फक्त तीन रुपये खर्च करून असं करा आपलं अकाऊंट सुरक्षित

तुम्ही पुर्ण कुटुंबासाठी ही पॉलिसी खरेदी करू शकता

News18 Lokmat | Updated On: Oct 5, 2018 01:55 PM IST

फक्त तीन रुपये खर्च करून असं करा आपलं अकाऊंट सुरक्षित

मुंबई, ०५ ऑक्टोबर २०१८- एकीकडे टेक्नॉलॉजीचा विस्तार होत आहे, तर दिसरीकडे सायबर क्राइमही वाढत आहे. आपल्याला सायबर क्राइमचा फटका कसा बसणार नाही या विचारातच सारे आहेत. यातून वाचण्याचा एक उपाय म्हणजे तुमच्या अकाऊंटला सायबर सिक्यूरिटीची गरज आहे.

जर तुम्हाला तुमचं अकाऊंट सुरक्षित ठेवायचं असेल तर तुम्हीही एक खास इन्शुरन्स पॉलिसी घेऊ शकता. एचडीएफसी एर्गोने एक सायबर इन्शुरन्स पॉलिसी सुरू केली आहे. यात ५० हजार रुपयांचा विमा दररोज फक्त तीन रुपये देऊन घेतली जाते.

एचडीएफसी एर्गोची ही नवीन पॉलिसी अनेक सायबर गुन्हे होण्यापासून तुम्हाला वाचवू शकते. यामध्ये बोगस ऑनलाइन ट्रानझॅक्शन, फिशिंग आणि ईमेल स्पूफिंग, ई-अक्सटॉर्शन, सायबर बुकिंग आणि तुमची ओळख चोरीला जाणं या सगळ्याचा समावेश आहे. एचडीएफसी एर्गोची ही पॉलिसी सर्वसामान्य व्यक्तीसाठी आहे. या पॉलिसीमधून तुम्ही सायबर क्राइम किंवा सायबर अटॅकपासून झालेले नुकसानदेखील भरुन काढू शकता.

एचडीएफसी एर्गोच्या एमडींच्या म्हणण्यानुसार, जागतिक ऑनलाइन बाजार पेठेत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. इथे सायबर इन्शुरन्सचा व्यवसाय वाढवण्याची जास्त गरज आहे. त्यामुळे सायबरमध्ये होणाऱ्या फसवणुकीला आळा बसेल. एचडीएफसी एर्गोच्या या नवीन पॉलिसीमध्ये तुम्ही ऑनलाइन फसवणुकीपासून वाचू शकता. त्याचबरोबर तुम्ही पुर्ण कुटुंबासाठी ही पॉलिसी खरेदी करू शकता. कुटुंबात नवरा, बायको आणि दोन मुलं यांचा समावेश आहे. या पॉलिसीमध्ये सायबरमध्ये होणाऱ्या फसवणुकीचा कायदेशीर खर्च आणि कायदेशीर सल्ला देण्याची व्यवस्थाही उपलब्ध आहे.

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो (NCRB) च्या रिपोर्टनुसार २०१६ मध्ये जगातील सायबर क्राइम घटनांमध्ये ६.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१५ मध्ये सायबर क्राइमचे एकूण ११, ५९२ प्रकरणांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर २०१६ मध्ये ही संख्या १२, ३१७ पर्यंत पोहोचली होती.

Loading...

दोघांनी एका तरुणाला दगडांनी केली मारहाण, धक्कादायक घटना CCTVमध्ये कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 5, 2018 01:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...