फेरे घेताना भरकटला नवरा! नवरीनं भरमंडपातच मग काय केलं पाहा VIDEO

फेरे घेताना भरकटला नवरा! नवरीनं भरमंडपातच मग काय केलं पाहा VIDEO

लग्नानंतरच सोडा लग्नातच नवरीनं नवऱ्याला चांगलंच ताळ्यावर आणलं आहे.

  • Share this:

मुंबई, 12 डिसेंबर : लग्नानंतर बायको (wife) नवऱ्याला चांगलंच ताळ्यावर आणते असं म्हटलं जातं आणि अनेकांना त्याचा अनुभवही आला आहे. मात्र याची सुरुवात लग्नापासूनच झाली तर. म्हणजे लग्नमंडपापासूनच बायको आपल्या नवऱ्याला (husband) आपल्या इशाऱ्यावर नाचवू लागली तर... असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (social media viral video) होतो आहे. ज्यामध्ये आपल्या भरकटणाऱ्या नवऱ्याला तिनं ताळ्यावर आणलं आहे. नवरा भरकटत असल्याचं दिसताच नवरीनं त्याला योग्य मार्गावर आणलं आहे.

ट्विटरवर एका पंजाबी लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. गुरुद्वारामध्ये हे लग्न होतं आहे. जिथं नवरा आणि नवरी लग्नाचे काही विधी झाल्यानंतर फेरे घ्यायला उठतात. नवरा चुकीच्या दिशेनं जाऊ लागते. तेव्हा नवरी त्याला थांबवते आणि योग्य दिशा दाखवते.

व्हिडीओत पाहू शकता नवरा फेऱ्यांसाठी आपल्या उजव्या दिशेला वळतो तेव्हा नवरी त्याचा ड्रेस पकडून हळूच त्याला खेचते आणि इशारा करते. यानंतर नवरा आपल्या डाव्या हाताच्या दिशेनं चालू लागतो. हे पाहताच लग्नाला उपस्थित सर्व पाहुणे, वऱ्हाडी हसू लागतात. नवऱ्याला हसूही आवरत नाही.

हे वाचा - लेक माझी लाडकी! मुलीचे पाय धुवून तेच दूध प्यायला; लग्नाआधी बापलेकीचा भावुक VIDEO

या ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. पहिला दिवस, पहिला धडा असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया उमटत आहेत. तलवार त्याच्या हातात असली तर बॉस नेहमी तिच असते, म्हणूनच बायकोला अर्धांगिनी म्हटलं जातं. महिला विचार करण्यात नेहमीच पुढे असतात अशा प्रतिक्रिया  उमटू लागल्या आहेत.

Published by: Priya Lad
First published: December 12, 2020, 7:24 PM IST

ताज्या बातम्या