मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /ब्रिटिशकालीन तिजोरीत आहेत फक्त 131 रुपये; तरी अनमोल म्हणून अजूनही होते शासकीय देखभाल, वाचा रंजक गोष्ट

ब्रिटिशकालीन तिजोरीत आहेत फक्त 131 रुपये; तरी अनमोल म्हणून अजूनही होते शासकीय देखभाल, वाचा रंजक गोष्ट

एका छोट्या गावात अशी एक तिजोरी आहे की ज्यात गेल्या अनेक वर्षांपासून केवळ 131 रुपयेच ठेवण्यात आलेले आहेत, तरीही सरकार अमूल्य असल्याच्या थाटात तिची देखभाल करतंय. काय आहे खास? जाणून घ्या

एका छोट्या गावात अशी एक तिजोरी आहे की ज्यात गेल्या अनेक वर्षांपासून केवळ 131 रुपयेच ठेवण्यात आलेले आहेत, तरीही सरकार अमूल्य असल्याच्या थाटात तिची देखभाल करतंय. काय आहे खास? जाणून घ्या

एका छोट्या गावात अशी एक तिजोरी आहे की ज्यात गेल्या अनेक वर्षांपासून केवळ 131 रुपयेच ठेवण्यात आलेले आहेत, तरीही सरकार अमूल्य असल्याच्या थाटात तिची देखभाल करतंय. काय आहे खास? जाणून घ्या

  धमतरी(छत्तीसगड), 8 एप्रिल : एका छोट्या गावात अशी एक तिजोरी (Locker)आहे की ज्यात गेल्या अनेक वर्षांपासून केवळ 131 रुपयेच ठेवण्यात आलेले आहेत. ग्रामीण यांत्रिकी सेवा विभागाची ही तिजोरीब्रिटिशांच्या काळातील आहे. ही तिजोरी आता कालबाह्य झाली असली तरी तिचे शासकीय रेकॉर्ड ठेवले जाते तसेच तिची पूजा ही केली जाते. छत्तीसगडमध्ये धमतरी इथे RES विभागातील जिल्हा कार्यालयात सर्व कामकाज आता संगणकीकृत झाले आहे. ठेकेदारांचे पेमेंट,कर्मचाऱ्यांचा पगार हा आरटीजीएसव्दारेच (RTGS)केला जातो. येथील सारेच अर्थिक व्यवहार ऑनलाईन डिजिटली ऑपरेटेड आहेत. केवळ महत्त्वाचे दस्तावेज कपाटांमध्ये सुरक्षित ठेवले जातात. तरीही ही तिजोरी कायम आहे आणि तिचं महत्त्वही.

  अशी सर्व कार्यपद्धती असताना या कार्यालयातील ही कडक सुरक्षेत ठेवली गेलेली तिजोरी मात्र सर्वाचेच लक्ष वेधून घेत मनात एक ना अनेक प्रश्न निर्माण करते. या तिजोरीचाआता काय उपयोग आहे,या तिजोरीचं नेमके काय काम आहे? असे प्रश्न येथे येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात आल्याशिवाय राहत नाहीत. परंतु ही तिजोरी इंग्रज काळातील (British era) आहे. याबाबत कार्यकारी अभियंता जे.एल. ध्रुव यांनी सांगितले की जेव्हा पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी ऑनलाईन पद्धत अस्तित्वात नव्हती, तेव्हा सरकारी तिजोरीतून विविध गोष्टींसाठी रोख रकम येत असे आणि ती थोडीथोडकी नव्हे तर कोट्यावधी रुपयांची असे.

  जगातला Biggest Chicken egg roll भारतात; अगदी तुमच्या खिशाला परवडेल असा

  ही रक्कम हातामध्ये द्यावी लागत असे. त्यावेळी अशा प्रकारच्या तिजोऱ्यांचा वापर होत असे. परंतु आता या तिजोऱ्यांची गरज आणि उपयोग फारसा राहिलेला नाही.

  देखभालीची शासकीय नोंद

  विशेष म्हणजे आजही या तिजोरीची नोंद शासकीय नोंदींमध्ये ठेवली जात आहे. मोठी साखळी आणि भक्कम कुलूप लावलेल्या या तिजोरीत गेल्या अनेक वर्षांपासून केवळ 131 रुपये ठेवण्यात आलेले आहे. याचा दरवर्षी हिशोब सरकारला दिला जातो. या तिजोरीवरील लक्ष्मीचे चित्र पाहता या तिजोरीची दररोज पूजा होते,हे नक्की. ही तिजोरी आरईएस कार्यालयात असली तरी तिची चावी जिल्हा कोषागारात सांभाळून ठेवली जाते. याबाबत धमतरी येथील नागरिक देवेंद्र जैन म्हणाले,की धमतरीमध्ये देखील सर्व अत्याधुनिक सेवा सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

  अरे यांना कुणीतरी आवरा! घाई म्हणून ट्रकखालूनच बाईक नेली; चालकाचा प्रताप VIRAL

  असे असले तरी ही प्रणाली अजूनही का सांभाळून ठेवली जात आहे, हे समजण्या पलीकडे आहे. हा वेळ आणि पैशाचा अपव्यय असल्याचा समज धमतरी येथील नागरिकांचा आहे. आज ही तिजोरी आणि पुरातन व्यवस्था कोणत्याही प्रकारे सुसंगत नसताना प्रशासकीय यंत्रणेने अशा गोष्टींचा सांभाळ करणे हे आश्चर्यकारक आहे.

  First published:
  top videos

   Tags: Chattisgarh