चिंताजनक! कोविड-19 साथीत वाढले ब्रोकन हार्ट सिंड्रोमचे रुग्ण

चिंताजनक! कोविड-19 साथीत वाढले ब्रोकन हार्ट सिंड्रोमचे रुग्ण

ब्रोकन हार्ट सिंड्रोमची लक्षणे हृदयाच्या झटक्याशी मिळती जुळती आहेत. त्यामुळे लोक त्याला हृदयाचा झटका समजतात.

  • Last Updated: Aug 12, 2020 03:05 PM IST
  • Share this:

कोविड-19 च्या साथीने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याने लोकांना हृदयविकार जडू लागले आहेत. कोरोना विषाणूमुळे मानसिक, सामाजिक आणि आर्थिक चिंता लोकांना सतावू लागल्या आहेत. नुकतंच जामा ओपनमध्ये प्रकाशित संशोधनात असे समोर आलं आहे की एक्युट कोरोनरी सिंड्रोम (एसीएस) असणाऱ्या रुग्णांमध्ये ब्रोकन हार्ट सिंड्रोम अथवा ताकोत्सुबो सिंड्रोम अथवा ताकोत्सुबो कार्डियोमायोपथी दिसून आलं आहे.

हृदयाच्या झटक्याच्याच्या ऐवजी ब्रोकन हार्ट सिंड्रोममध्ये काही काळासाठी हृदयाच्या छोट्या भागात रक्त पंप करण्याच्या कामात बाधा येते आणि हृदयाचं बाकी कार्य योग्य पद्धतीने सुरू राहतं. असं झालं की छातीत दुखणं, श्वास घायला त्रास होणं अशी लक्षणं दिसतात. myupchar.com चे एम्सशी संबंधित डॉ. अजय मोहन यांनी सांगितलं, कोविड-19 साथीने देशात आणि जगभरात लोकांच्या जीवनात अनेक पातळ्यांवर तणाव निर्माण केला आहे. लोक केवळ कुटुंबाच्या आजारपणाने चिंतित नसून ते आर्थिक, सामाजिक आणि संभाव्य एकटेपणाच्या चिंतेनेसुद्धा ग्रासले आहेत. आता हा तणाव शरीर आणि हृदयावर परिणाम करायला लागला आहे आणि त्याने ब्रोकन हार्ट सिंड्रोम होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने हे स्पष्ट झालं आहे.

हे वाचा - मास्क की फेस शिल्ड; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी काय वापरणं योग्य?

ओहायोच्या दोन वेगवेगळ्या रुग्णालयातील आकडेवारीचा अभ्यास करण्यात आलेल्या या संशोधनात कोविड-19 च्या साथीमध्ये अॅक्युट कोरोनरी सिंड्रोम असलेल्या रुग्णांमध्ये ब्रोकन हार्ट सिंड्रोम पाहण्यात आला. संशोधकांना कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात ब्रोकन हार्ट सिंड्रोमचे एकूण 20 रुग्ण मिळाले. ही साथ येण्याअगोदर 5 ते 12 असायचे.

ब्रोकन हार्ट सिंड्रोमची लक्षणे हृदयाच्या झटक्याशी मिळती जुळती आहेत. त्यामुळे लोक त्याला हृदयाचा झटका समजतात. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, ब्रोकन हार्ट सिंड्रोममध्ये धमन्यांमध्ये कुठलाही अवरोध निर्माण होत असल्याचं दिसून आलेलं नाही.

myupchar.com चे एम्सशी संबंधित डॉ. नबी वली म्हणाले, हृदय विकाराच्या झटक्यात हृदयाकडे येणारा ऑक्सिजनयुक्त रक्तप्रवाह हा अडकतो. हे चरबी, कोलेस्ट्रॉल आणि अन्य पदार्थांमुळे होते जे हृदयाकडे येणाऱ्या धमन्यांमध्ये जमा होतात आणि रक्तप्रवाह अडवतात.

हे वाचा - सतत उचक्या येणं आता कोरोनाचं लक्षण? 'त्या' एका रुग्णामुळे डॉक्टरही घाबरले

अमेरिकन हार्ट एसोसिएशनच्या मते, पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये ब्रोकन हार्ट सिंड्रोम होण्याची शक्यता जास्त असते. विशेषत: 50 वर्षे वयाच्या महिलांमध्ये कारण त्यांच्या शरीरातील अॅस्ट्रोजन कमी होऊ लागतं. अॅस्ट्रोजन महिलांमधील लैंगिक हार्मोन आहे. तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की काही लोकांमध्ये हा सिंड्रोम गुणसुत्रांमुळेही होतो. विशेष गोष्ट अशी की या सिंड्रोमने प्रभावित लोक काही दिवसात ठिक होतात. गंभीर असेल तर औषधांनी उपचार केले जातात, ज्यामुळे रक्तदाब कमी होईल आणि हृदय गती कमी होईल ज्याने तणाव नियंत्रित करण्यास मदत होईल

कोविड-19 साथीच्या काळात वाढलेल्या या स्थितीमुळे असे स्पष्ट होते की आपण आपल्या शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक स्वास्थ्य आणि तणाव यांनाही प्राथमिकता द्यायला हवी.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - कोरोनरी आर्टरी डिझीज (हृदय धमनी रोग)

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: August 12, 2020, 3:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading