मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Breast Milk Bath : त्वचेच्या समस्या बाळापासून राहतील दूर, जाणून घ्या ब्रेस्ट मिल्क बाथचे फायदे

Breast Milk Bath : त्वचेच्या समस्या बाळापासून राहतील दूर, जाणून घ्या ब्रेस्ट मिल्क बाथचे फायदे

आईचे दूध बाळासाठी खूप फायदेशीर असते. त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या बाळाला स्तनपान करणे आवश्यक मानले जाते. त्याचप्रमाणे आईच्या दुधात स्नान केल्याने बाळाला त्वचेच्या अनेक समस्यांपासून आराम मिळतो.

आईचे दूध बाळासाठी खूप फायदेशीर असते. त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या बाळाला स्तनपान करणे आवश्यक मानले जाते. त्याचप्रमाणे आईच्या दुधात स्नान केल्याने बाळाला त्वचेच्या अनेक समस्यांपासून आराम मिळतो.

आईचे दूध बाळासाठी खूप फायदेशीर असते. त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या बाळाला स्तनपान करणे आवश्यक मानले जाते. त्याचप्रमाणे आईच्या दुधात स्नान केल्याने बाळाला त्वचेच्या अनेक समस्यांपासून आराम मिळतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 31 डिसेंबर : तुमच्या बाळाला आईच्या दुधाने आंघोळ घालणे हा त्वचेच्या सामान्य समस्यांपासून मुक्त होण्यासाठी एक जुना उपचारात्मक उपाय आहे. अनेक माता आपल्या बाळाला त्यांच्या दुधाचे आंघोळ घालण्यास प्राधान्य देतात. आईच्या दुधात अनेक अँटीबॉडीज आणि पोषक घटक असतात, जे बाळाच्या पोषणासाठी आवश्यक असतात. मात्र, अनेक महिलांना याची माहितीही नसते.

आईचे दूध बाळाच्या त्वचेला मॉइश्चरायझ करते, खाज आणि कोरडेपणापासून आराम देते. एवढेच नाही तर ते बाळाच्या एक्जिमासारख्या त्वचेच्या समस्या देखील सुधारते. यासाठी बाळाच्या आंघोळीच्या पाण्यात थोडेसे आईचे दूध मिसळले जाते. बाळासाठी आईच्या दुधाच्या आंघोळीचे फायदे जाणून घेऊया.

फक्त एक कप दुधाने दूर होतील टाचांवरील भेगा, रात्रीच्यावेळी असा करा वापर

ब्रेस्ट मिल्कने आंघोळीचे काय फायदे आहेत?

हेल्थलाइनच्या मते, बाळाच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी आईचे दूध खूप महत्त्वाचे असते. यासोबतच यात अनेक आजार बरे करण्याचे गुणधर्मही आहेत.

त्वचेला मॉइश्चरायझ करा : आईच्या दुधात फॅटी अॅसिड जसे की, पाल्मिटिक अॅसिड, ओलेइक अॅसिड हे असतात. हे फॅटी अॅसिड त्वचेवर बॅरियर म्हणून काम करतात आणि कोरडेपणा दूर करण्यासाठी प्रभावी आहेत. त्यामुळे आईच्या दुधाने स्नान केल्याने बाळाला कोरडेपणापासून आणि खाज सुटण्यापासून आराम मिळतो.

त्वचेचे नुकसान कमी होते : आईच्या दुधात दोन प्रकारचे लिनोलेनिक अॅसिड असते, जसे की, ओमेगा-३ आणि ओमेगा-६ फॅटी अॅसिड. सूर्यप्रकाशामुळे बाळाच्या त्वचेला होणारे नुकसान कमी करण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यात ते प्रभावी आहे.

लहान जखमा भरून काढते : आईच्या दुधात असलेले ओमेगा फॅटी अॅसिड लहान जखमा भरण्यास फायदेशीर आहे आई यामुळे त्वचेला आरामही मिळतो.

डायपर रॅश आणि एक्जिमा रिलीफ : संशोधन असे सूचित करते की, डायपर रॅश आणि एक्जिमाच्या उपचारांसाठी आईच्या दुधाचा वापर सुरक्षित उपचार म्हणून केला जाऊ शकतो. आईच्या दुधाचा वापर हा त्वचेच्या या आजारांवर उपचार करण्यासाठी टॉपिकल मलमांचा स्वस्त आणि प्रभावी पर्याय आहे.

Skin Care : कॉफी सोबतच या 5 सवयी वाढवू शकतात चेहऱ्यावरील सुरकुत्या

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle, Parents and child