मुंबई, 18 जानेवारी : गर्भधारणा टाळण्यासाठी (For ignoring pregnancy) कंडोमचा वापर हा एक चांगला मार्ग मानला जातो. पण जोडीदारासोबतच्या काही खास क्षणांमध्ये कंडोमचा वापर करूनही (Despite using condoms) अनेक वेळा महिला गर्भवती होतात. हेल्थलाइनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार, लोक अनेकदा काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे असे घडते. जर तुम्ही गर्भधारणा टाळण्यासाठी कंडोम वापरत असाल तर तुम्हाला कंडोमबद्दल काही गोष्टी माहित (You need to know about condoms) असणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्ही अनावश्यक गर्भधारणा टाळू शकता.
योग्य पद्धतीने वापर न करणे
बरेच लोक घाईगडबडीत कंडोम वापरतात. पण त्याचा योग्य वापर होतोय की नाही याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता निर्माण होते. म्हणूनच त्याचा योग्य वापर करणे महत्त्वाचे आहे.
डबल कंडोमचा वापर
अनेक वेळा लोक गर्भधारणा टाळण्यासाठी महिला आणि पुरुष अंतर्गत आणि बाह्य दोन्ही दोघंही कंडोम वापरतात, जो योग्य मार्ग नाही. एकच कंडोम वापरणे केव्हाही चांगले. तुम्हाला अधिक सुरक्षित व्हायचे असेल तर तुम्ही IUD, इम्प्लांट किंवा गर्भनिरोधक गोळ्या वापरू शकता.
Sex Education | महिलांच्या सेक्स लाईफविषयी असलेला मोठा गैरसमज..
कंडोम न तपासणे
कंडोम वापरण्यापूर्वी, ते पूर्णपणे तपासणे महत्वाचे आहे. कधीकधी कंडोममध्ये बारीक छिद्र किंवा कट देखील होऊ शकतो. असा कंडोम वापरल्याने गर्भधारणा टाळता येणे दुरच उलट त्याची शक्यता वाढते.
एक्सपायरी तारीख न तपासणे
कंडोम खरेदी करताना, पॅकवर असलेली एक्सपायरी डेट तपासणे देखील खूप महत्वाचे आहे. हा पॅक बराच काळ घरात ठेवला असला तरी त्याची तारीख एकदा तपासणे गरजेचे आहे. एक्सपायरी डेटचा कंडोम वापरल्याने तो फुटू शकतो, ज्यामुळे गर्भधारणा होऊ शकते.
Sex Education | आऊटरसकोर्स म्हणजे काय रं भाऊ?
देखभालीकडे दुर्लक्ष
बरेच लोक कंडोमच्या देखभालीकडेही लक्ष देत नाहीत, ते खिशात, पाकीटात किंवा कारमध्ये कुठेही ठेवतात. खरंतर तो ड्रॉवर किंवा कपाटासारख्या थंड ठिकाणी ठेवावा लागतो. एक किंवा दोन कंडोम वापरण्यापूर्वी काही काळ पर्समध्ये किंवा खिशात ठेवता येतात. परंतु, ते जास्त वेळ खिशात, पर्समध्ये किंवा कारमध्ये ठेवल्यास उष्णतेमुळे आणि घर्षणामुळे खराब होऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.