Home /News /lifestyle /

ढसाढसा रडली आणि निघाला मेकअप; नवरीचं खरं रूप दिसताच नवऱ्यानं काय केलं पाहा VIDEO

ढसाढसा रडली आणि निघाला मेकअप; नवरीचं खरं रूप दिसताच नवऱ्यानं काय केलं पाहा VIDEO

लग्न होताच सासरच्यांसोबत जातानाच नवरीचा मेकअप (bridal makeup) निघू लागला, त्यावेळी तिची कशी अवस्था झाली ते पाहा.

    मुंबई, 04 डिसेंबर : प्रत्येक मुलीला आपण आपल्या लग्नात सर्वात सुंदर दिसावं असंच वाटतं. त्यासाठी ती खूप आधीपासूनच आपल्या लग्नाची तयारी करते. ड्रेस, त्यावर मॅचिंग ज्वेलरी, हेअर स्टाइल आणि सर्वात महत्त्वाचा असतो तो मेकअप (make up). चेहऱ्यावरील कोणतेही पुरळ, डाग न दिसता नव्या ब्राइडचा चेहरा अगदी क्लिन, तुळतुळीत वाटावा यासाठी मेकअप केला जातो. ज्यामुळे फोटोही सुंदर येतात. लग्नातही मेकअपमुळे मुलगी इतकी सुंदर दिसू लागते जितकी ती सुंदर नसते. मुलीच्या मेकअपचीच चर्चा होते. मात्र खरी मजा येते ती मुलगी सासरी जाताना. लग्न झाल्यावर माहेर सोडून सासरी जाताना प्रत्येक मुलीला रडू कोसळतं आणि मग तिच्या चेहऱ्याची काय अवस्था होते हे काही लग्नांमध्ये तुम्ही पाहिलं असेलच. रडल्यानंतर किंवा घामानं हा मेकअप निघू लागतो तेव्हा आपलं खरं रूप समोर तिची काय अवस्था होते आणि त्यावेळी समोरच्याशी कशी प्रतिक्रिया असेल हे काही सांगायला नको. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडिवर व्हायरल (social media viral video) होतो आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत नवरी इतकी रडली इतकी रडली की तिच्या चेहऱ्यावरील मेकअप निघून तिची अशी अवस्था झाली ज्याची कल्पनाही आपण केली नसेल. आपल्या माहेरच्यांच्या निरोप घेऊन ती सासरी जायला निघाली. तेव्हा तिला रडू कोसळलं. ती जशी रडायला लागली, तसं तिचा मेकअप हळूहळू निघू लागला. गाडीत बसल्यानंतर तर तिचा चेहरा कसा होता आणि कसा झाला. हे वाचा - लग्नाच्या तीन दिवस आधी नवरीला झाला कोरोना; तरीही पठ्ठ्याने जुगाड लावून केलं लग्न चेहऱ्यावरील एक एक कलर निघू लागला. तिच्या चेहऱ्याची अशी अवस्था झाली की तिलाच तिची लाज वाटू लागली.  तिची अशी अवस्था पाहून नवऱ्याला खरंतर हसूच फुटलं पण आपल्या बायकोची त्याला दयाही आली. कारमध्ये टिश्यूनं तो तिचा चेहरा पुसू लागला.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Social media viral, Viral videos

    पुढील बातम्या