणेदरम्यान अल्कोहोलच्या सेवनानं बाळाला अनेक विकार होऊ शकतात. याला फीटल अल्कोहोल स्पेक्ट्रम डिसऑर्डर म्हणतात. असं झाल्यास जन्मानंतर बाळाच्या शिकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. त्याला बोलण्यातही अडचण येऊ शकते. याशिवाय, वर्तणुकीच्या समस्या होऊ शकतात. अशी मुलं सामान्य मुलांपेक्षा जास्त आक्रमक असतात. त्यांना इतर माणसांमध्ये मिसळण्यातही अडचण येते.

    या संशोधनासाठी, संशोधकांनी 24 गर्भांच्या एमआरआय स्कॅनचं विश्लेषण केलं. या बाळांच्या मातांनी अल्कोहोल सेवन केलं होतं आणि त्याचा आपल्या बाळावर परिणाम होईल, अशी त्यांना भीती होती. हे सर्व गर्भ 22 ते 36 आठवड्यांच्या दरम्यानचे होते. त्यांच्या मूल्यांकनासाठी, संशोधन पथकाने मुलांच्या मातांकडून गर्भधारणेदरम्यान अल्कोहोलच्या सेवनाबाबत सविस्तर माहिती घेतली होती.

    या रिसर्चचे आणखी एक लेखक पॅट्रिक किनास्ट म्हणाले, "दुर्दैवानं अनेक गरोदर महिलांना गर्भधारणेदरम्यान गर्भावर अल्कोहोलच्या होणाऱ्या परिणामांबद्दल फारशी माहिती नसते. त्यामुळे केवळ संशोधनच नाही, तर गर्भावर अल्कोहोलचा काय परिणाम होतो याविषयी लोकांना जागरूक करणं ही आपली जबाबदारी आहे. कारण ही फार गंभीर बाब आहे."

    पॅट्रिक किनास्ट म्हणतात, "आम्हाला टेम्पोरल ब्रेन रिजनमध्ये आणि एसटीएसमध्ये सर्वांत मोठे बदल आढळले. मेंदूच्या या भागांचा मुलाच्या भाषेच्या विकासावर मोठा प्रभाव पडतो. म्हणजेच हे दोन्ही भाग नीट विकसित न झाल्यास मुलाला नंतर बोलण्यात अडचण येण्याची शक्यता असते. अल्कोहोलचा फारसा प्रभाव नसलेल्या गर्भांच्या मेंदूमध्येही बदल दिसून आले. आम्ही या रिसर्चसाठी मूल्यांकन केलेल्या 24 महिलांपैकी 17 महिला इतरांच्या तुलनेत कमी दारू प्यायल्या होत्या. त्या आठवड्यातून एकदाच ड्रिंक करत होत्या. असं असूनही संशोधनात गर्भाच्या मेंदूवर त्याचे दुष्परिणाम आढळले आहेत."

    गरोदर महिलांनी अल्कोहोल टाळावं

    पॅट्रिक किनास्ट यांनी गरोदर महिलांना दारूपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, "आम्हाला आमच्या अभ्यासात असं आढळलं आहे, की अल्कोहोलचं कमी-अधिक प्रमाणात सेवन केल्यानं मुलांच्या मेंदूच्या विकासात बदल होऊ शकतो. बाळाच्या मेंदूच्या परिपक्वतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गरोदर महिलांनी दारू टाळावी."

    First published:
    top videos

      Tags: Alcohol, Pregnancy, Small baby