रोम, 29 ऑक्टोबर : छोटंसं का होईना आपलं स्वतःचं एक घर (home) असावं असं स्वप्नं प्रत्येकाचं असतं. त्यासाठी कित्येक वर्षे मेहनत करून पैसे जमवून हे स्वप्नं प्रत्यक्षात साकारण्याची धडपड सुरू असते. आयुष्यभराची कमाई आपण एका घरासाठी देतो. त्यात आता घरांच्या (house) किमती इतक्या वाढल्यात ही आपलं घराचं स्वप्नं स्वप्नंच राहणार असंच प्रत्येकाला वाटतं आहे. लाखो, कोटींमध्ये घरांच्या किमती आहेत. मात्र कुणी तुम्हाला सांगितलं फक्त 100 रुपयांच्या एका नोटेतच तुम्हाला घर घेता येईल. खरंतर त्या 100 रुपयांमधीलही काही पैसे वाचतील. असं सांगितलं तर विश्वासच बसणार नाही. मात्र हे खरं आहे.
फक्त 86 रुपयांत घर मिळतं आहे. एका शहरात आपण कल्पनाही केली नसेल इतक्या कमी किमतीत घर मिळतं आहे. आता असं घर कुठे मिळतं आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर असं घर आहे ते इटलीत. इटलीतल्या सिसिलीतील सलेमी या एका छोट्याशा शहरात इतक्या कमी किमतीत घर मिळतं आहे. एक युरो म्हणजे जवळपास 86 रुपये इथल्या घरांची किंमत आहे.
जिथं घरांच्या किंमती लाखो, कोट्यवधींमध्ये आहेत. तिथं फक्त 86 रुपयांत घर का मिळतं आहे, असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. कारण अगदी पंधरा लाखांपेक्षा कमी किमतीत घर मिळू लागलं, तरी आपल्या मनात अनेक शंका उपस्थित होता. काही गडबड तर नाही ना, असं आपल्याला वाटतं. मात्र इटलीतल्या या घरांमध्ये काही गडबड नाही तर याचं कारण आहे ते लोकसंख्या.
हे वाचा - झाडांमधून झुलता पूल; PHOTO पाहाल तर 'द ग्रेट वॉल ऑफ चायना'लाही विसराल
गेल्या काही वर्षांपासून या शहरातील लोकसंख्या लक्षणीयरित्या कमी होते आहे. तिथली लोकसंख्या वाढवण्यासाठीच इथल्या घराच्या किमती कमी ठेवण्यात आल्या आहेत. जेणेकरून लोक इथं राहायला येथील आणि तिथली लोकसंख्या वाढेल. सीएनएन रिपोर्टनुसार, लोकांनी सोडलेल्या या जुन्या संपत्ती विकणं अशक्य होत होतं आणि कोरोनामुळे तर परिस्थितीत आणखीनंच खराब झाली आहे.
हे वाचा - पाकिस्तानातील असा समाज; जिथं परस्पर लग्न मोडून दुसऱ्या पुरुषासोबत राहतात महिला
शहराच्या महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार, या शहरातील सर्व इमारती नगर परिषदेच्या आहेत. इथं रस्ते, वीज आणि सांडपाण्याची व्यस्था अशा सर्व सोयीसुविधा उत्तम बनवण्यात आल्या आहेत.