Home /News /lifestyle /

Hajj Yatra : हज यात्रेला कोण जाऊ शकतं? अशी आहे नियमावली

Hajj Yatra : हज यात्रेला कोण जाऊ शकतं? अशी आहे नियमावली

कोणत्याही वयोगटातली मुस्लिम व्यक्ती हज यात्रेला जाऊ शकते. परंतु, हज यात्रेला जाण्याकरिता अजून एक महत्त्वाची अट असते

कोणत्याही वयोगटातली मुस्लिम व्यक्ती हज यात्रेला जाऊ शकते. परंतु, हज यात्रेला जाण्याकरिता अजून एक महत्त्वाची अट असते

कोणत्याही वयोगटातली मुस्लिम व्यक्ती हज यात्रेला जाऊ शकते. परंतु, हज यात्रेला जाण्याकरिता अजून एक महत्त्वाची अट असते.

    मुंबई, 27 नोव्हेंबर : मुस्लिम धर्मात (Muslim Religion) हज यात्रेला (Hajj Yatra) अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक मुस्लिम व्यक्तीसाठी हज यात्रा हे पवित्र कार्य असतं. मुस्लिम व्यक्तीनं जीवनात एकदा तरी हज यात्रा करावी, असं सांगितलं जातं. दर वर्षी हज यात्रेसाठी लाखो मुस्लिम बांधव अर्ज करतात. परंतु, भाग्यवान व्यक्तीच हजला जाऊ शकतात. सध्या हज यात्रेसाठीची अर्जप्रक्रिया (Application Process) सुरू असून, 31 जानेवारीपर्यंत याकरिता अर्ज करता येणार आहे. हज यात्रेला जाण्यासाठी काही विशिष्ट नियम (Rules) असतात आणि त्या नियमांचं पालन आवश्यक असतं. तसंच हज यात्रा करण्यासाठी विशिष्ट कालावधी ठरलेला असतो. अन्य धर्मांतल्या नागरिकांच्या मनात हज यात्रेविषयी अनेक प्रश्न असतात. त्यात हज यात्रा मुस्लिम धर्माव्यतिरिक्त अन्य धर्मांतले नागरिक करू शकतात का, या यात्रेचा कालावधी नेमका किती असतो, यासाठी वयाचं बंधन असतं अशा प्रश्नांचा समावेश असतो. हज यात्रेला जाण्यासाठी आधी अर्जप्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यानंतर दिलेल्या क्रमांकाच्या आधारे नावं निवडली जातात. निवड झाल्यानंतर दस्तऐवजांसह 25 टक्के शुल्क जमा करावं लागतं. त्यानंतर हज कमिटी (Hajj Committee) संबंधित व्यक्तीचा व्हिसा आणि तिकिटाची तजवीज करते. संपूर्ण हज यात्रेला 40 दिवस लागतात आणि या दरम्यान अनेक परंपरा पाळल्या जातात, अशी  माहिती `टीव्ही नाइन हिंदी`ने प्रसिद्ध केली आहे. video: तेजस्वीच्या बोलण्यावर सलमान भडकला; क्षणात केली बोलती बंद! अनेक मुस्लिम तज्ज्ञांच्या मते, हज यात्रेला जाण्यासाठी सर्वांत महत्त्वाची अट म्हणजे, ती व्यक्ती मुस्लिम असणं आवश्यक आहे. याचाच अर्थ अन्य धर्मांतल्या व्यक्ती ही यात्रा करू शकत नाहीत. कोणत्याही वयोगटातली मुस्लिम व्यक्ती हज यात्रेला जाऊ शकते. परंतु, हज यात्रेला जाण्याकरिता अजून एक महत्त्वाची अट असते. ही अट म्हणजे, ज्या व्यक्तीवर कर्ज (Loan) आहे, ती व्यक्ती हजला जाऊ शकत नाही. तसंच कर्जातून मिळालेले पैसे घेऊन व्यक्ती हजला जाऊ शकत नाही. तसंच त्या व्यक्तीकडे चुकीच्या मार्गानं मिळवलेले पैसे नसावेत. इस्लामिक कॅलेंडरनुसार, 12 व्या महिन्याच्या 8 ते 10 तारखेदरम्यान हज यात्रा असते. बकरी ईदपूर्वी काही दिवस हज यात्रा सुरू होते आणि बकरी ईदच्या दिवशी ही यात्रा पूर्ण होते. पाकिस्तानी अंपायर अलीम दार थोडक्यात बचावले, बुलेट थ्रो डोक्यावर आपटला, VIDEO 40 दिवसांच्या हज यात्रेदरम्यान अनेक परंपरा पाळल्या जातात. या यात्रेदरम्यान मदिना येथे 10 दिवस राहून मक्केला जावं लागतं. त्यानंतर अन्य ठिकाणी जाता येतं. ज्या व्यक्ती केवळ हज यात्रेला जातात त्या 8, 9, 10 तारखेला होणाऱ्या मुख्य हज यात्रेत सहभागी होतात. काही नागरिक कमी दिवसांकरितादेखील हज यात्रेला जातात.
    First published:

    पुढील बातम्या