मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

1BHK, 2BHK सोडा आता! 50 लाख रुपयांत घेऊन टाका एक बेट, तेही या निसर्गरम्य देशात

1BHK, 2BHK सोडा आता! 50 लाख रुपयांत घेऊन टाका एक बेट, तेही या निसर्गरम्य देशात

तुम्हाला वाटेल, की ही काय चेष्टामस्करी चाललीय? असं बेट विक्रीला उपलब्ध असतं का कधी? पण हे खरं आहे. Private Island खरंच विकत आहेत. किंमत तर वाचा एकदा.

तुम्हाला वाटेल, की ही काय चेष्टामस्करी चाललीय? असं बेट विक्रीला उपलब्ध असतं का कधी? पण हे खरं आहे. Private Island खरंच विकत आहेत. किंमत तर वाचा एकदा.

तुम्हाला वाटेल, की ही काय चेष्टामस्करी चाललीय? असं बेट विक्रीला उपलब्ध असतं का कधी? पण हे खरं आहे. Private Island खरंच विकत आहेत. किंमत तर वाचा एकदा.

एडिंबरा, 14 सप्टेंबर: माणूस कायमच उत्तम जीवनाची स्वप्नं पाहत असतो. आपण स्वतः सुखात राहू, तसंच आपल्या कुटुंबाला आणि आपल्या पुढच्या पिढीलाही आनंदात ठेवू शकू, यासाठी प्रत्येक माणूस धडपडत असतो. म्हणूनच प्रत्येक जण उत्तम पद्धतीने गुंतवणूक (Investment and savings) करू इच्छितो, गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय शोधत असतो. गुंतवणूक म्हणून अनेक जण जमीन किंवा घर (Invest in Property) विकत घेतात. कारण त्यांचे भाव काळानुसार वेगाने वाढत असतात. शिवाय जमिनीचा एखादा तुकडा किंवा घर आपल्या मालकीचं आहे, ही भावनाही सुखावून टाकणारी असते; पण एखादं बेट तुमच्या नावावर होण्याची म्हणजेच बेट विकत  (buy Island in scotland) घेण्याची संधी आली तर ती तुम्ही घ्याल का?

तुम्हाला वाटेल, की ही काय चेष्टामस्करी चाललीय? एक तर बेट विक्रीला उपलब्ध असणं अशक्य आहे. त्यातून ते शक्य झालंच, तरी त्याची किंमत कोट्यवधी रुपये असेल; पण प्रत्यक्षात मात्र तसं नाही. केवळ 50 लाख रुपये खर्च करून एक बेट आपल्या नावावर करणं खरंच शक्य आहे. स्कॉटलंडच्या (Scotland) वायव्य किनाऱ्याजवळ अशी अनेक बेटं आहेत, की जिथे कोणीही राहत नाही. या बेटांची विक्री केली जात असून, त्यांची किंमत सुमारे 50 हजार पौंड म्हणजेच 50 लाख रुपयांच्या आसपास आहे.

पोटच्या गोळ्यासाठी आईने स्वीकारलं अपंगत्व; स्वतःचा पाय कापून दिला बाळाला जन्म

कार्न डिएस (Carn Deas) नावाच्या या 22 एकरच्या क्षेत्रात अनेक बेटं, छोटे डोंगर आणि समुद्रकिनारे आहेत. या क्षेत्रात कोणीही राहत नाही. त्यामुळे शेजारी म्हणाल तर केवळ डॉल्फिन, व्हेल आणि अन्य सागरी जीवच मिळतील. इथे कोणी राहायला गेलं, तर ताजं सागरी अन्न, मासळी आदी अगदी सहज मिळू शकतं. गोल्डक्रेस्ट लँड अँड फॉरेस्ट्री ग्रुपने या बेटांच्या विक्रीची घोषणा आपल्या वेबसाइटवर केली असून, त्यासाठीची अंतिम मुदत 15 सप्टेंबर आहे.

OMG! 173 वेळा साप चावला तरी त्याला काहीच झालं नाही; उलट 100 वर्षे जगला कारण...

मुळात बेटं ही निसर्गसौंदर्याची खाणच असतात. त्यात ही बेटं अत्यंत उत्तम, निसर्गरम्य स्थळी आहेत. या बेटांच्या पश्चिमेला नॅशनल सीनिक एरिया (National Scenic Area) असून, उत्तरेला कोइगाच आणि अॅसिंट पर्वत (Coigach and Assynt mountains) आहेत. दक्षिणेला टॉरिन्डॉन टेकड्या (Torridon hills) आहेत. ही बेटं अगदीच निर्जन स्थळी असल्यामुळे तिथे राहायला जायचं कसं, अशी भीती वाटत असेल, तर ती बाजूला ठेवायला हवी. कारण या बेटांपासून जवळच असलेल्या अॅकिल्टिबुई (Achiltibuie Village) नावाच्या गावात 300हून अधिक लोकवस्ती आहे. नावेने या गावापर्यंत 25 मिनिटांत पोहोचता येतं. तसंच त्या ठिकाणापासून कारने ग्लासगो (Glasgow) शहरात पाच तासांत पोहोचता येतं. लंडनपासून हे ठिकाण एक हजार किलोमीटर अंतरावर असून, तिथे 12 तासांत पोहोचता येऊ शकतं.

First published: