ब्रिटन, 06 ऑक्टोबर : बऱ्यात महिन्याच्या कोरोना लॉकडाऊननंतर (corona lockdown) जेव्हा सुरुवातीला लॉकडाऊन हळूहळू शिथील करण्यात आला. तेव्हा दारूची (alcohol) दुकानं उघडण्यात आली आणि मग दारूच्या दुकानांवर झुंबड उडालेली दिसली. तळीरामांनी दुकानांबाहेर रांगा लावल्या. पण एखाद्याला दारूचं व्यसन जडलेलं असेल आणि त्याला कोरोना झाल्यानंतर ती व्यक्ती दारूसाठी काय करू शकते, याचा प्रत्यय आला तो ब्रिटनमध्ये.
क्रॅबी जॅक या व्यक्तीला कोरोनाव्हायरस झाला. त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणंही आहेत. त्याला दोन आठवडे आयसोलेशनमध्ये राहायला सांगितलं होतं. तो आयसोलेशन सेंटरमध्ये होता. मात्र सेंटरमध्ये असताना त्याला दारू पिण्याची लहर आली. त्यासाठी तो आयसोलेशन सेंटरमधून बाहेर पडला.
आज तकच्या रिपोर्टनुसार आयसोलेशन सेंटरमधून एक रुग्ण पळाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला. क्रॅबी आपली कार घेऊन गेला होता. त्याची कार एका पबबाहेर पोलिसांना दिसली. जेव्हा पोलिसांनी तिथं संपर्क केला. तेव्हा क्रॅबी जवळपास एक तास पबमध्ये होता, तो एकटाच होता. त्याच्यासोबत दुसरं कुणीच नव्हतं, असं सांगण्यात आलं.
क्रॅबीला पोलिसांनी पकडलं. त्याने आपला गुन्हा कबूल केला. कोर्टाने त्याला दंड ठोठावला. जवळपास 4 लाख रुपयांचा दंड त्याला ठोठावण्यात आला. आता त्याच्याकडून कमीत कमी 1500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे आणि उर्वरित रक्कम ऑक्टोबर अखेरपर्यंत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हे वाचा - नशेत धुंद असणारी महिला थेट पडली वॉशिंगमशीनमध्ये पुढे काय झालं पाहा VIDEO
दारूसाठी व्यक्ती काय काय करू शकते, हे कोरोना लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आलं. याआधी महाराष्ट्रात लॉकडाउनमध्ये दारू मिळत नसल्याने दारूच्या दुकानांमध्ये चोऱ्या होऊ लागल्या. पैसे नाही तर दारूंच्या बाटल्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. एप्रिलमध्ये सोलापुरातील विजापूर रोड येथील गुलमोहर वाईन शॉप नावाचं दुकान आहे. दारूच्या आहारी गेलेल्या काही तळीरामांनी हे दुकान फोडत दारूची चोरी केली. यामध्ये जवळपास 70 हजार रुपयांची दारू तळीरामांनी चोरून नेली आहे.
हे वाचा - पोलिसांच्या मुलांनीच तोडला नियम, व्हायरल झाला विनामास्क क्रिकेट खेळतानाचा VIDEO
तर नागपूरमध्येही बिअर बारमध्ये चोरी झाली होती. नागपूरच्या खराबी रिंगरोडवर आनंद बार अँड रेस्टॉरंटमध्ये चोरी तळीरामांनी चोरी केली. लाखो रुपयांच्या दारूच्या बाटल्या पोत्यात भरून त्यांनी पळ काढला. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.