नवी दिल्ली, 01 जानेवारी: ओडिसा (Orissa) आणि छत्तीसगड (Chhattisgarh) राज्यातील आदिवासी भागात (Tribal area) लाल मुंग्यांची चटणी (Red ant chutney) खाल्ली जाते. या लाल मुंग्यांच्या चटणीचा वापर कोविड -19 विषाणूवर (Covid -19 ) केला जाऊ शकतो, असा दावा काही जण करत आहेत. हा दावा कितपत खरा आहे हे तपासण्यासाठी आयुष मंत्रालयाने संशोधन करावं, असा आदेश हायकोर्टाने दिला आहे. त्यामुळे आयुष मंत्रालय (AYUSH Ministry) लवकरच कोरोना विषाणूचं औषध (Corona vaccine) म्हणून या लाल मुंग्यांच्या वापराला मान्यता देण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गुरुवारी ओडीसा उच्च न्यायालयाने (Odisha high court) अशा प्रकारच्या औषध निर्मितीवर निर्णय घेण्यासाठी आयुष मंत्रालयाला तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे.
इंग्रजी वर्तमानपत्र टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, ओडीसा उच्च न्यायालयानं आयुष मंत्रालय आणि काउंसिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चच्या संचालकांना लवकरात लवकर याबाबत निर्णय घेण्यास सांगितलं आहे. न्यायालयानं कोविड -19 च्या उपचारात लाल मुंग्यांच्या चटणी वापरण्याच्या प्रस्तावार तीन महिन्यांच्या आत निर्णय घेण्यास सांगितला आहे. विशेष बाब म्हणजे, देशातील बर्याच राज्यांतील आदिवासी भागांत ताप, सर्दी, थंडी, श्वास घेण्यास त्रास, थकवा आणि इतर आजारांवर उपचार करण्यासाठी लाल मुंग्यांच्या चटणीचा वापर केला जातो.
या चटणीमध्ये लाल मुंग्या आणि हिरव्या मिरच्या असतात. ओडिसा उच्च न्यायालयानं जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान हा आदेश दिला आहे. या याचिकेत लाल मुंग्यांच्या चटणीच्या परिणामाबाबत कोठेही दखल घेतली जात नसल्याने न्यायालयाने हस्तक्षेप करावा यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका बारीपाडा येथील इंजिनीअर नायधर पाढीयाल यांनी दाखल केली होती. यापूर्वी जूनमध्ये पाढीयाल यांनी विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी चटणी वापरण्याविषयी भाष्य केलं होतं. यानंतर त्यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली.
काय असतं या मुंग्यांच्या चटणीत?
पाढीयाल यांच्या मते, चटणीमध्ये फॉर्मिक अॅसिड, प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 12, जिंक आणि लोह असते. ही मुलद्रव्ये आपली रोगप्रतिकारक शक्तीत सुधारणा करतात. त्यांनी पुढं सांगितलं की, 'ओडीसा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा आणि मेघालय या राज्यांतील अनेक ठिकाणी लाल मुंग्यांचे सेवन केले जाते. तसेच याचा बर्याच रोगांवर उपचार म्हणून वापर केला जातो. करतात.' पाढीयाल यांच्या मते, आदिवासी भागात कोविड -19 चा प्रादुर्भाव कमी असण्यामागे हे देखील एक कारण असू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona