लग्न सोडून नवरी पोहोचली निवडणुकीत विजयी झाल्याचं प्रमाणपत्र घ्यायला; मगच पूर्ण केली सप्तपदी

लग्न सोडून नवरी पोहोचली निवडणुकीत विजयी झाल्याचं प्रमाणपत्र घ्यायला; मगच पूर्ण केली सप्तपदी

मतमोजणीच्या दिवशीच तिच्या लग्नाचा मुहूर्त ठरला. बोहल्यावर चढण्याआधीच बातमी आली आणि नवरी मांडवातून थेट शासकीय कार्यालयात विजयी झाल्याचं सर्टिफिकेट घ्यायला पोहोचली.

  • Share this:

लखनौ, 3 मे: खरं तर राजकीय क्षेत्रात (Youth in Political Field)युवकांचा सहभाग वाढला पाहिजे. त्यातही निर्णय आणि धोरण प्रक्रियेत युवकांचं प्रमाण वाढणे आवश्यक आहे. सध्या देशातील अनेक ठिकाणी युवक ग्रामपंचायतीपासून ते संसदेपर्यंत कार्यरत असल्याचं दिसतं. काही ग्रामपंचायातींच्या युवा सरपंचांनी दिशादर्शक असं काम केलं आहे. निवडणुका म्हटलं की, गाव पातळीपासून शहरांपर्यंत एक प्रकारचं उत्साहाचं वातावरण असतं. या कालावधीत अनेक गमतीदार घटनादेखील घडल्याचं आपण पाहतो, वाचतो. हे सर्व सांगण्याचं कारणही तसंच आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh)एका गावातील पंचायत निवडणुकीत एक युवती सदस्यपदासाठी निवडणूक लढवत होती. यासाठी मतदान (Voting for Panchayat election Uttar Pradesh)देखील झालं. याच दरम्य़ान तिचं लग्न ठरलं. मतमोजणीच्या (VoteCounting)दिवशीचाच मुहूर्त मिळाला. तिचं लग्न लागण्या अगोदर काही क्षण अगोदर तिला आपण निवडणुकीत जिंकल्याचं समजलं. त्यानंतर ती मांडवातून थेट शासकीय कार्यालयात पोहोचली.

दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, रामपूरमधील पूनम शर्मा (Poonam Sharma)हिचा रविवारी रात्री विवाह होता. घरात महिला मंगलगीत गात होत्या. ती लवकरच विवाहबद्ध (Marriage)होण्यासाठी स्टेजवर जाणार होती. याचवेळी तिला समजलं की, ती ग्रामपंचायत सदस्यपदाची निवडणूक जिंकली आहे.

तामिळनाडूमध्ये सेलिब्रिटींचे नेते होण्याचा ट्रेंड संपला का?

हे समजताच ही वधू विवाहसोहळा सोडून, मतमोजणी केंद्रावर पोहोचली आणि तीने विजयी झाल्याचे प्रमाणपत्र स्विकारले. यानंतर अत्यानंदात असलेली पूनम आपल्या घरी परतली आणि तिने नियोजन वरासोबत सप्तपदी घेतल्या.

31 मतांनी जिंकली निवडणूक

रिटर्निंग अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पूनमला 601 मतं मिळाली आणि 31 मतांनी निवडणूक (Election)जिंकली. यावेळी रिटर्निंग अधिकाऱ्याने लाल साजामध्ये सजलेल्या पूनमला विवाहानिमित्त शुभेच्छा दिल्या. पूनम विजयी झाल्याने तिच्या सासर आणि माहेरकडील मंडळींना खूप आनंद झाला आहे.

मतमोजणीच्या दिवशी लग्न

मिलक विभागातील मोहम्मदपूर जदीद गावातील गंगासरण यांची मुलगी पूनम शर्मा हिचे लग्न बरेली जिल्ह्यातील शाही थाना क्षेत्रातील बफऱी गावातील रहिवासी असलेल्या एका युवकाबरोबर निश्चित झालं. लग्नाची तारीख 2 मे ठरवण्यात आली. पूनम हिने ग्रामपंचायत निवडणूकीत वॉर्ड क्र. 135 मधून ग्रामपंचायत सदस्यपदासाठी निवडणूक लढवली होती. रविवारी ज्यावेळी तिच्या दारासमोर वरात आली.

आपला नेता विजयी झाला म्हणून नवस फेडायला तिने स्वतःची जीभ कापून केली देवाला अर्पण

त्याचवेळी मतमोजणी केंद्रावर तिच्या भवितव्याचा फैसला देखील सुरू होता. घरातील कुटुंबीय विवाह सोहळ्यातमग्न असले तरी एजंटमार्फत मतमोजणी केंद्रातून (Vote Counting Center)मतमोजणीची स्थिती जाणून घेत होते. रात्री सुमारे 10 वाजता पूनम या निवडणूकीत विजयी झाल्याचंघोषित करण्यात आलं. हा निरोप पूनमला समजताच ती तडक बाजार समितीत पोहोचली आणि निवडणूक निकालाचे प्रमाणपत्र स्विकारले. हे प्रमाणपत्र स्विकारल्यानंतर ती खूप आनंदी होती. यावेळी ती म्हणाली की या निवडणुकीसाठी मी अर्ज दाखल केला होता आणि रविवारी रात्रीच मी विजयी होणार होते. जेव्हा मला समजले की मी ही निवडणूक जिंकले आहे,त्यावेळी मी क्षणाचाही विलंब न करता मतमोजणी केंद्रावर पोहोचले आणि प्रमाणपत्र घेतले. त्यानंतर माझा लग्न सोहळा पार पडला.

First published: May 3, 2021, 9:05 PM IST

ताज्या बातम्या