नवी दिल्ली, 24 जून : कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) बचाव करण्यासाठी काय करावं आणि काय नाही याबाबत अनेक सल्ले दिले जात आहे. सोशल मीडियावरवर गेलात तरी अशा बऱ्याच टीप्स तुम्हाला मिळतील. कोरोनाशी लढण्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे ती रोगप्रतिकारक शक्ती आणि तिला मजबूत करण्यासाठी जीवनशैलीत बदल करण्याचा सल्ला दिला जातो आहे. त्यानुसार आहाराची विशेष काळजी घेतली जाते आहे, मात्र तुम्हाला माहिती आहे का कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही श्वासोच्छवास (breathing) कसा करता हेदेखील महत्त्वाचं आहे.
नाकावाटे श्वास घेऊन तो तोंडावाटे सोडला तर आपल्या शरीरावर हल्ला केलेल्या कोरोनाव्हायरसवर नियंत्रण ठेवता येऊ शकतं, असं नोबेले विजेते फार्मोकोलॉजिस्ट युइस जे. इगनॅरो यांनी सांगितलं आहे. 1998साली त्यांना फिजिओलॉजीसाठी नोबेल पुरस्कार मिळाला आहे. द
कनव्हर्सेशनमध्ये त्यांचा हा लेख प्रकाशित करण्यात आला आहे.
हे वाचा - OMG! शरीर की रबर? YOGA POSES पाहून तुम्हीही व्हाल थक्क
इनगॅरो यांनी केलेल्या अभ्यासानुसार अशा पद्धतीने श्वास घेतल्याने नाकामध्ये नायट्रिक ऑक्साइड तयार होतं. जे फुफ्फुसामध्ये रक्तप्रवाह वाढवतो आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळीही वाढते. जेव्हा नाकावाटे श्वास घेतला जातो तेव्हा नायट्रिक ऑक्साइड थेट फुफ्फुसामध्ये पोहोचतो. ज्यामुळे फुफ्फुसामध्ये कोरोनाव्हायरसचे प्रतिरूप म्हणजे रिप्लिकेशन होत नाहीत आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढते तेव्हा त्या व्यक्तीला खूप ताजंतवानं वाटतं.
संकलन, संपादन - प्रिया लाड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.