आपलं काम यशस्वी करण्यासाठी 'या' गोष्टी कायम लक्षात ठेवा

आपलं काम यशस्वी करण्यासाठी 'या' गोष्टी कायम लक्षात ठेवा

आपण अनेक महत्वाचे निर्णय घेत असतो. मग ते कधी बरोबर असतात तर कधी चुकीचे. म्हणूनच काहीही करण्याआधी 'या' गोष्टीचा विचार करणं खूप महत्वाचं आहे.

  • Share this:

मुंबई: 17 जानेवारी: कोणत्याही कामात अडथळे आणि समस्या आल्याशिवाय आपलं काम यशस्वीपणे पूर्ण होत नाही अशी फार जुन्या काळी म्हणायची पद्धत होती. आपल्या रोजच्या आयुष्यात आपण अनेक महत्वाचे निर्णय घेत असतो. मग ते कधी बरोबर असतात तर कधी चुकीचे. म्हणूनच काहीही करण्याआधी 'या' गोष्टीचा विचार करणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आपलं काम यशस्वीपणे पूर्ण होतं.

1.कोणतही काम करण्याआधी त्याच्या परिणामांचा विचार करा. आपल्याला जे काम करायचं आहे त्याचा आराखडा तयार करा. एकाला अनेक पर्याय कसे उपलब्ध करता येतील यावर भर द्या.

2.आपण जे पण काही काम करणार आहोत त्याचं योग्य आणि सकारात्मक आकलन करा. त्याचा तुम्हाला पूढे खूप फायदा होईल.

3.कठीण कामाला छोट्या छोट्या भागांमध्ये विभागा. आणि मग एका एका भागाचा अभ्यास काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक पूर्ण करा. आपल्या कामात सल्ला जरी इतरांचा घेतला तरी निर्णय मात्र आपणच घ्यायला हवा. कारण चुकलं किंवा बरोबर असलं तरी दोन्हीची जबाबादारी सर्वस्वी आपली असते.

4. एकावेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करा. कोणतं काम महत्वाचं आहे हे ठरवा आणि त्याला सगळ्यात आधी पूर्ण करा.

5. आपल्या आरामदायी राहणीमानीतून बाहेर या आणि आव्हानांना तोंड द्या. त्याने आयुष्याला वेग येईल. आणि गोष्ट करायची म्हटलं की त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याची तयारी आपल्याला ठेवायला हवीच.

हेही वाचा-लठ्ठपणा कमी करायचाय? मग हे पदार्थ खाणं कटाक्षानं टाळा!

हेही वाचा-त्वचेच्या आजारावर सर्वोत्तम घरगुती उपाय! बहुगुणी कडुनिंबाचे 10 फायदे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 18, 2020 09:28 AM IST

ताज्या बातम्या