Home /News /lifestyle /

चिंता, भीती, ताण वाटल्यास अशा पद्धतीने घ्या श्वास आणि रिलॅक्स व्हा

चिंता, भीती, ताण वाटल्यास अशा पद्धतीने घ्या श्वास आणि रिलॅक्स व्हा

एन्झायटीसारखं (anxiety) वाटू लागलं, तर काही श्वसनाच्या पद्धती त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करू शकतात.

    Anxiety  म्हणजे कशाची तरी भीती वाटणे किंवा ताणामुळे अस्वस्थता वाटणे. प्रत्येकाला असं कधी ना कधी वाटतं. त्यामुळे एन्झायटी हे सामान्य आहे. गंभीर स्वरूपाची एन्झायटी असल्यास म्हणजे anxiety disorder सारखी समस्या असल्यास त्याचा दैनंदिन आयुष्यावर परिणाम होतो. अनेकदा माणूस आयुष्यात आलेल्या संकटामुळे किंवा एखाद्या परिस्थितीमुळे खचून जातो. अनेकदा माणूस कोणत्याही गोष्टीचा अति विचार करतो. त्यामुळे याचा ताण माणसाच्या मनावर आणि मेंदूवर पडल्यामुळे व्यक्ती नैराश्याच्या गर्तेत जातो. याचा परिणाम फक्त त्या व्यक्तीच्याच नाही तर त्याचं कुटुंब आणि मित्र परिवारही होतो. त्यामुळे एन्झायटीची लक्षणं काय आहेत आणि सामान्य स्वरूपातील एन्झायटीवर कशी मात करूया पाहुयात. एन्झायटीची लक्षणं 1) रक्तदाब पातळी म्हणजेच बीपी वाढणे 2) अति चिंता आणि अस्थिरता 3) मळमळ 4)चिडचिड 5)एकाग्रतामध्ये कमतरता 6) निद्रानाश म्हणजेच स्लीप डिसऑर्डर 7)पॅनिक म्हणजेच अस्वस्थ होणे हे वाचा - कोरोना महासाथीत रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची आहे; मग जरूर करा 5 फळांचं सेवन एन्झायटी डिसॉर्डर नसेल सामान्य एन्झायटी असेल तर आपण ्त्यातून लवकर बाहेर पडू शकतो. मनात भीती, चिंता, ताण असं काही वाटत असेल आणि त्यामुळे अस्वस्थ वाटत असेल तर काही श्वसनाच्या पद्धतीने तुम्हाला रिलॅक्स वाटू शकेल. 1) साधी श्वसन पद्धत तुम्ही नेहमी ज्या पद्धतीने श्वास घेता त्याच पद्धतीने श्वास घेऊन तुमचे खांदे रिलॅक्स ठेवून श्वास घेणं आणि सोडणं चालू ठेवा. श्वास घेताना पोट आत घ्या. मात्र हे करत असताना आपला जबडा सामान्य ठेवा. हाच व्यायाम तुम्ही काही मिनिटं केल्यानंतर तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. 2) दीर्घ श्वास पद्धत या पद्धतीमध्ये तुम्ही गुडघ्यावर बसा. त्यानंतर तुमचे हात गुडघ्यापर्यंत लांब करून केवळ नाकाने श्वास घ्या. त्यानंतर श्वास नाकावाटे न सोडता तोंडावाटे सोडताना 'हा' असं जोरात म्हणा. तुम्हाला शक्य तितकं तोंड उघडून तुमची जीभ हनुवटीच्या दिशेने ठेवण्याचा प्रयत्न करा. मात्र महत्त्वाचं म्हणजे हा व्यायाम करताना तुमचं सर्व लक्ष हे तुमच्या कपाळाच्या मध्यभागी केंद्रीत असायला हवं. 3) प्राणायाम योगा ही खूप प्राचीन व्यायामपद्धत आहे. यामध्ये श्वसनाचे विविध प्रकार असून प्राणायामाच्या देखील विविध पद्धती योगामध्ये दिलेल्या आहेत. भ्रामरी प्राणायाम ही त्यातील एक पद्धत असून यामध्ये आपले डोळे आणि कान बंद करून आपला श्वास पूर्ण आत घेऊन हळूहळू सोडावा. 4)नाडीशोधन प्राणायाम या प्राणायामामध्ये एका बाजूने आपलं नाक बंद करून दुसऱ्या बाजूने श्वास घ्यावा. त्यानंतर दुसऱ्या बाजूने श्वास सोडावा. अशीच पद्धत वापरून दुसऱ्या बाजूने देखील एका नाकपुडीने श्वास घेऊन दुसऱ्या बाजूने सोडावा. किमान 5 वेळा वेळा असं केल्यानंतर तुम्हाला नक्की आराम मिळेल. हे वाचा - पुन्हा सुरू होणार Oxford च्या कोरोना लशीची चाचणी; का थांबवलं होतं कंपनीने ट्रायल हा श्वासोच्छ्वास करण्याचा व्यायाम आपल्याला चिंताग्रस्त परिस्थितीत नक्कीच मदत करेल.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Stress

    पुढील बातम्या