मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /कमी वयात लग्न, दोनदा तलाक, अबॉर्शन: एका Gym trainer ची प्रेरणादायी कहाणी

कमी वयात लग्न, दोनदा तलाक, अबॉर्शन: एका Gym trainer ची प्रेरणादायी कहाणी

केरळच्या कॅलिकट मध्ये राहणाऱी जॅस्मीन फिटनेस ट्रेनर आहे.

केरळच्या कॅलिकट मध्ये राहणाऱी जॅस्मीन फिटनेस ट्रेनर आहे.

Inspiring Story: अशाही काही व्यक्ती सापडतील ज्यांनी खरंच संघर्षामधून आयुष्य घडवलं आहे. त्यांच्या जीवन कहाणी पाहिली की खरचं कडक सॅल्यूट करावासा वाटतो.

थिरुवनंतपुरम, 11 मे: समाजात अशी अनेक उदाहरणं असतील की, ज्यांच्याकडे संधी असूनही त्यांनी आयुष्य केवळ सुखात जगण्यात घालवलं आहे. इतरांपेक्षा सगळ्या संधी मिळूनही त्यांना त्याचं सोनं  करता आले नाही. याउलट अशाही काही व्यक्ती सापडतील ज्यांनी खरच संघर्षामधून आयुष्य घडवलं आहे. त्यांच्या जीवन कहाणी पाहिली की खरचं कडक सॅल्यूट (Salute) करावासा वाटतो.

केरळच्या जॅस्मीन मूसाची (Jasmine m moosa )कहाणी ऐकली तर, असाच कडक सॅल्यूट तुम्ही ठोकाल. केरळच्या कॅलिकट (Calicut) मध्ये राहणाऱी जॅस्मीन फिटनेस ट्रेनर (Fitness Trainer) आहे. तिने स्वत:चा ट्रान्सफॉर्मेशन व्हीडिओ (Transformation video) बनला. जो खुप पॉप्युलर झाला. त्यानेच तिला चांगली ओळख दिली.

(नेपाळच्या पंतप्रधानांना मोठा झटका, स्वकीयांमुळेच अविश्वास ठरावात खाल्ली आपटी)

पण जॅस्मीनचा हा प्रवास फार खडतर होता. जॅस्मीन अस्पवयीन असताना वयाच्या 17व्या वर्षीच तिचं अनोळखी व्यक्तीबरोबर लग्न करण्यात आलं. लग्नानंतर तिचा छळ सुरू झाला. तिचा पती तिचा वेळोवेळी अपमान करायचा. तिला तिच्या घरात महत्व नव्हतं. दिवसं जसजसे पुढे गेले तसा पतीचा त्रासही वाढायला लागला. पुढे तिला मारहाणही होऊ लागली. त्यानंतर तिचा तलाक (Divorce) झाला.

" isDesktop="true" id="549587" >

तलाकनंतरही तिचा त्रास संपला नाही. उलट घरी परतल्यावर तिच्या लक्षात आलं की, तलाक झालेली मुलगी कुटूंबासाठी ओझ बनलेली आहे. तिच्या घरच्यांनी तिच्यासाठी स्थळ पहायला सुरुवात केली. पुन्हा लग्न झालं. हे लग्नही काही वेगळं नव्हतं. हा पतीही शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. काही दिवसांनी ती गर्भवती झाली. मात्र तिच्या दुसऱ्या पतीला याचा आनंद झाला नाही. उलट त्याने तिला मारायला सुरवात केली. त्यातच तिचं अबॉर्शन (Abortion) झालं.

(महिलांनो Alert राहा! तुमच्यासाठी भयंकर ठरतेय कोरोनाची दुसरी लाट कारण...)

दुसऱ्या लग्नामुळे हरलेली जॅस्मीन कोलमडली होती. पण, तिने स्वत:ला सावरलं. यानंतर, जॅस्मीनने स्वत:साठी जगायचं ठरवलं. तिने दुसऱ्या नवऱ्याच्या विरोधात कौटूंबिक हिंसाचाराची (Domestic Violence) तक्रार दिली आणि त्याला जेलचा रस्ता दाखवला आणि आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करायचं ठरवलं. आता तिच्याकडे स्वत:ची ओळख आहे. चांगली नोकरी आहे. यालाच ती खरं यश मानते.

(Instagram वर आपोआप डिलीट झाल्या स्टोरीज; कंपनीने सांगितलं कारण)

समाजात कितीतरी जॅस्मीन वावरत असतील. त्यांच्या हिमतीवर जगत असती. त्यांच्या चेहऱ्यावर हसूही असेल. मात्र त्या हसऱ्या चेहऱ्यामागे किती व्रण असतील हे आपण सांगू शकत नाही.

First published:
top videos

    Tags: Fitness, Inspiration, Inspiring story, Kerala, Success story