मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Housekeeper हवाय, पगार 18.5 लाख रुपये; रॉयल फॅमिलीनं दिली ऑफर

Housekeeper हवाय, पगार 18.5 लाख रुपये; रॉयल फॅमिलीनं दिली ऑफर

आठवड्याच्या 2 आणि वर्षाला 33 सुट्ट्या. सोबत खाणंपिणं, राहणं फ्री. एखादा ड्रिम जॉबच आहे हा.

आठवड्याच्या 2 आणि वर्षाला 33 सुट्ट्या. सोबत खाणंपिणं, राहणं फ्री. एखादा ड्रिम जॉबच आहे हा.

आठवड्याच्या 2 आणि वर्षाला 33 सुट्ट्या. सोबत खाणंपिणं, राहणं फ्री. एखादा ड्रिम जॉबच आहे हा.

  • Published by:  Priya Lad

लंडन, 28 ऑक्टोबर : हाऊसकिपिंगच्या (housekeeping) कामासाठी तब्बल 18.5 लाख रुपये. भलेभले डॉक्टर, इंजिनीअर्सनाही इतका पगार मिळत नाही. त्यामुळे आम्ही पगाराचा आकडा तर लिहिण्यात चुकलो नाही ना, असंच तुम्हाला वाटेल. मात्र तसं काही नाही. पगाराचा आकडा अगदी बरोबर आहे. कारण हे हाऊसकिपिंगचं काम एका रॉयल फॅमिलीतील आहे. रॉयल फॅमिलीला हाऊसकिपर हवा आहे, ज्याला सुरुवातीलाच इतका पगार दिला जाईल.

ब्रिटिश रॉयल फॅमिलीला एक उत्कृष्ट असा हाऊसकिपर हवा आहे. त्यांनी आपल्या अधिकृत वेबसाईटवर याची जाहिरात दिली आहे. लेव्हल 2 च्या अप्रेंटिसशिपची ही नोकरी आहे. त्यामुळे ज्या उमेदवाराची निवड होईल त्याला यूकेतील विंडसर कॅसलमध्ये राहावं लागेल.

आठवड्याचे पाच दिवस काम आणि दोन दिवस सुट्टी असेल. बँक हॉलिडेसह वर्षाला  33 सुट्ट्या मिळतील. याशिवाय राहण्याची आणि खाण्यापिण्यची व्यवस्थाही पॅलेसमार्फतच केली जाईल. इतकंच नव्हे तर नोकरी करताना प्रवास असल्यास त्याचा खर्चही वेगळा दिला जाईल. नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवाराला वर्षभर रॉयल्सच्या वेगवेगळ्या पॅलेसमध्ये पाठवलं जाईल. ज्यामध्ये बकिंघम पॅलेसचाही समावेश आहे.

हे वाचा - गर्लफ्रेंडच्या हत्येच्या आरोपात आजन्म कारावास; जेलमधूनच कमवतोय वर्षाला 8 लाख

उमेदवाराला इंग्रजी आणि गणित यायला हवं, ही अट आहे. जाहिरातीनुसार तुम्ही हाऊसकिपिंगच्या टीममध्ये सहभागी असेल. काम करताना तुम्हाला पॅलेसच्या आतील स्वच्छता आणि वस्तूंची देखभाल करावी लागेल. हाऊसकिपिंगची नोकरी असली तरी या नोकरीसाठी विशेष प्रशिक्षण दिलं जाईल. या प्रशिक्षणाचा कालावधी 13  महिने असेल. 13 महिन्यांचं ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्या उमेदवाराला शाही परिवारातील एक स्थायी कर्मचारी म्हणून कामावर ठेवलं जाईल.

हे वाचा - सायना-पारुपल्ली मालदीवमध्ये करतायत सुट्टी एन्जॉय, पाहा Photo

खरंतर हा जॉब म्हणजे एखाद्या ड्रिम जॉबपेक्षा कमी नाही. त्यात राजेशाही कुटुंबासोबत काम करणं म्हणजे एक सुवर्णसंधीच आहे.

First published:

Tags: London, Uk