...म्हणून बुद्धाने शिष्याला खराब झऱ्यातून पाणी आणायला सांगितलं, ही गोष्ट एकदा वाचाच!

...म्हणून बुद्धाने शिष्याला खराब झऱ्यातून पाणी आणायला सांगितलं, ही गोष्ट एकदा वाचाच!

बुद्ध दुपारी एका झाडाखाली आराम करत होते. त्यांना तहान लागली तेव्हा त्यांनी शिष्य आनंदला बाजूच्या झऱ्यातून पाणी आणायला सांगितलं.

  • Share this:

एक दिवस बुद्ध दुपारी एका झाडाखाली आराम करत होते. त्यांना तहान लागली तेव्हा त्यांनी शिष्य आनंदला बाजूच्या झऱ्यातून पाणी आणायला सांगितलं. आनंदने पाहिलं की झऱ्याच्या बाजूने काही बैलगाड्या जात होत्या. त्यांच्या पावलांमुळे तिकडे धूळ तयार झाली होती. त्या धूळीत चिखल आणि सुकी पानंही होती. यामुळे झऱ्याचं पाणी पूर्ण खराब झालं होतं. हे पाहून आनंद पाणी न घेताच परतला.

तो बुद्धला म्हणाला की, ‘झऱ्याचं पाणी निर्मळ नव्हतं. मी नदीतून पाणी आणतो. इथून नदी दूर आहे हे माहितीये पण तुमच्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था करतो. मी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करेन.’

तरीही बुद्धाने त्याला त्याच झऱ्यापाशी पाणी आणायला पाठवले. आनंद तिथे गेला आणि थोड्या वेळाने परत पाणी न घेताच परतला. यावेळीही त्याने पाणी गढूळ असल्याचं सांगितलं. बुद्धाने पुन्हा त्याला त्याच धबधब्याकडे पाणी आणायला पाठवलं.

तिसऱ्यांदा जेव्हा आनंद झऱ्यापाशी गेला तेव्हा त्याने पाहिलं की, झऱ्याचं पाणी पूर्ण शांत आणि स्वच्छ झालं होतं. माती खाली बसली होती आणि झरा निर्मळ झाला होता. आनंद पाणी घेऊन बुद्धाजवळ आला आणि त्याने बुद्धाला घडलेली गोष्ट सांगितली. यावर बुद्ध म्हणाले की, ‘अशीच स्थिती आपल्या मनाची असते. आयुष्यात संकटं आल्यावर आपलं मन बैचेन होतं, अनेक गोष्टी एकाचवेळी मनात सुरू असतात. पण, मनाल शांत ठेवल आणि संयमाने प्रत्येक गोष्टीचा विचार केला तर तुम्ही पुन्हा एकदा निर्मळ मनाने पुढे जाऊ शकता.’

…म्हणून मुलांची लग्नासाठी पहिली पसंत असते वर्किंग वुमन

कॅन्सर होण्याआधी शरीर देतं हे पाच संकेत, तुम्ही त्याकडे लक्ष दिलं का?

या उपायांनी तुम्ही एक्सला तुमच्या आयुष्यात परत आणू शकता!

माय लेकराला भांड्यात बसवून तरुणांनी वाचवलं, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 10, 2019 06:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading