जेव्हा पाण्यात चक्क पाच मजली इमारत वाहते, पाहा VIDEO

विशेष म्हणजे वाहती इमारत पाहून तिथे उपस्थित लोक घाबरून न जाता त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यातच अधिक मग्न दिसतात.

News18 Lokmat | Updated On: Jul 31, 2019 03:57 PM IST

जेव्हा पाण्यात चक्क पाच मजली इमारत वाहते, पाहा VIDEO

बिजिंग- आतापर्यंत तुम्ही पुरात इमारतीच्या इमारती वाहून गेल्याचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. निसर्गाचं विध्वंस रूप पाहून मनात अनेक प्रश्नही उभे राहिले असतील. पण आज आम्ही तुम्हाला असा एक व्हिडिओ दाखवणार आहोत जो पाहून तुम्हाला हसावं की रडावं असा प्रश्न पडेल.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चीनमधील एका नदीत चक्क पाच मजली इमारत वाहत पुढे जाताना दिसते. चीनमधील यंगसी नदीत ही इमारत अगदी सहज पद्धतीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहताना दिसते. विशेष म्हणजे वाहती इमारत पाहून तिथे उपस्थित लोक घाबरून न जाता त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यातच अधिक मग्न दिसतात. ही इमारत अशा पद्धतीने डिझाइन केली आहे की जणूकाही ती नदीवर वाहताना दिसते. या मोठ्या इमारतीत अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंट आहेत.

अर्थात हे फ्लोटिंग रेस्टॉरंट चीनमध्ये नवीन नाहीत. गरजेनुसार ही इमारत एका जागेवरून दुसऱ्या जागी नेऊ शकतो. विशेष म्हणजे असं म्हटलं जातं की, ग्राहकांना या इमारतीत जाण्यासाठी खास बोटीची सोयही करण्यात येते.

संध्याकाळी रडल्यावर कमी होतो लठ्ठपणा, संशोधनात झालं सिद्ध!

झोपण्याच्या या 4 पोझिशनमुळे शरीराला होतात अनेक फायदे!

VIDEO: मी गद्दार नाही, भाजप प्रवेशानंतर चित्रा वाघ भावुक!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Jul 31, 2019 03:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...