मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Cabbage Benefits : स्वतः गोलगोल पण तुमचं वजन नक्की कमी करेल; अशा पद्धतीने खा कोबी

Cabbage Benefits : स्वतः गोलगोल पण तुमचं वजन नक्की कमी करेल; अशा पद्धतीने खा कोबी

वजन कमी करण्यात मदत करते पत्ताकोबी

वजन कमी करण्यात मदत करते पत्ताकोबी

वजन कमी करण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करतात. परंतु योग्य आहार घेऊन देखील तुम्ही वजन सहज कमी करू शकता. यासाठी पत्ता कोबी अतिशय प्रभावी भाजी आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 9 जानेवारी : लठ्ठपणामुळे संपूर्ण जग त्रस्त आहे. गेल्या 30 वर्षांत लठ्ठ लोकांची संख्या 3 पट वाढली आहे. डब्यूएचओनुसार आज 2 अब्जाहून अधिक लोक लठ्ठपणाने त्रस्त आहेत. लहान मुले देखील यापासून दूर नाहीत. 2020 च्या आकडेवारीनुसार, 5 वर्षांखालील 3.9 कोटी मुलांचे वजन जास्त आहे. जर एखाद्या प्रौढ व्यक्तीचा बीएमआय 25 पेक्षा जास्त असेल तर त्याचे वजन वाढते परंतु बीएमआय 30 पेक्षा जास्त असल्यास मधुमेह, हृदयविकार, किडनी समस्या, मेंदूची समस्या अशा समस्यांना सामोरे जावे लागते.

जास्त वजन असलेल्या प्रत्येकाची वजन कमी करायची इच्छा असते. यासाठी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत असतात. परंतु योग्य आहार घेऊन देखील तुम्ही वजन सहज कमी करू शकता. अनेक हंगामी भाज्या बऱ्याच आजारावर प्रभावी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. एखादी रेसिपी मिळाली तर अनेकांना ती करून पहावीशी वाटते. कोबीच्या सेवनाने लठ्ठपणा कमी करता येऊ शकतो असे मानले जाते. हिवाळ्यात वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कोबीचे सेवन खूप प्रभावी ठरू शकते.

सहज आणि वेगाने वजन होईल कमी, फक्त रात्री झोपण्यापूर्वी या गोष्टींची घ्या काळजी

पत्ता कोबीमधील गुणधर्म

इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीत डॉ.सुभाष एस. मार्कंडेय लिहितात की क्रूसिफेरस भाज्यांबद्दल खूप चर्चा होते, परंतु पत्ता कोबीबद्दल कमी बोलले जाते. पत्ता कोबी ही एक अष्टपैलू भाजी आहे आणि ती आरोग्यासाठी अनेक प्रकारे उपयुक्त ठरते. यात असलेले अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि इतर अनेक घटक कार्सिनोजेन्सला प्रतिबंधित करते. म्हणजेच कँसरचे कारक असलेले कार्सिनोजेन्स पत्ता कोबीमध्ये आढळतात. कोबीच्या सेवनाने वजन सहज नियंत्रित करता येते. कोबी रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीर निरोगी ठेवते. पत्ता कोबी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहते.

वजन कसे कमी करते?

सुभाष एस. मार्कंडेय लिहितात की कोबीमध्ये फायबर आणि पाणी मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे पचनसंस्था मजबूत राहते, बद्धकोष्ठता दूर होते आणि आतड्यात जमा होणारे सर्व विष निघून जाते. पचनक्रिया मजबूत झाल्याने लठ्ठपणा आपोआप कमी होतो. पत्ता कोबी पाण्यात चांगली उकळली तर त्यात असलेले प्रोबायोटिक गुणधर्मही शरीरात प्रवेश करतात. तसेच कोबीमध्ये चरबी नसते आणि ती खाल्ल्यानंतर भूकही कमी लागते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कोबीमध्ये असलेले फायबर आतड्यांमध्‍ये अॅसिडला बांधून ठेवते. त्यामुळे हानिकारक घटक शरीरातून बाहेर पडतात.

हिवाळ्यात असा करा वापर

हिवाळ्यात पत्ता कोबीमध्ये बॅक्टेरिया असू शकतात, त्यामुळे ती संसर्ग पसरवू शकते. अशा स्थितीत पत्ता कोबी उकळून नीट शिजवून घ्यावी. कोबी आंबवून खाल्ल्याने शरीराला अधिक पोषक तत्वे मिळू शकतात. इतर काही भाज्यांसोबत मिसळून सूप बनवून पिल्यास कोबी अधिक फायदेशीर ठरू शकते. कोबीमध्ये असलेल्या वाताचा प्रभाव कमी करण्यासाठी भाजी बारीक चिरून घ्या आणि तेल आणि मसाले घालून चांगली शिजवावी.

प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही? हे स्टार्चयुक्त पदार्थ आत्ताच आहारातून काढून टाका

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:

Tags: Food, Health, Health Tips, Lifestyle, Weight loss tips