S M L

चायनीज पदार्थ खाल्ल्याने येऊ शकतो दम्याचा अटॅक

चायनीज अन्नपदार्थ खाल्ल्यामुळेही दम्याचा अटॅक येण्याचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण श्वसनविकारतज्ज्ञांनी नोंदवले आहे. मोठ्यांसोबत लहान मुलांमधील दम्याचे प्रमाणही या कारणामुळे वेगाने वाढते आहे.

Renuka Dhaybar | Updated On: May 5, 2018 02:32 PM IST

चायनीज पदार्थ खाल्ल्याने येऊ शकतो दम्याचा अटॅक

05 मे : चायनीज अन्नपदार्थ खाल्ल्यामुळेही दम्याचा अटॅक येण्याचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण श्वसनविकारतज्ज्ञांनी नोंदवले आहे. मोठ्यांसोबत लहान मुलांमधील दम्याचे प्रमाणही या कारणामुळे वेगाने वाढते आहे. या नव्या लक्षणाला 'चायनीज रेस्टॉरन्ट सिंड्रोम' असे म्हटले जाते.

चायनीज पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अजिनोमोटोमुळे श्वसनविकार बळावतात. खोकला येणे, धाप लागणे, दम लागल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे असा त्रास होतो. दमा वा श्वसनविकारांची प्रवृत्ती असलेल्या रुग्णांमध्ये अजिनोमोटो अन्नपदार्थांद्वारे शरीरात गेल्यास श्वसननलिका सुजते व त्यातून कोणत्याही क्षणी दम्याचा झटका येण्याची शक्यता असते.

या सिन्ड्रोमविषयी जनजागृती करण्याची गरज असल्याचे बॉम्बे रुग्णालयाच्या श्वसनविकार विभागाच्या प्रमुख डॉ. अमिता नेने यांनी व्यक्त केले.

दमेकरी रुग्णांचे प्रमाण

- मुंबईमध्ये पालिकेच्या 4 प्रमुख रुग्णालयांमध्ये ७ हजार ८५२ रुग्णांनी ऑक्टोबर २०१५ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीमध्ये दम्यावरील उपचार घेतले आहेत.

Loading...
Loading...

- पंधरा उपनगरीय रुग्णालयांमध्ये दोन वर्षांत दमेकरी रुग्णांचे प्रमाण ६.११ टक्के इतके नोंदवण्यात आले आहे.

- या उपनगरीय रुग्णालयांमधून ३२ हजार १५८ रुग्णांनी दम्यासाठी उपचार घेतले आहेत.

- छोट्या दवाखान्यांमध्ये ५१ हजार ६१९ रुग्णांना दम्याचा त्रास असल्यामुळे औषधोपचार देण्यात आले आहेत.

- खोकला, धाप लागते, श्वसनविकार बळावतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 5, 2018 02:32 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close