मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

ब्रूस लीचा मृत्यू जास्त पाणी प्यायल्यामुळे? संशोधकांचा दावा

ब्रूस लीचा मृत्यू जास्त पाणी प्यायल्यामुळे? संशोधकांचा दावा

पाणी पिणे

पाणी पिणे

प्रसिद्ध अभिनेता आणि मार्शल आर्ट एक्सपर्ट ब्रूस लीचा मृत्यू ओव्हरहायड्रेशनमुळे झाल्याचं एका संशोधनात नमूद करण्यात आलं आहे. शरीरातलं अतिरिक्त पाणी बाहेर टाकण्यास किडनी सक्षम नसल्याने त्याचा अकाली मृत्यू झाला.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 24 नोव्हेंबर :  चांगल्या आरोग्यासाठी पोषक आहार, पुरेसा व्यायाम गरजेचा असतो. त्याचप्रमाणे शरीरातल्या सर्व अवयवांचं कार्य योग्य पद्धतीनं चालावी, रक्तप्रवाह सुरळीत राहावा यासाठी दिवसभरात पुरेसं पाणी पिणं आवश्यक असतं. कमी पाणी प्यायल्याने डीहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने ओव्हरहायड्रेशन होतं. या दोन्ही स्थितींत किडनीवर प्रतिकूल परिणाम होऊन प्रसंगी मृत्यू ओढवू शकतो. प्रसिद्ध अभिनेता आणि मार्शल आर्ट एक्सपर्ट ब्रूस लीचा मृत्यू ओव्हरहायड्रेशनमुळे झाल्याचं एका संशोधनात नमूद करण्यात आलं आहे. शरीरातलं अतिरिक्त पाणी बाहेर टाकण्यास किडनी सक्षम नसल्याने त्याचा अकाली मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी नेमक्या किती प्रमाणात द्रव पदार्थ घ्यावेत, जास्त पाणी प्यायल्याने कोणत्या समस्या उद्भवतात, या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे.

प्रसिद्ध अभिनेता आणि मार्शल आर्ट एक्स्पर्ट ब्रूस लीचा मृत्यू जास्त पाणी प्यायल्याने झाला असा दावा संशोधकांनी केला आहे. स्पेनमधल्या किडनी विशेषज्ञांच्या एका टीमने केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष द क्लिनिकल किडनी जर्नलच्या डिसेंबर 2022च्या अंकात प्रकाशित झाले आहेत. त्यात हा दावा करण्यात आला आहे. जुलै 1973मध्ये वयाच्या 32व्या वर्षी ब्रूस लीचं निधन झालं होतं. ब्रूस लीच्या मृत्यूनंतर 50 वर्षांनी या अभ्यासाच्या माध्यमातून त्याच्या मृत्यूच्या कारणांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. शरीरातलं अतिरिक्त पाणी बाहेर टाकण्यास त्याची किडनी सक्षम नव्हती, त्यामुळे त्याचा अकाली मृत्यू झाला, असं नव्या संशोधनात म्हटलं आहे.

हेही वाचा - Alcohol In Winter : हिवाळ्यात दारू प्यायल्याने शरीर खरंच गरम राहातं का? पाहा काय आहे सत्य

पेनकिलरचे दुष्परिणाम म्हणून सेरेब्रल एडिमा अर्थात मेंदूला सूज आल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, हे कारण तत्कालीन अधिकाऱ्यांनी नाकारलं होतं. लीच्या शरीरात हायपोनॅट्रेमियाचे जोखमीचे घटक दिसून आले, असं अभ्यासात सांगण्यात आलं आहे. या स्थितीत रक्तातल्या सोडियमचं प्रमाण खूप कमी होतं. त्या वेळी ली फ्लुइड डाएटवर असेल, त्यामुळे तो जास्त प्रमाणात द्रव पदार्थ घेत असावा, असा दावा संशोधकांनी केला आहे. तसंच तो त्या वेळी गांजाचे सेवन करत असावा. कारण यामुळे तहान लागण्याचं प्रमाण वाढतं, असा दावादेखील करण्यात आला आहे.

या संशोधनात नमूद करण्यात आलं आहे, की लीच्या शरीरात असे अनेक घटक होते, जे त्याला हायपोनॅट्रेमियाकडे घेऊन चालले होते. वास्तविक, त्याच्या शरीरातली होमिओस्टॅसिस यंत्रणा बिघडत चालली होती. पाणी पिणं आणि पाण्याचं उत्सर्जन करणं अशा दोन्ही गोष्टींचे नियंत्रण ही प्रणाली करत असते. ब्रूस लीचा मृत्यू किडनीच्या एका विशिष्ट समस्येमुळे झाला, ज्यामध्ये वॉटर होमिओस्टॅसिस राखण्यासाठी किडनी शरीरातून पुरेसं पाणी बाहेर टाकण्यास सक्षम नव्हती, असं शास्त्रज्ञांना वाटतं. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, या स्थितीमुळे हायपोनॅट्रेमिया, सेरेब्रल एडिमा होऊ शकतो. पाण्याचं सेवन आणि लघवीद्वारे पाणी उत्सर्जनाचं संतुलन बिघडले तर काही तासांतच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. लीच्या मृत्यूसमयी अशी काहीशी स्थिती असल्याचं दिसून येतं.

आपल्या शरीरात 60 टक्के पाणी असलं, तरी ही वस्तुस्थिती आपल्याला पाणी पिण्याच्या संभाव्य घातक परिणामांपासून संरक्षण देत नाही. कारण शरीरातली अतिरिक्त पाणी बाहेर टाकण्याची जबाबदारी किडनीची आहे. लीने पाण्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला; पण जास्त पाणी प्यायल्याने त्याचा अकाली मृत्यू झाला, हा विरोधाभास म्हणावा लागेल, असं संशोधकांनी आपल्या निष्कर्षात म्हटलं आहे.

हेही वाचा - दात घासताना टूथपेस्ट किती वापरावी, कधी विचार केलाय? जाणून घ्या याचं उत्तर

रोज आपण किती प्रमाणात पाणी प्यावं, याविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं आहे. प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायल्याने अस्वस्थ वाटणं, उलटी होणं, स्नायू शिथिल होणं, आखडल्यासारखं वाटणं, थकवा जाणवणं आणि डोकेदुखीसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

डॉ. सावला यांच्या मते, घरात राहण्याऱ्या व्यक्तीने दिवसभरात आठ ते 12 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. बाहेर काम करत असाल तर तहान लागताच तातडीने पाणी प्यावं. हे प्रमाण कदाचित एक लीटर जास्त असू शकतं.

एखाद्या व्यक्तीला हृदय किंवा किडनीचा विकार असेल, तर त्याने 8 ते 12 ग्लास पाणी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. अशा व्यक्तींनी दिवसभरात किती पाणी प्यावं, याबाबत डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो. त्याचप्रमाणे पाणी पिण्याचं प्रमाण हे व्यक्तीचं वय, आरोग्य आणि अवयवांच्या स्थितीवर अवलंबून असतं. त्यामुळे रुग्णांनी योग्य सल्ल्यासाठी आपल्या डॉक्टरांशी चर्चा करावी. हृदय आणि किडनी विकार असलेल्या बहुतांश रुग्णांना दिवसभरात एक लिटरपेक्षा जास्त पाणी किंवा द्रव पदार्थ घेऊ नये, असा सल्ला डॉक्टर देतात. अशा रुग्णांनी एक ग्लास जास्त पाणी प्यायलं तर त्याचा अर्थ किडनीवर अतिरिक्त दबाव टाकणं असा होतो. अशा स्थितीत किडनी जादा पाणी शरीराबाहेर टाकू शकत नाही. यामुळे पाय, हात आणि फुफ्फुसाच्या आसपास वॉटर रिटेंशन होऊ लागतं. त्यामुळे सूज येऊ लागते. सूज आल्यामुळे श्वास घेण्यास त्रास जाणवू लागतो आणि आरोग्यविषयक समस्या आणखी गुंतागुंतीच्या बनतात.

First published:

Tags: Drink water, Lifestyle, Water