Home /News /lifestyle /

कॅन्सर संपूर्ण शरिरात पसरला, जगण्याची उमेद सोडली पण एका क्लिनिकल ट्रायलनं दिलं जीवनदान

कॅन्सर संपूर्ण शरिरात पसरला, जगण्याची उमेद सोडली पण एका क्लिनिकल ट्रायलनं दिलं जीवनदान

मूळ भारतीय असलेल्या व सध्या मँचेस्टर फेलोफिल्ड येथे राहणाऱ्या 51 वर्षीय जॅस्मिन डेव्हिड यांना काही वर्षांपूर्वी ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. डॉक्टरांनी जॅस्मिन यांना आपण काही महिनेच जगू शकाल, असं सांगितलं होतं

लंडन, 05 जुलै:  महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचं (Breast Cancer) वाढतं प्रमाण चिंताजनक आहे. एकदा का हा आजार झाला की केमोथेरपीमुळे पेशंटवर (Chemotherapy) पुरते त्रस्त होण्याची वेळ येते. केवळ औषधोपचारावर कुणी पूर्णपणे बरं झाल्याचं म्हटलं तर विश्वास बसणार नाही. पण ब्रिटनमध्ये झालेल्या क्लिनिकल ट्रायलमधील (Clinical Trial) औषधोपचारांमुळे एका महिलेचा स्तनांचा कर्करोग पूर्णपणे बरा झाला आहे.
मूळ भारतीय असलेल्या व सध्या मँचेस्टर फेलोफिल्ड येथे राहणाऱ्या 51 वर्षीय जॅस्मिन डेव्हिड यांना काही वर्षांपूर्वी ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. डॉक्टरांनी जॅस्मिन यांना आपण काही महिनेच जगू शकाल, असं सांगितलं होतं; पण क्लिनिकल ट्रायलमधील औषधोपचारानंतर मात्र त्या पूर्णपणे बऱ्या झाल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. नॅशनल हेल्थ सर्व्हिसकडून (NHS) याबाबतचं यशस्वी परीक्षण करण्यात आलं. कॅन्सरमधून बऱ्या झाल्यानंतर जॅस्मिन आता सप्टेंबर महिन्यात लग्नाचा 25 वा वाढदिवस साजरा करण्याची तयारी करत आहेत. क्रिस्टी एनएचएस फाउंडेशन ट्रस्टच्या (The Christie NHS Foundation) नॅशनल इन्स्टिट्युट फॉर हेल्थ अँड केअर रिसर्च (NIHR) व मँचेस्टर क्लिनिकल रिसर्च फॅसिलिटीमध्ये (CRF) डेव्हिड यांच्यावर क्लिनिकल ट्रायल झाली. यात दोन वर्षे त्यांना औषधोपचार देण्यात आले. यात एटेजोलिजुमाब हे एम्युनोथेरपीचे (Immunotherapy ) औषध दर तीन आठवड्याला त्यांना घ्यावं लागत होतं.
पुढील पिढीसाठी ट्रायलमध्ये घेतला भाग
कॅन्सर झाल्यानंतर 15 महिने डेव्हिड यांनी हे उपचार घेतले. त्यानंतर हा आजार बरा झाल्याचं त्यांना वाटलं आणि याबद्दल विचार करणं त्यांनी सोडून दिलं होतं; पण काही कालावधीनंतर पुन्हा कॅन्सरच्या जोखडात त्या सापडल्या. क्लिनिकल ट्रायलमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना विनंती केली गेली. ट्रायलमधील औषध आपणावर लागू होईल की नाही हेही डेव्हिड यांना माहिती नव्हतं; पण कमीतकमी दुसऱ्यांना मदत होईल या हेतूने आपण यात सहभागी झाल्याचं डेव्हिड सांगतात. आपण उचललेलं पाऊल किमान पुढच्या पिढीसाठी फायदेशीर असल्याचं मोठं समाधान आहे, असे डेव्हिड यांनी सांगितले.
जॅस्मिन यांना ब्रेस्ट कॅन्सर झाला तेव्हा सुरूवातीच्या काळात ताप आणि डोकेदुखी अशा काही आजारांचा सामना करावा लागला. सतत रुग्णालयातच दाखल व्हावं लागत होतं; पण नंतर मात्र उपचाराचे सकारात्मक परिणाम दिसून आले. नोव्हेंबर 2017 मध्ये त्यांना स्तनांमध्ये गाठ असल्याचं जाणवलं. हा ब्रेस्ट कॅन्सरचा ट्रिपल निगेटिव्ह फॉर्म होता. दोन अपत्य असलेल्या डेव्हिड आता एका केअर होममध्ये क्लिनिकल प्रमुख म्हणून काम करत आहेत.
2019 मध्ये कॅन्सर पूर्णपणे शरीरात पसरला
एप्रिल 2018 मध्ये सहा महिन्यांची केमोथेरपी करण्यात आली. यावेळी त्यांना एका मास्टेक्टॉमीला सामोरं जावं लागलं. यानंतर रेडिओथेरपीचे 15 राउंड झाले. यानंतर त्या कॅन्सरमुक्त झाल्याचं सांगितलं गेलं; पण ऑक्टोबर 2019 मध्ये त्यांना पुन्हा कॅन्सरच्या जोखड्यात त्या फसल्या. स्कॅन केल्यानंतर कॅन्सर पूर्ण शरीरात पसरला होता. त्यांची प्रकृती सातत्याने बिघडत चालली होती. कॅन्सर त्यांच्या फुफ्फुस, लिम्फ नॉड्स, छाती व हाडांमध्ये पसरला होता. त्यांच्या आयुष्याचा एका वर्षापेक्षा कमी काळ शिल्लक असल्याचे डॉक्टरांनी त्यांना म्हटले होते.
 
क्लिनिकल ट्रायलने मिळाले जीवदान
दोन महिन्यानंतर जेव्हा डेव्हिड यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. त्याचवेळी त्यांना क्लिनिकल ट्रायलमध्ये सहभागी होऊन रिसर्चसाठी मदत करण्यासाठी विनंती केली गेली. डेव्हिड म्हणाल्या की, ‘उपचार सुरू असताना फेब्रुवारी 2020 मध्ये मी 50 वा वाढदिवस साजरा केला होता. उद्या काय होईल हे कदापि माहिती नव्हते. पण अडीच वर्षांत मला जणू एक नवीन जीवन मिळालं आहे.’
First published:

Tags: Breast cancer, Lifestyle

पुढील बातम्या