औषधं खरेदी करताना नेहमी लक्षात ठेवा हे 'लाल' निशाण, अन्यथा होतील गंभीर परिणाम

डॉक्टरांच्या सल्ल्याविनाच औषधांची खरेदी करत आहात, तर वेळीच व्हा सावध. अन्यथा सहन करावे लागतील गंभीर परिणाम.

News18 Lokmat | Updated On: Oct 19, 2019 09:22 PM IST

औषधं खरेदी करताना नेहमी लक्षात ठेवा हे 'लाल' निशाण, अन्यथा होतील गंभीर परिणाम

नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : सर्दी-खोकल्याचा त्रास सुरू झाल्यानंतर बहुतांश लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता थेट मेडिकल स्टोअरमध्ये (Medical Store)जाऊन औषधांचं सेवन करतात. पण डॉक्टरांच्या सल्ल्याविनाच घेतलेल्या औषधांचा तुमच्या शरीरावर प्रचंड विपरीत परिणाम होतो. कित्येकदा तर नवीन आजारांनाही आमंत्रण मिळतं. हे शारीरिक नुकसान टाळण्यासाठी नागरिकांमध्ये औषधांसंदर्भात जनजागृती करण्यासाठी सरकारकडून महत्त्वपूर्ण माहिती दिली जात आहे. औषधांच्या पाकिटावर तुम्हाला लाल रेष किंवा निशाण निदर्शनास आल्यास संबंधित औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याविना घेऊ नये, अशी महत्त्वपूर्ण माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

(वाचा : आता फक्त 20 मिनिटं एक्सरसाइज करा आणि या आजारांपासून मिळवा सुटका!)

औषधांच्या पाकिटावर असणाऱ्या लाल निशाणाचा अर्थ काय?

ज्या औषधांच्या पाकिटावर लाल रंगाचं निशाण असतं, त्या औषधांचं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सेवन करू नये.

1. कोणतंही मेडिकल स्टोअर लाल रंगाचं निशाण असलेली औषधं डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्री करू शकत नाही. शिवाय, या औषधांचं सेवन करण्याचा सल्ला देखील देऊ शकत नाही.

Loading...

2. औषधांच्या पाकिटावर तुम्ही बऱ्याचदा Rx लिहिलेलं पाहिले असेल, पण याबाबत कधी विचार केला आहे का?. ज्या औषधांवर Rx लिहिलेलं असतं, ती औषधं केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच घ्यावीत.

(वाचा : सतत मूड स्विंग होतात का.. जरा झोपेकडे लक्ष द्या!)

3. डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन लिहून दिल्यानंतरच ती औषधं घ्यावीत. अन्यथा तुम्हाला प्रचंड शारीरिक नुकसान सहन करावं लागेल.

4. या औषधांची विक्री करण्याचा ज्या डॉक्टर तसंच वैद्यकीय दुकानांना परवानगी मिळाली आहे, त्यांच्याकडून औषधांची खरेदी करावी.

(वाचा : आता रात्रीची शिळी चपाती करणार मधुमेहावर उपचार, खायला विसरू नका!)

VIDEO : परळीपासून ते वरळी 'या' आहे राज्यातील बिग फाईट्स, कोण मारणार बाजी?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2019 09:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...