'हा' प्रिंटर भरणार भाजलेल्या त्वचेचे घाव, त्वचेवरील डागही होणार गायब

'हा' प्रिंटर भरणार भाजलेल्या त्वचेचे घाव, त्वचेवरील डागही होणार गायब

त्वचा भाजल्यानंतर त्यावर उपचार म्हणून सध्या स्किन ग्राफ्टिंग (Skin grafting) केलं जातं. मात्र संशोधकांनी आता असं पोर्टेबल 3D स्किन प्रिंटर (3D skin printer) तयार केलं आहे. जे काही मिनिटांतच भाजलेल्या त्वचेवरील घाव भरणार आहे.

  • Share this:

टोरंटो, 8 फेब्रुवारी : त्वचा भाजल्यानंतर त्यावर उपचार म्हणून सध्या स्किन ग्राफ्टिंग केलं जातं. ज्यात शरीराच्या इतर भागावरील हेल्दी त्वचा काढून भाजलेल्या भागावर लावली जाते. मात्र संशोधकांनी आता असं पोर्टेबल 3D स्किन प्रिंटर तयार केलं आहे. जे काही मिनिटांतच भाजलेल्या त्वचेवरील घाव भरणार आहे. शिवाय भाजल्यामुळे त्वचेवर आलेले डागही गायब करणार आहे.

कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटोच्या इंजिनीयरिंग आणि सनीब्रुक हॉस्पिटलच्या संशोधकांनी हे प्रिंटर तयार केलं आहे. याबाबत बायो फेब्रिकेशन जर्नलमध्ये याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

हेदेखील वाचा - डायबेटिज रुग्णांनो अशी काळजी घ्याल, तर बळावणार नाहीत त्वचेच्या समस्या

कसं काम करतो हा प्रिंटर

हा प्रिंटर पेंट रोलरप्रमाणे काम करतो. ज्यामध्ये असलेलं बायो इंक जखमा भरण्यासाठी मदत करतं.

मोठ्या जखमांना भरण्यासाठी त्यावर त्वचेच्या लेयर जमा करतो

सेल्स रोलरद्वारे जैविक शाई मेसेनकाइमल स्ट्रोमा सेल्सपासून तयार करण्यात आलेली आहे.

यामुळे या पेशी त्वचेला पुन्हा तयार होण्यासाठी मदत करतात आणि जखमेचे व्रण कमी करतात.

हेदेखील वाचा - मेकअप करताना तुमच्या 'या' छोट्या चुका, बिघडवत आहेत तुमचा लूक

संशोधकांनी सांगितलं की,  त्वचा भाजल्यानंतर त्यावर उपचार म्हणून सध्या ऑटोलॉगस स्किन ग्राफ्टिंग पद्धत वापरली जाते. मात्र पूर्ण शरीर भाजलेलं असल्यास त्यावर उपचार करणं आव्हानात्मक आहे. भाजल्यानंतर जर मोठ्या जखमा झाल्या, तर त्यावर त्वचा प्रत्यारोपणासाठी हेल्दी त्वचा उपलब्ध होत नाही. ज्यामुळे रुग्णाचा मृत्यूही होतो. हा प्रिंटर भाजलेल्या रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी खूपच फायदेशीर ठरेल. याची विशेषता म्हणजे जखम भरण्यासाठी भाजल्यामुळे पडणारे डागही पडू देत नाही. ३डी प्रिंटर खूप हलका आणि कुठेही नेता येईल असता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 8, 2020 08:51 PM IST

ताज्या बातम्या