Breastfeeding मुळे उद्भवणाऱ्या स्तनांच्या प्रत्येक समस्यांवर उपयुक्त आहे कोबी

Breastfeeding मुळे उद्भवणाऱ्या स्तनांच्या प्रत्येक समस्यांवर उपयुक्त आहे कोबी

स्तनपान (Breastfeeding) करताना महिलांना बर्‍याच समस्यांचा सामना करावा लागतो. सर्वात मोठी समस्या म्हणजे स्तनांमध्ये वेदना आणि सूज.

  • Last Updated: Sep 21, 2020 02:32 PM IST
  • Share this:

आईचे दूध प्रत्येक बाळासाठी अमृत असतं. नवजात मुलाला आईच्या दुधातूनच पोषण मिळतं. ज्यामुळे बाळाला बर्‍याच आजारांपासून संरक्षण मिळतं. स्तनपान देताना महिलांना बर्‍याच समस्यांचा सामना करावा लागतो. सर्वात मोठी समस्या म्हणजे स्तनामध्ये वेदना आणि सूज. या सर्व समस्यांवर घरगुती औषधोपचार केला जाऊ शकतो. स्तनांशी संबंधित समस्या आणि त्यावरील उपायांबद्दल जाणून घेऊया -

मॅसिटाइटिस (स्तनदाह)

myupchar.com शी संबंधित डॉ. विशाल मकवाना यांनी सांगितलं, 70 टक्के स्त्रियांना आयुष्यात कधीतरी स्तनाचा त्रास होतो. मासिक पाळी, संसर्ग, जळजळ आणि स्तनपान ही मुख्य कारणं आहेत. बाळाला स्तनपान दिल्यानंतर अनेक स्त्रियांच्या स्तनाग्रात चीरा पडतात, ज्यामुळे जिवाणू स्तनांमध्ये प्रवेश करतात आणि स्तनातील ऊतींमध्ये जळजळ होते आणि संसर्ग होतो. या स्थितीस मॅसिटाइटिस म्हणजेच स्तनदाह म्हणतात. यामागील सर्वात मोठं कारण म्हणजे जेव्हा आई बर्‍याच दिवसांपासून बाळाला दूध पाजत असते. स्तनांना थोडासादेखील आराम मिळत नसल्याने हा त्रास उद्भवतो. पण या समस्येवर कोबीचा औषध म्हणून वापर करुन मात केली जाऊ शकते.

मॅसिटाइटिसवर कोबी प्रभावी

मॅसिटाइटिस हा एक प्रकारचा जिवाणूजनक संसर्ग आहे, जो प्रतिजैविक उपचारांद्वारे बरा होतो. या संसर्गामुळे स्तनांमध्ये वेदना आणि सूज येत असेल तर कोबी वापरला जाऊ शकतो. यासाठी कोबीची स्वच्छ, कोरडी आणि थंड पानं घ्या. ही पानं स्तनांवर लावा. स्तन कोबीच्या पानांनी पूर्णपणे झाका आणि गरम होईपर्यंत ठेवा. जर स्तनांमध्ये वेदना किंवा रक्तस्त्राव होत असेल तर तो भाग झाकू नका. 20 मिनिटांसाठी हा उपाय करा आणि नंतर पानं काढून टाका. गरज असल्यास हलक्या हातांनी स्तन धुवू शकता. कोबीची वापरलेली पानं पुन्हा वापरू नका. जर आपण स्तनपान करणं थांबवलं असेल तर आपण दिवसातून तीनदा 20-20 मिनिटांसाठी हा उपाय करू शकता.

स्तनातील दूध सुकण्यावर उपाय

मुलाचं स्तनपान थांबवल्यानंतरही बर्‍याच स्त्रियांच्या स्तनांमध्ये दूध तयार होण्याची प्रक्रिया होत राहते. ज्यामुळे त्यांना त्रास होतो. ही समस्या देखील कोबीच्या वापराने दूर केली जाऊ शकते. मॅसिटाइटिसच्या समस्येमध्ये कोबी ज्याप्रमाणे प्रभावी आहे, त्याचप्रमाणे दूध सुकण्यासाठी देखील कोबी फायदेशीर आहे. स्तनांवर कोबीची पानं गरम होईपर्यंत ठेवा. ही प्रक्रिया जमेल तेव्हा करणं फायदेशीर आहे. या प्रक्रियेमुळे काही दिवसांत स्तनांमधून येणारं दूध थांबेल.

स्तनांमध्ये वेदना आणि सूज यावर चांगला उपचार

ब्रेस्ट एगॉर्जमेंट च्या समस्येसाठी कोबीचा वापर हा एक उत्कृष्ट उपाय आहे. काही संशोधनात असं आढळलं आहे की, कोबीची पानं स्तनांवर लावण्यामुळे स्तनांचा त्रास आणि कडकपणा कमी होतो. या उपायामुळे महिलांना कोणताही त्रास न होता बराच काळ आपल्या बाळाला स्तनपान देता येतं. myupchar.com शी संबंधित डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांच्या मते, कोबीच्या वापरामुळे स्तनाचा कर्करोग होण्याचा धोकाही कमी होऊ शकतो.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - घरघुती उपाय

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: September 21, 2020, 1:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading