मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तुमची कोणी छेड काढली तर थेट मारा ही मिरची बुलेट; कानातल्या झुमक्यातून सुटतील गोळ्या

तुमची कोणी छेड काढली तर थेट मारा ही मिरची बुलेट; कानातल्या झुमक्यातून सुटतील गोळ्या

महिलांवरच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये गेल्याकाही काळात मोठी वाढ झाली आहे. यावर वाराणसीच्या एका तरुणाने एक नामी शक्कल लढवली आहे. श्याम चौरसिया या तरुणाने तयार केलेल्या कानातल्यातून थेट मिर्ची बुलेट छेड काढणाऱ्यावर डागली जाईल.

  • Published by:  Manoj Khandekar

वाराणसी, 26 फेब्रुवारी : गेल्या काही काळात महिलांवरच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याबद्दल कायदे अधिक कठोर करण्याचा आग्रह अनेकदा धरला जातो. पण घटना घडत असताना अनेकदा तिथे उपस्थित असलेले लोकं बघ्याची भूमिका घेतात. लोकांच्या बोटचेप्या भूमिकेमुळे अनेकदा अडचणीत असलेल्या पीडितेला योग्य वेळी मदत मिळण्यातही अडचणी येतात. यावर जालीम उपाय सोधून काढलाय वाराणसीच्या अशोका इन्स्टिट्यूटच्या संशोधन विभागाच्या प्रभारी असलेल्या श्याम चौरसिया यांनी. यानुसार कानात घातलेल्या झुमक्यातून ‘मिरची गोळी’ बाहेर पडेल आणि तुम्हाला त्रास देणाऱ्याला पळवून लावेल.

कसे आहेत ‘स्मार्ट झुमके’?

हे झुमके तुम्हाला त्रास देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला रोखण्यासाठी पुरेसे आहेत. फक्त झुमके स्मार्ट दिसत नाहीत तर त्यांचं काम सुद्धा एकदम खास आहे. खरंतर श्याम चौरसिया यांनी एक छोटसं यंत्र तयार केलं. पण त्याला सुंदर अशा झुमक्यांचं रूप देण्यात आलं आहे. या झुमक्यांमध्ये तुम्हाला त्रास देणाऱ्यावर थेट गोळ्या सुटल्याप्रमाणे मिरच्या बुलेट सुटायला सुरुवात होईल. आणि काही क्षणात समोरचा माणूस नामोहरम होईल.

थेट पोलिसांना पण कळेल

या मिरची बुलेटचं विशेष म्हणजे केवळ मिरची पूड समोरच्यावर मारून हे झुमके थांबणार नाहीत तर 100 नंबर अर्थात पोलीस आणि 112नंबर या तात्काळ सुरक्षा पुरवणाऱ्या यंत्रणेकडे अलर्ट पोहोचेल. संबंधित यंत्रणांना लगेच कळेल एका महिलेला तातडीने मदतीची गरज आहे.

हेही वाचा :  आता नराधमांची खैर नाही.. अधिवेशन संपण्यापूर्वीच महाराष्ट्रात 'दिशा कायदा'

ब्ल्यू टूथला सुद्धा जोडता येणार

महिला सुरक्षेसाठी जेंव्हा हे झुमके घालतील तेंव्हा हे झुमके त्यांना मोबाईलच्या ब्ल्यू टूथला सुद्धा जोडता येईल. इतकंच नाही तर हे झुमके फक्त कानात घालूनच त्याचा उपयोग होतो असं नाही तर आवश्यकतेनुसार हेच झुमके हातात घेऊन तुम्हाला बंदूक हातात घेतल्याप्रमाणे त्यातून तुम्हाला गोळी सुद्धा मारता येईल. हे ब्ल्यू टूथ जोडलं की बॅटरी इतकी सक्षम असेल की फक्त एक तास चार्ज केल्यानंतर ते आठवडाभर चालू शकेल.

झुमक्यांची किंमत आवाक्यातली

श्याम चौरसिया यांनी तयार केलेल्या या झुमक्याचं वजन फारच कमी म्हणजे फक्त 45 ग्रॅंम आहे. तर त्यांची लांबी 3 इंच असेल. अशा प्रकारचे झुमके सध्या मुलींमध्ये फारच लोकप्रिय आहेत.  या झुमक्यांमध्ये दोन स्विच आहेत यातील एकामुळे मिरची गन ट्रिगर होईल तर दुसऱ्या स्विचमुळे थेट पोलिसांना माहिती मिळेल. म्हणजेच 100 आणि 112 या क्रमांकावर अलर्ट जाईल. असा या खास, हायटेक मिर्ची झुमक्यांची किमत असेल फक्त 450 रुपये.

" isDesktop="true" id="437937" >

First published: