मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Tabata Workout : टबाटा वर्कआउटने बर्न करा फॅट, हे आहेत फायदे आणि वर्कआउटची योग्य पद्धत

Tabata Workout : टबाटा वर्कआउटने बर्न करा फॅट, हे आहेत फायदे आणि वर्कआउटची योग्य पद्धत

टबाटा वर्कआउट्स हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी व्यायाम आणि ताकद प्रशिक्षण म्हणून केले जाऊ शकते. या वर्कआउटमध्ये अनेक प्रकारचे व्यायाम समाविष्ट आहेत.

टबाटा वर्कआउट्स हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी व्यायाम आणि ताकद प्रशिक्षण म्हणून केले जाऊ शकते. या वर्कआउटमध्ये अनेक प्रकारचे व्यायाम समाविष्ट आहेत.

टबाटा वर्कआउट्स हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी व्यायाम आणि ताकद प्रशिक्षण म्हणून केले जाऊ शकते. या वर्कआउटमध्ये अनेक प्रकारचे व्यायाम समाविष्ट आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 20 फेब्रुवारी : जर तुम्हाला तुमच्या शरीरातील चरबी कमी वेळेत बर्न करायची असेल. तर सर्वोत्तम वर्कआउट्सच्या यादीत टबाटा वर्कआउट सर्वात खास म्हणता येईल. हे एक हाय इंटेन्सिटी इंटरवल वर्कआउट आहे, ज्यामध्ये 20 सेकंदांचे वर्कआउट आणि 10 सेकंदांचा ब्रेक घेतला जातो. त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या वर्कआउटमध्ये अनेक प्रकारचे व्यायाम समाविष्ट करू शकता आणि वजन कमी करण्यात यशस्वी होऊ शकता.

fitandwell.com मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, जर्नल ऑफ फिजियोलॉजिकल सायन्समधील क्रीडा शास्त्रज्ञ आणि टबाटाच्या निर्मात्या इझुमी टबाटा यांनी या तंत्राचे वजन कमी करण्याचा आणि चरबी जाळण्याचा सर्वोत्तम मार्ग असल्याचे सांगितले आहे. इतर संशोधनात असेही आढळून आले आहे की शरीरातील चरबी जाळण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी टबाटा प्रशिक्षण हे सर्वोत्तम तंत्र आहे.

Black Coffee : 'या' आश्चर्यकारक फायद्यांसाठी नक्की प्यायला हवी ब्लॅक कॉफी, ही असते योग्य वेळ

टबाटा तंत्र म्हणजे काय?

टबाटा वर्कआउटला हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी व्यायाम आणि ताकद प्रशिक्षण असे म्हटले जाऊ शकते. या वर्कआउटमध्ये अनेक प्रकारचे व्यायाम समाविष्ट केले जाऊ शकतात. या तंत्रात 20-सेकंद हाय इंटेन्सिटी वर्कआउट केले जाते आणि नंतर 10-सेकंद ब्रेक घेतला जातो. त्यामुळे असे म्हटले जाऊ शकते की ते 20:10 पॅटर्नमध्ये केले जाते. तुम्ही याच्या 8 फेऱ्या करू शकता. यामध्ये तुम्ही स्क्वॅट्स, पुश-अप्स, बर्पी आणि इतर व्यायाम करता, जे तुमच्या मोठ्या स्नायूंच्या गटाला लक्ष्य करतात.

टबाटा वर्कआउटचे उदाहरण

तुम्ही वेगाने 20 सेकंद सतत पुशअप करा आणि नंतर 10 सेकंदांचा ब्रेक घ्या. याचे 8 सेट करा आणि एक मिनिट विश्रांती घ्या. नंतर 20 सेकंद स्क्वॅट्स करा आणि नंतर 10 सेकंद ऑफ पॅटर्नवर जा. 8 सेट पूर्ण केल्यानंतर 1 मिनिटाचा ब्रेक घ्या आणि नंतर बर्पीज नंतर माउंटेन क्लायंबर्स करा.

टबाटा वर्कआउटचे फायदे

- कमी वेळात भरपूर कॅलरीज बर्न करता येतात.

- हे कमकुवत स्नायूंना मजबूत करण्यास मदत करते.

- असे केल्याने एरोबिक क्षमता विकसित होते.

- हे फोकस वाढवण्यासदेखील मदत करते.

- हे सेल्फ मुव्हमेंट सुधारण्याचेदेखील कार्य करते.

Diabetic Diet: डायबिटीज असणाऱ्यांच्या ताटात रात्री हे पदार्थ हवेत; शुगर नियंत्रित राहील

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:
top videos

    Tags: Health Tips, Lifestyle, Types of exercise