क्या बात है! या अनोळखी ठुमक्यांचे 2 कोटी दिवाने, लग्नातल्या डान्सचा VIDEO तुफान VIRAL

क्या बात है! या अनोळखी ठुमक्यांचे 2 कोटी दिवाने, लग्नातल्या डान्सचा VIDEO तुफान VIRAL

सोशल मीडियावर (SocialMedia) 'ठुमका' व्हीडिओ चांगलाच VIRAL होताना दिसत आहे. लग्नातल्या या डान्सच्या video ला 2 कोटींहून अधिक Views मिळाले आहेत. कोणीही प्रसिद्ध चेहरा, सेलेब्रिटी नसूनही का व्हायरल होतोय या VIDEO? तुम्हीच बघून सांगा

  • Share this:

नवी दिल्ली, 23 डिसेंबर: कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर नियम जरा शिथिल झालेत तोच भारतात लग्नाचा धुमधडाका  सुरु आहे. सेलिब्रिटी असो वा सर्वसामान्य सगळ्यांनाच लगीन घाई झाल्याचं दिसून येत आहे. लग्न म्हटलं की मज्जा मस्ती नाचणं गाणं आलंच. अशाच एका लग्नातल्या डान्सच्या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडीओला कोटीहून अधिक views मिळाले आहेत.

गंमत म्हणजे या व्हिडीओ ना कुणी सेलेब्रिटी आहे ना कुणी बडी आसामी.  हीरो हिरोइन नसूनही या तरुणींचा डान्स व्हिडीओ कमाल लोकप्रिय झाला आहे. वास्तविक हा VIDEO काही नवा नाही. पण तो पुन्हा नव्यासारखा सोशल मीडियावर फिरू लागला आहे,

2 कोटी views मिळवणाऱ्या या व्हिडिओत नवरीच्या मैत्रिणींचा जबरदस्त डान्स बघायला मिळतो.  व्हायरल झालेल्या या  व्हिडिओमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ राजस्थानच्या जयपूरमध्ये स्मृती आणि निलेशच्या लग्नाचा आहे. या व्हिडिओमध्ये वधू-वरांच्या मैत्रिणी, बहिणी (Bride's Maid) बॉलिवूडमधील अनेक गाण्यांवर नाचताना दिसत आहेत.

यावर्षी कोरोना साथीच्या आजारामुळे फारच कमी विवाह झाले.  कोरोनाच्या पार्शवभूमीवर बऱ्याच लोकांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली होती. तसेच ज्याने लग्न केले त्यांना फारच थोड्या  पाहुण्यांनमध्ये आपले लग्न सोहळे पार पडावे लागले. लॉकडाऊन दरम्यान  सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, प्रत्येक राज्यात लग्नासाठी मर्यादित लोकांना परवानगी देण्यात आली होती. पण आता नियम शिथिल झाल्या नंतर लोक पुर्वव्रत आपल्या परंपरांसह धुमधडाक्यात नाचगाण्यासह लग्न समारंभ पार पडताना दिसत आहेत.

Published by: News18 Desk
First published: December 23, 2020, 10:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading