सेक्स वर्करचं कामाच्या ठिकाणी शोषण! उद्योजकाला सुनावला गेला जबरी दंड

सेक्स वर्करचं कामाच्या ठिकाणी शोषण! उद्योजकाला सुनावला गेला जबरी दंड

सेक्स वर्करचा कसा होईल लैगिंक छळ असं काही वाटत असेल तर वेळीच डोळे उघडा. Sexual Harassment at work Place ची केस एका सेक्स वर्करने ठोकली आणि बड्या व्यापाऱ्याला मोठा दंड भरावा लागला. कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला मानवी अधिकार असतातच.

  • Share this:

वेलिंग्टन (न्यूझिलंड), 17 डिसेंबर : सेक्स वर्कर्सना (sex worker) कायमच हेटाळणी आणि अवमानकारक वागणुकीला सामोरं जावं लागतं. त्यांच्या मानवी अधिकारांबाबत समाजात पुरेशी जागृती झालेली नाही. त्यातून त्यांचा अपमान, शोषण आणि छळाच्या घटना देशात सर्रास घडताना दिसतात. Sexual Harassment at work place अर्थात कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक छळवणूक ही संकल्पना आता बहुतेक सगळ्या व्यवसायांमध्ये आणि नोकरी करणाऱ्यांना परिचयाची आहे. त्याविरोधात आवाज उठवण्याबद्दल जागृतीही केली जाते. पण सेक्स वर्कर्स किंवा वेश्या व्यवसाय करणाऱ्यांनाही कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ करणाऱ्यांविरोधात आवाज उठवता येतो आणि दादही मिळते. याचं उदाहरण न्यूझिलंडमध्ये समोर आलं.

न्यूझिलंडमध्ये (New Zealand) घडलेल्या एका घटनेतून  सेक्स वर्कर्सच्या अधिकारांना बळकट करणारी बाब समोर आली आहे. इथल्या एका सेक्स वर्करनं एका उद्योजकाविरुद्ध (businessman) लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली होती. प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मानवाधिकार आयोगानं सेक्स वर्करच्या बाजूनं निकाल दिला. उद्योजकाला आयोगानं दंड सुनावला असून या सेक्स वर्करला तब्बल 6 आकडी रक्कम नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला आहे.

मानवाधिकार आयोगाचे संचालक मायकल टिम्मीस यांनी म्हटलं आहे, की या नुकसानभरपाईमागे मोठा अर्थ दडलाय. हा दंड भरायला सांगून आम्ही हे सूचित करतो आहोत, की कुठलाही श्रमिक, मग तो कुठल्याही क्षेत्रात काम करत असेल, त्याचे लैंगिक शोषण केले जाऊ शकत नाही. श्रमिकालाही शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याचा पूर्ण हक्क आहे.'

ते पुढे म्हणाले, की 'आम्ही सगळ्या उद्योगपती आणि कर्मचाऱ्यांना हे आवाहन करतो, की सेक्स वर्कर्सच्या अधिकारांना त्यांनी समजून घेत कायम लक्षात ठेवावं. सेक्स वर्कर्सचा सन्मान करावा.'

जगभरातील सेक्स वर्कर्सचे न्याय्य मानवी हक्क समजून घेण्यासाठी आधी त्यांच्याकडे माणूस म्हणून बघितलं गेलं पाहिजे. त्यांच्याकडे बघताना आपण आपले पूर्वग्रह, धारणा यांना बाजूला ठेवलं पाहिजे. यासाठी सामाजिक संस्थांनी सामान्य माणसाची मानसिकता बदलण्याचे आधिकाधिक प्रयत्न केले पाहिजेत.

Published by: News18 Desk
First published: December 17, 2020, 4:34 PM IST

ताज्या बातम्या